ads
ads
काँगे्रससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँगे्रससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » ओलांद यांच्या विधानावर मोदींनी भूमिका स्पष्ट करावी

ओलांद यांच्या विधानावर मोदींनी भूमिका स्पष्ट करावी

►राहुल गांधी यांची मागणी
►राफेल सौद्यात सर्व काही ठीक नाही
►जेपीसी चौकशी व्हावी,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, २२ सप्टेंबर –

Rahul Gandhi 6

Rahul Gandhi 6

फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांच्या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळगलेले मौन संशयास्पद आहे. त्यांनी मौन तोडून आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज शनिवारी केली. राफेल सौद्यात सर्व काही ठीक नाही. या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी करण्याच्या मागणीचा गांधी यांनी पुनरुच्चार केला.
काँग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत राहुल गांधी यांनी राफेल सौद्यावरून पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्ला चढवला. राफेल सौद्यात भ्रष्टाचार झाला. यामुळे देशाचे तसेच लष्कराचे भवितव्य धोक्यात आले आहे. अनिल अंबानीच्या कंपनीला ठेका देण्यात फ्रान्स सरकारची कोणतीच भूमिका नव्हती, अंबानीच्या कंपनीचे नाव भारत सरकारने सुचवले होते, असे ओलांद यांचे निवेदन वाचून दाखवत राहुल गांधी म्हणाले की, ओलांद यांच्या विधानावरून पंतप्रधान मोदी खोटे बोलत असल्याचे दिसून येते. मोदींनी राफेल प्रकरणात ३० हजार कोटी रुपयांचा सौदा अनिल अंबानी यांच्या कंपनीला द्यायला भाग पाडले. असे नसेल तर मोदी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे.पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा वाचविण्यासाठी मी हे बोलत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदी यांना अप्रत्यक्षपणे उघडे पाडले, मात्र एरवी अन्य मुद्यांवर बोलणारे मोदी याप्रकरणी मौन बाळगून आहेत. त्यांनी ओलांद यांच्या विधानावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. राफेल प्रकरणी पंतप्रधान मोदी काहीच बोलत नाही, अरुण जेटली, निर्मला सीतारामन्च बोलत आहेत. राफेल विमानाच्या सौदा होताना पंतप्रधान मोदी आणि ओलांद यांच्यात समोरासमोर बैठक झाली होती. मोदी यांच्या संशयास्पद मौनामुळेच या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय देशातील लोकांच्या मनात येत आहे, असे गांधी म्हणाले.
आमच्या कार्यकाळात राफेलचे एक विमान ५२६ कोटीला घेतले जाणार होते, विद्यमान सरकारने ते १६०० कोटी रुपयांना विकत घेतले, असा आरोप करत गांधी म्हणाले की, अंबानीच्या कंपनीला विमाने बनवण्याचा कोणताही अनुभव नाही, कारण या कराराच्या १० दिवस आधीच त्यांनी नवीन कंपनी स्थापन केली होती. हिंदुस्तान एरॉनॉटिक्सला डावलून रिलायन्सशी करार करण्यात आला. ज्या माणसावर तुम्ही विश्‍वास टाकला, त्याने तुमच्या विश्‍वासाला तडा दिला. तुमच्या खिशातून पैसा काढून अंबानीच्या खिशात घातला. राफेल सौद्यात देशाच्या चौकीदारानेच चोरी केली आहे.
राफेल विमानाचा सौदा झाला तेव्हा तत्कालीन संरक्षणमंत्री बाजारात मासोळी घेत होते, विद्यमान संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांनी आधी राफेल विमानाचे दर सांगण्याची तयारी दाखवली, मात्र नंतर त्यांनी घूमजाव केले. पंतप्रधान मोदी यांना वाचविण्यासाठी सर्वजण खोटे बोलत आहेत. या प्रकरणातील वस्तुस्थिती समोर येण्यासाठी याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी होण्याची गरज आहे. आवश्यकता पडली तर समितीने फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष ओलांद यांनाही समितीसमोर बोलविले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यावेळी उपस्थित होते.

Posted by : | on : 23 Sep 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (405 of 1905 articles)


विसर्जन, तभा वृत्तसेवा मुंबई, २२ सप्टेंबर - उद्या रविवारी अनंत चतुर्दशीच्या दिनी १० दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी अवघे राज्य सज्ज ...

×