ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » कायदा करून राममंदिर बनवा!

कायदा करून राममंदिर बनवा!

►मोदी-योगींच्या काळात बनणार नाही तर केव्हा?
►साधुसंताच्या उच्चाधिकार समितीची एकमुखी मागणी
►राष्ट्रपतींना दिले निवेदन,
नवी दिल्ली, ५ ऑक्टोबर –

Mahant Nrutyagopal Das

Mahant Nrutyagopal Das

अयोध्येतील रामजन्मभूमीवर मंदिर निर्माण करण्यासाठी संसदेने कायदा करावा, अशी एकमुखी मागणी विहिंपच्या पुढाकाराने आज शुक्रवारु येथे झालेल्या देशभरातील संताच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत करण्यात आली. नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या काळात मंदिर होणार नाही, तर केव्हा होणार, अशी विचारणाही या बैठकीतून करण्यात आली.
विहिंपच्या आर. के. पुरमस्थित केंद्रीय कार्यालयात रामजन्मभूमी न्यासचे अध्यक्ष महंत नृत्यगोपालदास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या संदर्भातील निर्णय घेण्यात आला. महंत नृत्यगोपालदास यांच्या नेतृत्वात संताच्या एका शिष्टमंडळाने नंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेऊन त्यांना या मागणीचे निवेदनही दिले.
अयोध्येतील रामजन्मभूमीवर मंदिर उभारण्याचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी संसदेत कायदा करण्यासाठी तुमच्या सरकारला निर्देश द्या, अशी मागणी या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे. सद्यस्थितीत या वादावर तोडगा काढण्यासाठी हाच एक समाधानकारक मार्ग आहे, याकडे निवेदनातून राष्ट्रपतींचे लक्ष वेधण्यात आले. याबाबत सरकारला निर्देश देण्याचे आश्‍वासन राष्ट्रपती कोविंद यांनी आम्हाला दिल्याचे नंतर महामंडलेश्‍वर युगपुरुष स्वामी परमानंद गिरी महाराज यांनी सांगितले.
राष्ट्रपतींना भेटलेल्या साधुसंताच्या शिष्टमंडळात जगद्गुरू रामानंदाचार्य श्री हंसदेवाचार्य महाराज, महामंडलेश्‍वर युगपुरुष स्वामी परमानंद गिरी महाराज, आचार्य महामंडलेश्‍वर श्री स्वामी विशोकानंद भारती महाराज, महामंडलेश्‍वर विश्‍वेश्‍वरानंद महाराज, अग्रदेवाचार्य श्री राघवाचार्य महाराज, श्री स्वामी चिन्मयानंद सरस्वती, श्री स्वामी रामेश्‍वरदास वैष्णव महाराज, स्वामी परमात्मानंद महाराज, विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोककुमार, उपाध्यक्ष चम्पतराय, जीवेश्‍वर मिश्र, संयुक्त महासचिव डॉ. सुरेंद्रकुमार यांचा समावेश होता.
एका पत्रपरिषदेत हंसदेवाचार्य महाराज, परमानंद गिरी महाराज, आलोककुमार यांनी याबाबतची माहिती दिली.
राममंदिर उभारण्यासाठी देशभरातील संत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भेटून निवेदन देणार आहेत. विविध राज्यातही पंतप्रधानांच्या नावाने राज्यपालांना यासंदर्भातील निवेदन देण्यात येणार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदारांना साधुसंताच्या नेतृत्वात घेराव घालून राममंदिरासाठी संसदेने कायदा करावा म्हणून त्यांच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणण्यात येणार आहे. १८ डिसेंबर म्हणजे गीताजयंतीपासून २६ डिसेंबरपर्यंत संपूर्ण देशभर प्रत्येक पूजास्थानी, मठ, मंदिर, आश्रम, गुरुद्वारा आणि घराघरात राममंदिर निर्माणासाठी अनुष्ठान केले जातील, असे आलोककुमार यांनी स्पष्ट केले.
अयोध्येतील राममंदिराच्या मुद्यावर सप्टेंबर महिन्यापर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईल, अशी आमची अपेक्षा होती. त्यामुळे आम्ही आतापर्यंत थांबलो होतो, पण सर्वोच्च न्यायालयाने आमची निराशा केली, असे आलोककुमार यांनी प्रश्‍नावर स्पष्ट केले.
सरकारने आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर अलाहाबादला कुंभमेळ्यादरम्यान होणार्‍या धर्मसंसदेत राममंदिराबाबतच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल, असा इशारा आजच्या बैठकीतून देण्यात आला. बैठकीला उच्चाधिकार समितीतीतल ७० पैकी ५० साधुसंत उपस्थित होते. बैठकीत काही प्रस्तावही पारित करण्यात आले.

Posted by : | on : 6 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (709 of 2053 articles)

Urjit Patel Rbi Governer
किमतीमुळे महागाईची शक्यता ►आरबीआयचे पतधोरण जाहीर मुंबई, ५ ऑक्टोबर - वाढत्या महागाईमुळे भारतीय रिझर्व्ह बँक प्रमुख कर्जांवरील व्याजदरात किमान ०.२५ ...

×