ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » आशा, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ

आशा, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ

►पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
►विमा योजनांचाही लाभ,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ११ सप्टेंबर –

Modi Sarkar

Modi Sarkar

आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ही वाढ ऑक्टोबरपासून लागू होईल. या व्यतिरिक्त देशभरातील सर्वच अधिकृत ‘आशां’ना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा लाभ देण्याची घोषणाही मोदी यांनी केली.
या दोन्ही विमा योजनांसाठी आशांना विमा हप्ता द्यावा लागणार नाही. त्यांना ४ लाख रुपयांपर्यंतची सुरक्षा या विमा योजनांच्या माध्यमातून मिळणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील आशा, अंगणवाडी सेविकांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधताना सांगितले.
ही वाढ ऑक्टोबरपासून लागू होईल व नोव्हेंबरच्या मानधनामध्ये मिळेल. आशा व अंगणवाडी सेविकांसाठी दिवाळीची भेट असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्यांचे मानधन आतापर्यंत ३ हजार रुपये होते, त्यांना आता ४५०० रुपये मानधन मिळेल. २२०० रुपये मानधन असलेल्यांना ३५०० रुपये दरमहा मानधन मिळेल. अंगणवाडी सेविकांचे मानधन १५०० रुपयांवरून २५०० रुपये करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
आशा व अंगणवाडी सेविकांना केंद्राकडून देण्यात आलेली ही नियमित वाढ असून, राज्यांकडूनही त्यांना वेगळी वाढ दिली जाणार आहे.
देशाचा पाया मजबूत करण्यात आशा व अंगणवाडी सेविकांची महत्त्वाची भूमिका असते. आरोग्य आणि नवजात शिशूंच्या देखभाल त्यांच्याकडून केली जाते. पोषण आहाराचा दर्जा व स्वच्छतेतही त्या मोलाची कामगिरी करतात, असे त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सांगितले.
आयसीडीएस-सीएसच्या कॉमन अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअरचा वापर करणार्‍या अंगणवाडी सेविका व मदतनिसांना अतिरिक्त वाढ दिली जाईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. कामगिरीवर आधारित असलेली ही वाढ २५० ते ५०० रुपयांची असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा कार्यक्रम ‘आयुषमान भारत’चा प्रारंभ २३ सप्टेंबर रोजी झारखंड येथून केला जाणार असून, यासाठी लाभार्थ्यांची यादी सज्ज असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
हरियाणातील कर्नाल जिल्ह्यात जन्माला आलेल्या करिश्मा नावाच्या मुलीला या योजनेचा सर्वप्रथम लाभ देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या एक टक्का प्रमाण असलेल्या रक्ताल्पतेशी निगडीत आजारांचे प्रमाण तिपटीने कमी करावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले.
सप्टेंबर हा पोषण महिना म्हणून पाळला जाणार आहे. पोषक आहाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी देशभरातील प्रत्येक घरात संदेश पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Posted by : | on : 12 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (1029 of 2226 articles)


वृत्तसेवा नवी दिल्ली, ११ सप्टेंबर - संपुआ सरकारच्या काळात भारतीय बँकिंग प्रणालीवर हल्ला करण्यात आला, संपुआच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस ...

×