ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » कडवे प्रवचनकार जैन मुनी तरुण सागर महाराज कालवश

कडवे प्रवचनकार जैन मुनी तरुण सागर महाराज कालवश

तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, १ सप्टेबर –

Tarun Sagar Maharaj

Tarun Sagar Maharaj

कडवे प्रवचनकार जैन मुनी तरुण सागर महाराज यांचे आज शनिवारी पहाटे राजधानी दिल्लीतील राधापुरी जैन मंदिरात निधन झाले. ते ५१ वर्षांचे होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने जैन समाजात शोककळा पसरली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी तरुण सागर महाराज यांच्या निधनाबद्दल शोकसंवेदना व्यक्त केल्या.
तरुण सागर महाराज यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चांगली नव्हती, त्यामुळे त्यांना वैशाली येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती उपचारांना प्रतिसाद देत नव्हती. तरुण सागर महाराज यांनीच रुग्णालयातून कृष्णानगर येथील राधापुरी जैन मंदिरात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांना तेथे आणण्यात आले. मंदिरात आल्यानंतर त्यांनी औषध घेणे सोडले होते. संथारा घेण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती, मात्र अन्य जैनमुनींनी त्यांना त्यापासून परावृत्त केले. आज पहाटे त्यांचे निधन झाले.
सकाळी ८ च्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा राधापुरी मंदिरातून निघाली. सिंहासनावर आरुढ तरुण सागर महाराज यांचे पार्थिव घेऊन त्यांचे अनुयायी चालत होते. हजारो शोकाकुल अनुयायी या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. उत्तरप्रदेशातील मुरादनगर येथील तरुण सागर धाममध्ये त्यांची अंत्ययात्रा पोहाचली. या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केला गेला.
तरुण सागर महाराज यांच्या निधनाचे वृत्त समजताच जैन समाजातील लोकांनी अंत्यदर्शनासाठी राधापुरी जैन मंदिरात धाव घेतली. तरुणसागर महाराज आपल्या क्रांतिकारी विचारांसाठी ओळखले जायचे. त्यांची प्रवचने कडवे प्रवचन म्हणून प्रसिद्ध होती. त्यांच्या प्रवचनाला हजारोंची गर्दी व्हायची. अनेक राज्यांच्या विधानसभांमध्ये तरुण सागर महाराज यांना प्रवचनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. २६ जून १९६७ रोजी मध्यप्रदेशातील दमोह येथे तरुण सागर महाराज यांचा जन्म झाला होता. जैन धर्मात त्यांचे मोठे अनुयायी होते.
राष्ट्रपती, पंतप्रधानांना दु:ख
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तरुण सागर महाराज यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. तरुण सागर महाराज यांनी समाजाला शांती आणि अहिंसेचा संदेश दिला, त्यांच्या अनुयायांप्रती माझ्या संवेदना आहेत, असे कोविंद यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून तरुण सागर महाराज यांच्या आकस्मिक निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. तरुण सागर महाराज यांचा समृद्ध आदर्श, करुणा आणि समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान नेहमीच लक्षात राहील, त्यांंची नेक शिकवण आम्हालाच नेहमीच प्रेरणा देत राहील, या शब्दात मोदी यांनी आपली श्रद्धांजली वाहिली.
जैन मुनी यांच्या निधनामुळे मी स्तब्ध झालो, ते प्रेरणास्रोत आणि करुणेचा महासागर होते, त्यांच्या निधनाने देशाच्या संतसमाजाची मोठी हानी झाली, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले. आपल्या प्रबोधनकारी प्रवचनांतून समाजामध्ये जागृती निर्माण करून त्यास योग्य मार्गावर चालण्यास प्रवृत्त करणारे क्रांतिकारी राष्ट्रसंत मुनी तरुणसागर यांच्या निधनामुळे जैन तत्त्वदर्शनाचा आदर्श प्रचारक हरपला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांनी सांगितलेल्या आदर्शांच्या मार्गावरून निष्ठेने वाटचाल करीत तरुण सागर यांनी संसारातील सत्य आणि त्यातील अनेक भ्रामकता आपल्या प्रवचनांतून कठोर शब्दात मांडल्या. जैन तत्त्वज्ञानासह धर्माचा नेमका अर्थही समजावून दिला. सत्य, अहिंसा, संयम, करुणा व अपरिग्रह या तत्त्वांचे कट्टर पाठीराखे असलेले तरुण सागरजी यांचा उपदेश व कार्य हे फक्त जैन समुदायाला नव्हे, तर संपूर्ण मानव समाजाला प्रेरित करणारे होते. त्यांच्या समाधी निर्वाणामुळे जैन संत परंपरेतील एका प्रभावी व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
रा. स्व. संघाची श्रद्धांजली
भारतीय संस्कृती व मूल्यांना आपलेे विचार आणि कृतीतून राष्ट्रजीवनात प्रतिष्ठित करणारे एक प्रखर दृढ व सर्वमान्य व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले. समाज जीवनात आलेल्या या पोकळीला भरून काढणे शक्य नाही. त्यांच्या पुण्यस्मृतींना शतश: नमन, अशा शब्दात रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Posted by : | on : 2 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (887 of 2024 articles)


उद्ध्वस्त होण्यापासून आम्ही वाचवले : पंतप्रधान ►इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेचे लोकार्पण, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १ सप्टेंबर - एनपीएची समस्या ...

×