ads
ads
जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

•भारतीय लष्कराचा कठोर संदेश •पुलवामा हल्ल्यामागे पाक लष्कर, आयएसआयच,…

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – महाराष्ट्राच्या कडे-कपारीत ज्यांच्या नावाचा…

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

•एका वैमानिकाचा मृत्यू, दोन सुरक्षित •एअर शो सरावादरम्यान दुर्दैवी…

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

•इम्रान खानची धमकी, इस्लामाबाद, १९ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी…

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

सॅन फ्रान्सिस्को, १९ फेब्रुवारी – मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी…

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

•सर्व आरोप काल्पनिक, आंतरराष्ट्रीय तत्त्वांचीही पायमल्ली •हरीश साळवे यांचा…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

मुंबई, १७ फेब्रुवारी – यापुढे पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » इंधनाचा समावेश ‘जीएसटी’मध्ये नाही

इंधनाचा समावेश ‘जीएसटी’मध्ये नाही

महसुली तोट्याच्या भीतीने राज्यांनी प्रस्ताव घेतला मागे,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २३ ऑगस्ट –

Gst 1

Gst 1

केंद्र सरकारने जीएसटी लागू केल्यापासूनच पेट्रोल, डिझेलही यामध्ये आणण्याची मागणी होऊ लागली होती. या अनुषंगाने अर्थमंत्री आणि अन्य नेत्यांनी वक्तव्येही केली होती. यामुळे प्रत्येक जण याची वाट पाहत होता. मात्र, राज्यांच्या पैशांच्या हव्यासामुळे पेट्रोल, डिझेल कधीही जीएसटीच्या कक्षेत येणार नसल्याचे समजते.
केंद्र सरकारने गेल्या वर्षी जीएसटीची अंमलबजावणी केली होती. मात्र, पेट्रोल, डिझेलसह अन्य पेट्रोलियम उत्पादनांना जीएसटी कक्षेबाहेर ठेवले होते. आशिया खंडातील इतर देशांपेक्षा काही पट जास्त दराने भारतात पेट्रोल, डिझेल विकले जात आहे. यामुळे जनतेतून पेट्रोल, डिझेलही जीएसटीमध्ये आणण्याची मागणी होऊ लागली होती. ४ ऑगस्टला झालेल्या जीएसटी काऊंन्सिलच्या बैठकीमध्येही हा मुद्दा उचलला गेला होता. अर्थ मंत्रालयानेही अशक्य असल्याचे म्हटले आहे.
पेट्रोल, डिझेल हे राज्य आणि गेंद्र सरकारांचे उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत. यामुळे खरेदीपेक्षा तिप्पट किमतीने ते विकले जातात. हा फरक कराच्या रूपात सरकारी तिजोरीत जातो. जर जीएसटीखाली इंधन आणल्यास केंद्र सरकारला २० हजार कोटी रुपयांचा उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. तसेच राज्येही आपले उत्पन्न गमवू इच्छित नाहीत. सध्या पेट्रोलवर केंद्राला १९.४८ रुपये आणि डिझेलवर १५.३३ रुपये अबकारी कर मिळतो. त्यात राज्य सरकारे व्हॅट आकारत आहेत. हा कर जीएसटीच्या सर्वात जास्त असलेल्या २८ टक्के टॅक्सपेक्षाही जास्त आहे. यामुळे पेट्रोल, डिझेल जीएसटीखाली येणे अशक्य असल्याचे सूत्रांनी सांगितले.
इंधनाचे दर आता खाली येण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. नजीकच्या इंधन जीएसटी अंतर्गत आल्यास मोठ्या प्रमाणात महसुली तोटा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कच्च्या तेलाच्या दरातील अनिश्‍चितता दूर होण्यासाठी आणि इंधनाचे दर आवाक्यात येण्यासाठी काही उद्योग तसेच केंद्र सरकारच्या दोन मंत्र्यांची चर्चा झाल्याचे वृत्त आहे. मात्र, इंधन वस्तू आणि सेवा कराच्या अंतर्गत आणण्याची केंद्राची तसेच राज्य सरकारांची कोणताही योजना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशी माहिती सूत्रांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. ४ ऑगस्टला झालेल्या जीएसटी परिषदेमध्ये पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीअंतर्गत आणण्याचा मुद्दा चर्चेला आला होता. मात्र, मोठ्या प्रमाणात महसुली फटका बसत असल्याच्या पृष्ठभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारांनी हा प्रस्ताव चर्चेला ठेवला नसल्याचीही माहिती सूत्रांनी दिली, असेही सूत्रांनी नमूद केले.
पेट्रोल आणि डिझेल या इंधनांना जर जीएसटी अंतर्गत आणल्यास केंद्र सरकारला इनपुट टॅक्स क्रेडिटपोटी दरवर्षी २०,००० कोटी रुपये द्यावे लागतील. सध्या पेट्रोल, डिझेल, कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल जीएसटी अंतर्गत असल्याने केंद्राच्या आणि राज्यांच्या महसुलात मोठी भर पडत आहे. मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त करण्याचे साधन म्हणून राज्ये सध्या इंधनाकडे पाहत आहेत. शिवाय केरळसारखी पूरपरिस्थिती किंवा एखादा अनपेक्षित प्रसंग ओढावल्यास अर्थार्जनाचे साधन म्हणूनही राज्ये इंधन जीएसटीमध्ये आणण्यास विरोध करीत आहेत, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

Posted by : | on : 24 Aug 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (960 of 2042 articles)


सरकारवर खोटे आरोप ►भाजपाचे घणाघाती प्रत्युत्तर, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २३ ऑगस्ट - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जर्मनीतील हॅम्बर्ग येथील ...

×