ads
ads
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ते विधान भाजपाने नाकारले

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ते विधान भाजपाने नाकारले

नवी दिल्ली, १९ एप्रिल – शहीद हेमंत करकरे यांच्यासंदर्भात…

रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू संशयास्पद

रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू संशयास्पद

•खुनाचा गुन्हा दाखल, नवी दिल्ली, १९ एप्रिल – उत्तरप्रदेश…

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:08 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » खुलासा करा, नाहीतर राजीनामा द्या

खुलासा करा, नाहीतर राजीनामा द्या

राफेल प्रकरणावरून राहुल गांधींचा मोदींवर हल्ला,
नवी दिल्ली, ११ ऑक्टोबर –

Rahul Gandhi 7

Rahul Gandhi 7

राफेल व्यवहारासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुलासा करावा, अन्यथा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज गुरुवारी केली. राफेल व्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार करत राहुल गांधी यांनी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन् यांच्या आकस्मिक फ्रान्स दौर्‍यावरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले.
काँग्रेस मुख्यालयात आज पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी राफेलच्या मुद्यावरून मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. राफेल व्यवहारासंदर्भात जी नवीन माहिती बाहेर आली, ती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानी यांच्या खिशात सरळसरळ ३० हजार कोटी टाकल्याचे स्पष्ट होते, याकडे लक्ष वेधत गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या सांगण्यावरूनच राफेल व्यवहारात अनिल अंबानी यांना सहभागी करून घेतले, असे फ्रान्समधील मीडियापार्ट या वेबसाईटने डसाँ या कंपनीच्या सीनियर एक्झिक्युटिव्हचा हवाला देत आपल्या एका लेखात म्हटले आहे.
राफेलचा मोठा सौदा डसाँला मिळाला आहे, त्यामुळे आता भारत सरकारला हवे तसेच डसाँ कंपनी बोलणार आहे, असा आरोप करत गांधी म्हणाले की, मात्र डसाँ कंपनीच्या अंतर्गत कागदपत्रातून मोदींच्या सांगण्यावरूनच अनिल अंबानी यांच्या कंपनीला या व्यवहारात सहभागी करून घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे, ते कोणाला नाकारता येणार नाही. निर्मला सीतारामन् फ्रान्सच्या दौर्‍यावर गेल्या, असे ऐकत आहे, अशी कोणती आणिबाणीची परिस्थिती उद्भवली की निर्मला सीतारामन् यांना तडकाफडकी फ्रान्सच्या दौर्‍यावर जावे लागले, अशी विचारणा करत गांधी म्हणाले की, निर्मला सीतारामन् डसाँच्या कारखान्यालाही भेट देणार असल्याचे समजते.
गांधी परिवारच भ्रष्टाचारी; भाजपाचा पलटवार
पूर्ण गांधी परिवाराच भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे, दलाली घेतल्याशिवाय आतापर्यंत एकही संरक्षण सौदा त्यांनीं होऊ दिला नाही. त्यामुळे दुसर्‍यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही, असे भाजपा प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी आज स्पष्ट केले.
भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत डॉ. संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांच्या खोडसाळ आरोपांचा खरपूस समाचार घेतला. निराधार आणि खोडसाळ आरोप करुन देशात संभ्रमाचे वातावरण निर्माण करत आपल्या राजकीय स्वार्थाची इमारत उभी करण्याचा राहुल गांधी यांचा हा प्रयत्न आहे. राफेलप्रकरणी आपल्याजवळ ठोस असे कागदपत्र आहेत, असा दावा राहुल गांधी करतात. त्यांच्याजवळ एवढी कागदपत्रे आहेत, तर ते सर्वोच्च न्यायालयात का जात नाहीत? राहुल गांधी स्वत:ला देशाचे सर्वोच्च न्यायालय, भारत आणि फ्रान्स सरकार तसेच एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांच्यापेक्षा वरचढ समजत देशाच्या सुरक्षेशी खेळत आहे, असा आरोप करत पात्रा म्हणाले की, राहुल गांधी एका दलाल कुटुंबातील आहे आणि त्यांना प्रत्येक प्रकरणात दलालीशिवाय काही सुचतच नाही. राफेलमध्ये त्यांना दलाली न मिळाल्यामुळेच ते या व्यवहारावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत देशाच्या सुरक्षेशी खेळत आहे.

Posted by : | on : 12 Oct 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (1020 of 2394 articles)

Ed Dierctorate Of Enforcement1
दिल्ली, ११ ऑक्टोबर - आयएनएक्स मीडिया प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कार्ती चिदम्बरम् ची भारत, इंग्लंड आणि स्पेनमधील ५४ कोटी रुपयांची ...

×