ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » एअरबसच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह सात जणांवर ईडीची नजर

एअरबसच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह सात जणांवर ईडीची नजर

►इंडियन एअरलाइन्सचा ८ हजार कोटी रुपयांचा सौदा वादात,
मुंबई, २९ ऑक्टोबर –

Ed Dierctorate Of Enforcement1

Ed Dierctorate Of Enforcement1

संपुआच्या कार्यकाळात २००५ मध्ये इंडियन एअरलाइन्ससाठी ८ हजार कोटी रुपयांच्या निधीतून ४३ विमाने खरेदी करण्याबाबत २००५ मध्ये करण्यात आलेला सौदा वादात अडकला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने या सौद्यात घोटाळा झाल्याचा आरोप करीत एअरबसच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह सात जणांना नोटीस बजावली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) १६ ऑक्टोबर रोजी पाठवलेल्या नोटीसमध्ये एअरबसचे उपाध्यक्ष किरण राव यांचाही समावेश असल्याची माहिती एका अधिकार्‍याने दिली.
अंमलबजावणी संचालनालय, नोटीस पाठवलेल्या सात आरोपींची लवकरच चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यापैकी काही जण सध्या भारतात नाहीत. त्यांना चौकशीचा सामना करण्यासाठी पुढील महिन्यात दिल्ली येथे यावेच लागेल, असेही सूत्रांनी सांगितले. काही आरोपींच्या वकिलांनी चौकशीला तोंड देण्यासाठी रूपरेषा तयार केली आहे, अशी माहितीही देण्यात आली.
ए-३२० विमानांच्या सौद्यामध्ये कथित अनियमितता आढळल्याने सीबीआयने २०१३ मध्ये सरकारी मालकीच्या इंडियन एअरलाइन्सच्या सात अधिकार्‍यांची चौकशी केली होती. २००७ मध्ये इंडियन एअरलाइन्सचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण करण्यात आले. प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत फ्रेंच कंपनीला फायदा करून भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणातील सहआरोपींमध्ये एअरबस इंडियाचे माजी अध्यक्ष किरण राव यांचाही समावेश आहे. २०१४ मध्ये सीबीआयच्या अधिकार्‍यांनी लंडन येथे जाऊन त्यांची चौकशी केली होती.
तथापि, अंमलबजावणी संचालनालयाने त्यांच्याविरोधात त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केलेला नाही. याबाबत सीबीआयने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. पुरवठ्याबाबत झालेल्या करारानुसार काही अटी व शर्तींचे पालन न केल्यामुळे त्यांची सीबीआयने २०१४ मध्ये चौकशी केली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.
या प्रकरणी होत असलेल्या चौकशीसाठी एअरबस सहकार्य करीत असल्याचे एअरबसचे प्रवक्ते जस्टीन डुबन यांनी सांगितले होते. मात्र, आता सावकारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत होणारी चौकशी एअरबस आणि किरण राव यांना अडचणीत आणू शकते. अंमलबजावणी संचालनालय त्यांची भारतातील संपत्ती जप्त करण्याची शक्यता आहे, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.
ठळक बाबी
अंमलबजावणी संचालनालयाची १६ ऑक्टोबरला एअरबसच्या दिल्लीतील पत्त्यावर नोटीस
अंमलबजावणी संचालनालयाकडून सर्वच आरोपींची पुढील महिन्यात चौकशी शक्य
किरण राव पुढील महिन्यात या प्रकरणी बयाण देण्याची शक्यता
भ्रष्टाचार आणि प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत एअरबसला फायदा करून दिल्याचा आरोप

Posted by : | on : 30 Oct 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (605 of 2053 articles)

Gonsalvis Pharera Pune Court
भारद्वाजला हरयाणातून अटक, पुणे, २७ ऑक्टोबर - कोरेगाव भीमा येथील दंगलप्रकरणी माओवाद्यांशी संबंधाच्या आरोपात अटक करण्यात आलेले अरुण फरेरा आणि ...

×