ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » गुन्हेगारी पार्श्वभूमी तीन वेळा प्रसिद्ध करणे अनिवार्य

गुन्हेगारी पार्श्वभूमी तीन वेळा प्रसिद्ध करणे अनिवार्य

निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना बजावले,
नवी दिल्ली, ११ ऑक्टोबर –

Election Commission Final

Election Commission Final

निवडणूक लढवू इच्छिणार्‍या उमेदवारांनी प्रसारमाध्यमातून आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती तीन वेळा जाहीर करणे निवडणूक आयोगाने अनिवार्य केले आहे. तसेच, राजकीय पक्षांनाही काही सूचना जारी केल्या आहेत.
या संदर्भात आयोगाने जारी केलेल्या आदेशानुसार, उमेदवारांना प्रचारकाळात किमान तीन वेळा वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणीच्या माध्यमातून संबंधित माहितीच्या जाहिराती प्रसिद्धीस द्याव्या लागतील. याशिवाय, राजकीय पक्षांनाही त्यांच्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीविषयीची माहिती त्यांच्या संकेतस्थळांवरून द्यावी लागणार आहे. तसे न करणार्‍या पक्षांची मान्यता काढून घेण्याचा किंवा स्थगित करण्याचा इशारा आयोगाने दिला आहे.
उमेदवारांनी त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबतची माहिती प्रसारमाध्यमांमधून जाहीर करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिला होता.
उमेदवाराबाबत मतदारांना निर्णय घेता यावा या उद्देशातून तो आदेश देण्यात आला. त्याला अनुसरून निवडणूक आयोगाने सदर निर्णय घेतला आहे. आयोगाच्या आदेशामुळे उमेदवारांना दोषी ठरलेल्या प्रकरणांची आणि प्रलंबित बाबींची माहिती त्यांच्या पक्षांना द्यावी लागणार आहे. वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींची कात्रणे उमेदवारांना सादर करावी लागतील, तर पक्षांना गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्‍या उमेदवारांची संख्या नमूद करावी लागेल. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसणार्‍या उमेदवारांना त्याविषयीचा उल्लेख करावा लागेल. त्यासाठी उमेदवारांना यापुढे सुधारित अर्ज (क्रमांक २६) भरावा लागेल.
खर्चही उमेदवारांच्या माथी
उमेदवारांना त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीविषयीची माहिती असणारी जाहिरात स्वत:च्याच खिशांमधून भरावी लागणार का, ते निवडणूक आयोगाच्या आदेशातून स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, संबंधित जाहिराती निवडणूक खर्चाशी निगडित असल्याने उमेदवारांनाच त्याचा भार उचलावा लागेल, असे आयोगाच्या सूत्रांनी नमूद केले. लवकरच मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोरम आणि तेलंगण राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांच्या प्रचारकाळात राजकीय पक्ष आणि उमेदवारांना आयोगाच्या नव्या आदेशाचे पालन करावे लागणार आहे.

Posted by : | on : 12 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (677 of 2053 articles)

Pm Narendra Modi 3
दिल्ली, ११ ऑक्टोबर - चौथ्या औद्योगिक क्रांतीतील भारताचे योगदान जगाला स्तिमित करणारे ठरेल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ...

×