ads
ads
विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

►जावडेकर यांची घोषणा, नवी दिल्ली, १५ जानेवारी – आगामी…

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

•पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्ला, बालनगिर, १५ जानेवारी –…

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

•ख्रिश्‍चनांच्या कार्यक्रमातच राजनाथसिंह यांनी सुनावले, नवी दिल्ली, १५ जानेवारी…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:10
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » काँग्रेसच नक्षल्यांची समर्थक

काँग्रेसच नक्षल्यांची समर्थक

►नेहमीच घेतली दुटप्पी भूमिका
►भाजपाचा जोरदार हल्ला,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, ४ सप्टेंबर –

Sambit Patra3

Sambit Patra3

देशाच्या सुरक्षेला धोका असलेल्या नक्षलवाद्यांबाबत सत्तेत असताना काँग्रेसने नेहमीच दुटप्पी भूमिका घेत त्यांची पाठराखण केली होती. हा पक्ष नक्षल्यांचा समर्थक राहत आलेला आहे, असा गंभीर आरोप भाजपाने आज मंगळवारी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखण्यासाठी काँग्रेस माओवादी आणि नक्षलवाद्यांशी हातमिळवणी करीत आहे, असा जोरदार हल्लाही भाजपाने चढविला.
भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत भाजपा प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी शहरी नक्षलवादाच्या मुद्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह तसेच काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला.
नक्षलवाद्यांना आर्थिक मदत करण्याच्या संदर्भात एक पत्र पोलिसांना सापडले आहे. या पत्रावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे राजकीय गुरू आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांचा मोबाईल क्रमांक आढळून आला. नक्षलवाद्यांशी दिग्विजयसिंह यांचे संबंध असल्याचे हे द्योतक आहे. हा मोबाईल क्रमांक माझा नाही, असे आतापर्यंत दिग्विजयसिंह यांनी म्हटले नाही. यासंदर्भात कायदा आपले काम करीत आहे, कोणालाच सोडले जाणार नाही, आवश्यकता पडली तर दिग्विजयसिंह यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पात्रा यांनी दिला.
नक्षलवादापेक्षा देशाच्या सुरक्षेला दुसरा कोणताही मोठा धोका नाही, अशी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची भूमिका असताना, काँग्रेसचे अर्धे मंत्री नक्षलवाद्यांसोबत, तर अर्धे नक्षलवाद्यांच्या विरोधात होते, असा आरोप करीत पात्रा म्हणाले की, काँग्रेसची भूमिका ही नेहमीच नक्षलवाद्यांसोबत सहानुभूतीची राहिली.
विनायक सेन यांना नक्षलवाद्यांचे समर्थन केल्याच्या आरोपाखाली देशद्रोही ठरवून २०१० मध्ये अटक करण्यात आली होती; मात्र नंतर याच विनायक सेन यांची योजना आयोगाच्या आरोग्य विभागात नियुक्ती करण्यात आली होती, याकडे पात्रा यांनी लक्ष वेधले.
महेश राऊत यांना भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात अटक करण्यात आली होती, असे स्पष्ट करत डॉ. पात्रा म्हणाले की, संपुआ सरकारच्या कार्यकाळातही महेश राऊत यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी महेश राऊत यांची शिफारस करीत महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र पाठवले होते. त्यात त्यांनी राऊत यांना क्लीनचिट दिली होती.
दंतेवाडा येथील नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे ७६ जवान मारल्या गेले होते, ऑपरेशन ब्ल्यु-स्टारनंतर एकाच दिवसात सर्वाधिक सुरक्षा जवान मारल्या गेल्याची ही दुसरी घटना होती, मात्र तरीसुद्धा काँग्रेस नेत्यांचे नक्षलवाद्यांबद्दल असलेले प्रेम कमी होत नाही, त्यांना नक्षलवाद्यांचा पुळका नेहमीच येत असतो. आपल्या आठ सहकार्‍यांची सुटका करावी, या मागणीसाठी २०११ मध्ये मल्कानगिरीच्या जिल्हाधिकार्‍यांसह एका कनिष्ठ अभियंत्याचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले होते. त्यावेळी ए. पद्मा या महिलेसह आठ नक्षलवाद्यांची सुटका करण्यात आली होती. पद्मा ही नक्षलवाद्याचा कमांडर ए. हरगोपाल उर्फ रामकृष्णची पत्नी होती. हीच पद्मा संपुआच्या कार्यकाळात राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे सदस्य हर्ष मंदर यांच्या एका अनाथालयाची प्रमुख होती. काँग्रेस नेत्यांचे नेहमीच नक्षलवाद्यांसोबत संबंध राहिले आहेत, त्यांनी वेळोवेळी नक्षलवाद्यांची पाठराखण केली आहे, असा स्पष्ट आरोप त्यांनी केला.
पोलिसांचे दस्तावेज भाजपाजवळ कसे?
काँग्रेसचे नक्षलवाद्यांसोबत संबंध असल्याच्या आरोपांचा स्पष्ट शब्दात फेटाळताना काँग्रेसने भाजपालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा प्रयत्न केला. पोलिस ज्या तथाकथित पुराव्यांच्या आधारे पाच मानवाधिकार कार्यकर्त्यांना अटक केल्याचा दावा करते, ती कागदपत्रे भाजपाच्या प्रवक्त्याजवळ कशी येतात, अशी विचारणा काँग्रेसने केली आहे.
भाजपा देशात चौकशी यंत्रणेचे काम करीत आहे, जेव्हा देशात पक्ष, सरकार आणि चौकशी यंत्रणा यातील फरक संपून जातो, तेव्हा देशात अघोषित आणिबाणी असल्याचे दिसून येते, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांनी आज काँग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत केला.
मानवाधिकाराच्या क्षेत्रात काम करणार्‍या पाच कार्यकर्त्यांच्या अटकेचे कारण न्यायालयाने विचारले असता पोलिसांना त्यांचे नेमके उत्तर देता आले नाही. तामिळनाडूतील एका भाजपा नेत्यासमोर भाजपा हाय हायच्या घोषणा दिल्यामुळे एका महिलेला तुरुंगात पाठवण्यात आले. हा देशात अघोषित आणिबाणी असल्याचाच प्रकार आहे, असे तिवारी म्हणाले.
सरकार पेट्रोल आणि डिझेलबाबतीत नफाखोरी करीत आहे, सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या नाही, तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काँग्रेस आंदोलन छेडेल, असा इशारा तिवारी यांनी यावेळी दिला.
दिग्विजयसिंह यांचे आव्हान
नक्षलवाद्यांशी माझे संबंध असल्याचे सरकारजवळ पुरावे असतील तर मला तातडीने अटक करावी, असे आव्हान काँग्रेसनेते दिग्विजयसिंह यांनी दिले. आधी मला देशद्रोही ठरवण्यात येते होते, आता माझे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत, असे सांगितले जाते, मग सरकार मला अटक का करीत नाही, सरकारने मला तातडीने अटक करावी, असे दिग्विजयसिंह म्हणाले.

Posted by : | on : 5 Sep 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (692 of 1845 articles)


नवी दिल्ली, ४ सप्टेंबर - २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात माझे अपहरण करून, बेकायदेशीरपणे डांबून ठेवणे आणि कोठडीत माझ्या झालेल्या ...

×