ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय » कामगार चळवळीसमोरील प्रश्‍नांचे निराकरण दत्तोपंतांच्या विचाराने शक्य

कामगार चळवळीसमोरील प्रश्‍नांचे निराकरण दत्तोपंतांच्या विचाराने शक्य

►डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन,
नवी दिल्ली, १० नोव्हेंबर –

Dr Mohan Bhagwat22

Dr Mohan Bhagwat22

दत्तोपंत ठेंगडी यांची दृष्टी अविरोधी आणि सर्वसमावेशी होती, कामगारांच्या व्यापक आणि सर्वांगीण कल्याणासाठी त्यांनी परपस्परविरोधी विचारधारेच्या लोकांना आणि संघटनांना एकत्र आणले, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज शनिवारी येथे केले. जगातील कामगार चळवळीसमोर तसेच अनेक देशांसमोर आज जे प्रश्‍न आहे, त्याचे निराकरण दत्तोपंतांच्या विचाराने शक्य आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
स्वदेशी जागरण मंचतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित राष्ट्रऋषी दत्तोपंत ठेंगडी स्मृती व्याख्यानात डॉ. भागवत मार्गदर्शन करत होते. यावेळी स्वदेशी जागरण मंचचे राष्ट्रीय संयोजक अरुण ओझा, सहसंयोजक सरोज मित्र आणि राष्ट्रीय संघटक कश्मिरीलाल व्यासपीठावर उपस्थित होते. दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ठेंगडी यांची दृष्टी विश्‍वव्यापी होती, त्यांनी कामगारांच्या संदर्भात भारतीय परिप्रेक्ष्यात जो विचार दिला तो जगानेही स्वीकारला. कामगारांच्या कल्याणाचा विचार त्यांनी देशाच्या व्यापक हिताशी जोडला. आधी कामगार फक्त आपल्या फायद्याचा विचार करायचे. दत्तोपंतांनी त्यांना ‘देश के हित मे करेंगे काम और काम का लेंगे पुरा दाम’ असा नवा नारा दिला. मात्र, चीनच्या आक्रमणानंतर देश संकटात आला, त्यावेळी दत्तोपंतांनी कामगारांना देशाच्या व्यापक हितासाठी कोणतीही अपेक्षा न करता ओव्हरटाईम करण्यास सांगितले. कारण देश जगला तर या देशातील कामगार, विद्यार्थी जगणार आहे, ही त्यांची धारणा होती.
दत्तोपंतांनी डाव्या विचाराच्या कामगार संघटनांच्या विरोधात आपला नवा विचार दिला नाही, तर दुसर्‍याच्या कामगार धोरणातील चांगल्या मुद्यांचा स्वीकार करणारा आणि त्यातील त्रुटी दूर करणारा आणि देशाच्या हिताचा विचार दिला, असे डॉ. भागवत म्हणाले.
दत्तोपंतांनी कोणताही अतिवादी विचार कधीच स्वीकारला नाही, तर नेहमीच मध्यमवादी आणि संतुलन साधणारा विचार दिला. दत्तोपंत काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे तसेच दूरदृष्टीचे होते, १९८९ मध्ये जवळपास संपूर्ण जग लाल रंगात रंगल्यासारखे भासत होते, त्यावेळी दत्तोपंतांनी येत्या काही वर्षात भगव्या रंगाचा प्रभाव वाढल्याशिवाय राहणार नाही, असे म्हटले होते. विशेष म्हणजे, त्यावेळी भगव्या रंगाचा प्रभाव वाढण्यासारखी कोणतीच स्थिती नव्हती. मात्र, त्यांचे म्हणणे खरे ठरले आणि काही वर्षातच म्हणजे १९९९ मध्ये भगवी विचारधारा देशात सत्तारूढ झाली. दत्तोपंतांच्या सनातन आणि शाश्‍वताला पकडून चिंतन करणार्‍या विचारधारमुळे त्यांना हे शक्य होत होते. जगातील कामगार चळवळीसमोर तसेच अनेक देशांसमोर आज जे प्रश्‍न आहे, त्याचे निराकरण दत्तोपंताच्या विचाराने शक्य आहे, असे त्यांनी सांगितले.
दत्तोपंतांच्या कार्यकर्ता या पुस्तकाचा दाखला देत डॉ. भागवत म्हणाले की, आदर्श कार्यकर्ता कसा असावा याचे चिंतन या पुस्तकात आहे. विशेष म्हणजे आपल्या वागणुकीतून दत्तोपंतानी आदर्श कार्यकर्ता कसा असावा याचे दर्शन घडवले.
जागृत जनमत आणि निस्वार्थ भावनेने काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थांचाच सरकारवर वचक राहू शकतो, कारण परिवर्तन घडवायचे असले तर ते समाजालाच घडवावे लागते, कोणतीही शासकीय यंत्रणा परिवर्तन घडवू शकत नाही, कारण त्याचे हात बांधलेले असतात, असे डॉ. भागवत म्हणाले.
दत्तोपंतासोबतच्या अनेक आठवणींना डॉ. मोहनजी भागवत यांनी यावेळी उजाळा दिला. दत्तोपंताचा आचार विचार नेहमीच अनुकरणीय आहे, त्यांचे अशा वेगवेगळ्या कार्यक्रमातून कृतिरूप स्मारक उभारणे ही त्यांना खरी श्रध्दांजली आहे, असे डॉ. भागवत म्हणाले. स्वदेशी जागरण मंचचे राष्ट्रीय संयोजक अरुण ओझा दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती दिली.

Posted by : | on : 11 Nov 2018
Filed under : नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय (727 of 2236 articles)

Niti Aayog
दिल्ली, १० नोव्हेंबर - देशांतर्गत मागणी पूर्ण व्हावी, यासाठी कृषिनिर्यातीवर सरसकट निर्बंध लादण्यास नीती आयोगाने विरोध केला आहे. अगदीच अपवादात्मक ...

×