ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » इंग्रजी भाषा नाही; इंग्रजी मानसिकता हा आजार

इंग्रजी भाषा नाही; इंग्रजी मानसिकता हा आजार

►उपराष्ट्रपतींची स्पष्ट भूमिका,
पणजी, २८ सप्टेंबर –

Venkaiah Naidu5

Venkaiah Naidu5

इंग्रजी मानसिकता हा एक आजारच आहे, ती भाषा नाही, असे स्पष्ट करताना देशवासीयांनी आपल्या समृद्ध भाषांवरच अभिमान करायला हवा, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज शुक्रवारी येथे केले.
याच महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीत हिंदी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मी जे मत व्यक्त केले होते, त्याचा प्रसारमाध्यमांनी विपर्यास केला होता. इंग्रजी भाषा एक आजार आहे आणि ब्रिटिशांनी तो आपल्याला दिला, असे वाक्य माध्यमांनी माझ्या घशात घातले होते. सत्यता अशी आहे की, मी असे कोणतेच वक्तव्य केले नव्हते. मातृभाषेला प्रोत्साहन देण्याचा सल्ला मी दिला होता, असे नायडू यांनी स्पष्ट केले. एनआयटी गोवाच्या चौथ्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.
‘इंग्रजी भाषा आजार नसून, इंग्रजी मानसिकता आजार आहे आणि हा आजार आपल्याला ब्रिटिशांनी दिला आहे. ब्रिटिश भारतातून परत गेले, पण त्यांनी न्यूनगंड निर्माण केला. त्यांनी आपला असा समज केला आहे की, ब्रिटिश नागरिक महान आहेत, विदेशी नागरिक महान आहेत आणि त्याच्या तुलनेत आपण अगदीच शून्य आहोत. याच मानसिकतेतून आपल्याला बाहेर पडायचे आहे. आपल्या सांस्कृतिक वारसा आणि मातृभाषेविषयी आपण अभिमान बाळगायला हवा, असे उपराष्ट्रपती म्हणाले.
आजवरचा इतिहास तपासला तर लक्षात येईल की, भारताने कधीच कोणत्या देशावर आक्रमण केले नाही, उलट भारतच परकीयांच्या आक्रमणाचा शिकार ठरला आहे. या आक्रमणकर्त्यांनी आपल्यावर अनेक शतके राज्य केले. या काळात त्यांनी केवळ आपले आर्थिक शोषणच नव्हे, तर मानसिक शोषणही केले आहे. आजही अनेक जण याच आजाराचे बळी असल्याचे दिसत आहेत, असे सांगताना, भारतीयांनी आपले खरे मूळ असलेल्या समृद्ध संस्कृतीकडे परत फिरावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा, पण देश आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी विसरू नका. जबाबदारीच्या जाणिवेतून जर तुम्ही आपल्या समाजाच्या हितासाठी योगदान द्याल, तर हा देश आणि समाज नेहमीच तुमचे स्मरण करेल, असा सल्ला त्यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना दिला.
देशाच्या संस्कृतीचे संवर्धन करणे अतिशय महत्त्वाचे आहे, तसेच निसर्गाचा सन्मानही अत्यावश्यक आहे. एकमेकांना समजून घ्या आणि काळजी करा, हेच आपले तत्त्वज्ञान आहे. ही विचारधारा आपण जोपासायला हवी, असे सांगताना ते म्हणाले की, इंग्रजांच्या मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी मी, राज्यसभेचा सभापती या नात्याने सभागृहातही काही बदल केले आहेत. सदस्य म्हणतात, ‘आय बेग टू टेबल’ बेग म्हणजे याचना करणे, आपण कशाची याचना करतो, त्याऐवजी ‘आय सबमिट अ पेपर’. आपण गूड मॉर्निंग, गूड आफ्टरनून म्हणतो. यावर माझा मुळीच आक्षेप नाही, पण त्याऐवजी आपण ‘नमस्कार’ असेही म्हणू शकतो. या शब्दात आपले संस्कार आहेत आणि नमस्काराची भावना हृदयातून येत असते, असे ते म्हणाले.

Posted by : | on : 29 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (751 of 2053 articles)


दिल्ली, २८ सप्टेंबर - अणुपुरवठादार गटाच्या (एनएसजी) सदस्यत्वासाठी विनाअट भारताला समर्थन देण्यास तयार असल्याचे पुन्हा एकदा ब्रिटनकडून जाहीर करण्यात आले ...

×