ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » आलोक वर्मांची चौकशी दोन आठवड्यांत पूर्ण करा

आलोक वर्मांची चौकशी दोन आठवड्यांत पूर्ण करा

►सर्वोच्च न्यायालयाचे सीव्हीसीला निर्देश,
नवी दिल्ली, २६ ऑक्टोबर –

Alokkumar Verma

Alokkumar Verma

भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले सीबीआयचे संचालक आलोककुमार वर्मा यांच्याविरुद्धची चौकशी केंद्रीय दक्षता आयोग अर्थात् सीव्हीसीने दोन आठवड्यांत पूर्ण करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी दिले. सोबतच, सीबीआयची तात्पुरती जबाबदारी सोपविण्यात आलेले एम. नागेश्‍वर राव यांना धोरणात्मक निर्णय घेण्यापासूनही न्यायालयाने रोखले आहे.
ही चौकशी निवृत्त न्यायमूर्ती ए. के. पटनायक यांच्या देखरेखीखाली करण्यात यावी. केवळ अपवादात्मक स्थितीतच चौकशीला मुदतवाढ दिली जाऊ शकते, असे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एस. के. कौल आणि न्या. के. एम. जोसेफ यांच्या तीन सदस्यीय न्यायासनाने आपल्या आदेशात स्पष्ट केले.
सीबीआयची तात्पुरती जबाबदारी सांभाळत असलेले राव यांनी कोणताही धोरणात्मक किंवा महत्त्वाचा निर्णय घेऊ नये. सीबीआयमधील दैनंदिन कामकाजच त्यांनी हाताळावे, असे स्पष्ट करतानाच, राव यांनी २३ ऑक्टोबरपासून आजपर्यंत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी केली जाऊ नये. या काळात त्यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांची माहिती सीलबंद लिफाप्यातून सादर करण्यात यावी, असा आदेशही न्यायालयाने दिला.
सीबीआयचे संचालक म्हणून अधिकार तात्पुरत्या काळासाठी काढून, रजेवर पाठविण्याच्या सरकारच्या निर्णयाला आलोक वर्मा यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांच्या आणि कॉमन कॉज या स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने केंद्र सरकार आणि सीव्हीसीला नोटीस जारी करून १२ नोव्हेंबरपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. वर्मा आणि अस्थाना यांच्यावरील आरोपांची चौकशी न्यायालयातर्फे नियुक्त एसआयटीच्या माध्यमातून व्हावी, अशी विनंती कॉमन कॉज संस्थेने केली आहे.
यावेळी केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करणारे महान्यायवादी के. के. वेणुगोपाल यांना न्यायालयाने सांगितले की, या प्रकरणाचा आम्ही वेळोवेळी आढावा घेणार आहोत. तपासाची प्रक्रिया १० दिवसांच्या आत पूर्ण व्हायलाच हवी. सीव्हीसीतर्फे न्यायालयात उपस्थित असलेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, सीव्हीसीने चौकशीची प्रक्रिया सुरू केलेली आहे, पण या प्रकरणात फार जास्त प्रमाणात दस्तावेज असल्याने १० दिवसांचा कालावधी पुरेसा ठरणार नाही. चौकशी पूर्ण करण्यासाठी न्यायालयाने योग्य अवधी द्यावा. यावर न्यायालय म्हणाले की, ठीक आहे, आम्ही तुम्हाला २४० तास देतो. त्यापेक्षा जास्त मुदत देता येणार नाही आणि अवधी वाढवणे देशहितातही नाही. तसेही सीव्हीसी १० दिवसांतच तपास पूर्ण करेल, असा आम्हाला विश्‍वास आहे. तुषार मेहता यांनी पुन्हा एकदा विनंती केल्यानंतर न्यायालयाने सीव्हीसीला तपास पूर्ण करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत मंजूर केली. आलोक वर्मा यांच्यावतीने प्रख्यात वकील फली नरीमन यांनी, तर राकेश अस्थाना यांच्या वतीने मुकुल रोहतगी यांनी काम पाहिले.

Posted by : | on : 27 Oct 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (98 of 1770 articles)

Dr Satyapal Singh
सिंह यांचे मत, बागपत, २६ ऑक्टोबर - आपल्या देशातील भ्रष्टाचार आणि दहशतवाद यासारख्या गंभीर समस्यांवर केवळ वेदांतील विचारांच्या माध्यमातूनच मात ...

×