ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » आलोककुमार, अस्थाना सक्तीच्या रजेवर

आलोककुमार, अस्थाना सक्तीच्या रजेवर

►नागेश्‍वर राव सीबीआयचे नवे अंतरिम प्रमुख
►सतर्कता आयोगाच्या शिफारशींनुसार कारवाई,
नवी दिल्ली, २४ ऑक्टोबर –

Rakesh Asthana Alokkumar Verma Cbi

Rakesh Asthana Alokkumar Verma Cbi

सीबीआयमधील वादळी परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर सरकारने आज वेगवान घडामोडीत सीबीआयचे संचालक आलोककुमार आणि विशेष संचालक राकेश अस्थाना या दोन वरिष्ठ अधिकार्‍यांना सक्तीच्या रजेवर पाठवत नागेश्‍वर राव यांची सीबीआयचे अंतरिम प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. सीबीआयमधील अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत. दरम्यान आपल्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या सरकारच्या निर्णयाला आलोककुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर २६ ऑक्टोबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे.
आलोककुमार आणि राकेश अस्थाना या दोन अधिकार्‍यांमधील संघर्षामुळे सीबीआय गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली होती. तसेच या दोघांमधील संघर्षामुळे सीबीआयची प्रतिमाही डागाळली होती. सीबीआयची प्रतिष्ठा, तसेच विश्‍वसनीयता कायम ठेवण्यासाठी केंद्रीय सतर्कता आयोगाच्या शिफारसींनुसार सरकारने आलोककुमार आणि राकेश अस्थाना यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला, त्याचप्रमाणे या दोन्ही सर्वोच्च अधिकार्‍यांचे सर्व अधिकार गोठवण्यात आले आहेत.
सीबीआयमध्ये सहसंचालक असलेले नागेश्‍वर राव यांची सरकारने सीबीआयचे अंतरिम संचालक म्हणून नियुक्ती केली. नागेश्‍वरराव यांनी तातडीने आपल्या पदाची सूत्रेही स्वीकारली. विजय माल्या तसेच ऑगस्टा वेस्टलॅण्ड सारख्या सर्व संवेदनशील प्रकरणाचा तपास आता नागेश्‍वर राव करणार आहेत.
सीबीआयचे सहसंचालक अरुणकुमार शर्मा, मनीष सिन्हा, ए. साई मनोहर, व्ही. मुरुगुशन यांच्यासह काही अधिकार्‍यांच्या बदल्याही करण्यात आल्या. राकेश अस्थाना प्रकरणाचा तपास, सीबीआयचे उपमहानिरीक्षक तरुण गौबा, पोलिस अधीक्षक सतीश डागर आणि सहसंचालक व्ही. मुरुगुशन यांची विशेष चौकशी समिती करणार आहेत. सीबीआय मुख्यालयातील दहाव्या आणि अकराव्या मजल्यावरील कार्यालयांना सीबीआयने सील ठोकल्याचीही चर्चा होती, मात्र सीबीआय प्रवक्त्याने याचा इन्कार केला.
आलोककुमार सर्वोच्च न्यायालयात
सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या तसेच नागेश्‍वर राव यांची सीबीआयचे अंतरिम प्रमुख नियुक्ती करण्याच्या सरकारच्या निर्णयाला सीबीआयचे संचालक आलोककुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आपल्या याचिकेची तातडीने सुनावणी करण्याची विनंती त्यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एस. के. कौल आणि न्या. के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठासमोर केली.
निष्पक्ष चौकशीसाठी रजेवर पाठवले : अरुण जेटली
सीबीआयची प्रतिष्ठा आणि विश्‍वसनीयता कायम राखण्यासाठी केंद्रीय सतर्कता आयोगाच्या शिफारसींनुसार सरकारने हा निर्णय घेतला, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले. चौकशी पूर्ण होईपर्यंत दोन अधिकार्‍यांना रजेवर पाठवण्यात आले आहे. चौकशीत निर्दोष आढळले तर हे दोन्ही अधिकारी परत आपल्या जागेवर रुजू होऊ शकतात, असे जेटली म्हणाले.
हा निर्णय सरकारने स्वत:हून नाही, तर केंद्रीय सतर्कता आयोगाच्या शिफारसींनुसार घेतला. सरकार सीबीआयच्या कामकाजात कधीच हस्तक्षेप करत नाही, असे जेटली पुढे म्हणाले.
सीबीआयमध्ये दुर्भाग्यपूर्ण परिस्थिती उदभवली होती. सर्वोच्च पदावरील दोन अधिकारी एक-दुसर्‍यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते. त्यामुळे या आरोपांची चौकशी कोणी करायची, असा प्रश्‍न उदभवला. सरकार अशी चौकशी करू शकत नाही. त्यामुळे सरकारने दोन्ही अधिकार्‍यांना रजेवर पाठवत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्याच्या दृष्टीने निर्णय घेतला, याकडे लक्ष वेधत जेटली म्हणाले की, ज्यांच्यावर आरोप आहेत, ते आपल्यावरील चौकशीवर नजर ठेवतील, याची शक्यता होती. त्यामुळे सरकारने केंद्रीय सतर्कता आयोगाच्या शिफारसींनुमार दोन्ही अधिकार्‍यांना रजेवर पाठवले. सीबीआय कायद्याच्या कलम ४१ नुसार भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी करण्याचा अधिकार केंद्रीय सतर्कता आयोगाला आहे.

Posted by : | on : 25 Oct 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (117 of 1774 articles)

Me Too
गडकरी, सीतारामन्, मेनका गांधी यांचा समावेश, नवी दिल्ली, २४ ऑक्टोबर - कामाच्या ठिकाणी होणारे महिलांचे लैंगिक शोषण टाळण्यासाठी आणि ‘मी ...

×