ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » गोन्साल्विस, फरेरा यांना अटक

गोन्साल्विस, फरेरा यांना अटक

►जामीन फेटाळताच पोलिसांची कारवाई
►भारद्वाजला आज ताब्यात घेणार,
पुणे, २६ ऑक्टोबर –

Gonsalvis Pharera Pune Court

Gonsalvis Pharera Pune Court

कोरेगाव भीमा येथे यावर्षीच्या जानेवारीत झालेल्या हिंसाचारापूर्वी पुण्यात आयोजित एल्गार परिषदेचा माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेले सुधा भारद्वाज, अरुण फरेरा, वेर्नान गोन्सालविस यांचा जामीन अर्ज पुणे न्यायालयाने आज शुक्रवारी फेटाळून लावला. त्यानंतर लगेच पोलिसांनी गोन्साल्विस आणि फरेरा यांना अटक करून कोठडीत पाठविले, तर भारद्वाजला उद्या शनिवारी अटक करण्यात येणार आहे.
पुणे पोलिसांनी २८ ऑगस्ट रोजी या तिघांसह पी. वरवरा राव आणि गौतम नवलखा अशा एकूण पाच जणांना माओवाद्यांचे समर्थक असल्याच्या आरोपात अटक केली होती. त्याच दिवशी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते आणि न्यायालयाने त्यांना त्यांच्या घरातच नजरकैद ठेवण्याचा आदेश दिला होता. यातील तिघांची नजरकैद आज संपणार असल्याने, त्यांच्या अटकेची शक्यता वाढली आहे. त्यामुळे आणखी सात दिवसांसाठी आपली नजरकैद वाढविण्यात यावी, यासाठी या तिघांनी पुण्याच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता.
त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्या. के. डी. वडाने यांनी त्यांचा जामीन अर्ज व नजरकैद वाढविण्याची विनंती फेटाळून लावली. हे तिघेही माओवादी कारवायांशी संलग्न असल्याचे भक्कम पुरावे आमच्याकडे आहेत. माओवादी गटांसाठी नामांकित महाविद्यालयांमधून तरुणांची निवड करणे, त्यांची भरती करणे आणि त्यांना विशेष प्रकारच्या प्रशिक्षणासाठी पाठविणे यासारख्या कारवायांमध्ये हे लोक सहभागी आहेत, असा दावा पुणे पोलिसानी केला. न्यायालयाने पोलिसांचा दावा मान्य केला. तुमच्याविरोधात ठोस पुरावे असल्याचेच दिसून येत आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. यानंतर पोलिसांनी फरेरा आणि गोन्साल्विस यांना अटक केली. भारद्वाजला उद्या अटक केली जाऊ शकते, असे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने सांगितले.
दिल्ली उच्च न्यायालयाने यापूर्वीच गौतम नवलखाची नजरकैद उठवली आहे, तर रावने पोलिस कारवाईला हैदराबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे या दोघांच्याही जामिनावर पुण्यात निर्णय होणार नाही.

Posted by : | on : 27 Oct 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (420 of 1862 articles)

Alokkumar Verma
न्यायालयाचे सीव्हीसीला निर्देश, नवी दिल्ली, २६ ऑक्टोबर - भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले सीबीआयचे संचालक आलोककुमार वर्मा यांच्याविरुद्धची ...

×