जम्मू-काश्मिरात राज्यपाल राजवट

जम्मू-काश्मिरात राज्यपाल राजवट

►राष्ट्रपतींची मंजुरी, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २० जून – जम्मू-काश्मिरात…

पुरस्काराचा महाराष्ट्री ‘योग’

पुरस्काराचा महाराष्ट्री ‘योग’

►विश्‍वास मंडलिक, योगसंस्थेची पंतप्रधान योग पुरस्कारासाठी निवड, तभा वृत्तसेवा…

विरोधकांचे नेतृत्व राहुल गांधींकडेच हवे : शीला दीक्षित

विरोधकांचे नेतृत्व राहुल गांधींकडेच हवे : शीला दीक्षित

वृत्तसंस्था नवी दिल्ली, २० जून – आगामी सार्वत्रिक निवडणुकीत…

भारत-फ्रान्स उभारणार मजबूत भागीदारी

भारत-फ्रान्स उभारणार मजबूत भागीदारी

►परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची माहिती, वृत्तसंस्था पॅरीस, १९ जून…

भारतच अमेरिकेचा मुख्य संरक्षण भागीदार

भारतच अमेरिकेचा मुख्य संरक्षण भागीदार

►७१६ अब्ज डॉलर्सच्या विधेयकाला सिनेटची मंजुरी, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १९…

जपानमध्ये शक्तिशाली भूकंप, तीन ठार

जपानमध्ये शक्तिशाली भूकंप, तीन ठार

►२०० पेक्षा जास्त जखमी, वृत्तसंस्था टोकयो, १८ जून –…

राज्यात नवीन फळबाग लागवड योजना

राज्यात नवीन फळबाग लागवड योजना

►अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना ►राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, तभा वृत्तसेवा मुंबई,…

डीएसके प्रकरणी महाबँकेच्या एमडीला अटक

डीएसके प्रकरणी महाबँकेच्या एमडीला अटक

►आणखी सहा जण ताब्यात, वृत्तसंस्था पुणे, २० जून –…

पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच

पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, तभा वृत्तसेवा मुंबई, १९ जून…

आंबेडकरी चळवळीचे अपहरण

आंबेडकरी चळवळीचे अपहरण

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | पुण्याच्या पोलिसांनी…

वृत्तींवर विजय मिळवणारा योग

वृत्तींवर विजय मिळवणारा योग

॥ विशेष : वैद्य सुयोग दांडेकर | २१ जून…

कैरानाच्या पश्‍चात…

कैरानाच्या पश्‍चात…

॥ रोखठोक : हितेश शंकर | केरळमध्ये सुरू असलेले…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 05:54 | सूर्यास्त: 19:03
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » चारही मुद्रणालयांमध्ये अहोरात्र नोटछपाई

चारही मुद्रणालयांमध्ये अहोरात्र नोटछपाई

►५०० व २०० च्या नोटांवर भर,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १९ एप्रिल –
सध्या देशभरातील एटीएममध्ये निर्माण झालेल्या रोख रकमेच्या टंचाईवर मात करण्यासाठी देशातील सर्व चारही मुद्रणालयांमध्ये अहोरात्र छपाईचे काम सुरू असून, सरकारने सध्या ५०० आणि २०० रुपयांच्या नोटा छापण्यावर विशेष भर दिला आहे, अशी माहिती अर्थमंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
देशभरात सध्या ७० हजार कोटींच्या नोटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच देशातील चारही शासकीय मुद्रणालयांमध्ये नोटांच्या छपाईचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. यातही ५०० व २०० रुपयांच्या नोटा जास्त प्रमाणात छापल्या जात आहेत. दररोज किमान १९ तास कर्मचारी काम करीत आहेत. त्यांना केवळ तीन तासांचीच विश्रांती दिली जात आहे, असे या अधिकार्‍याने सांगितले.
गेल्या काही दिवसांत एटीएममधून मोठ्या प्रमाणात नोटा काढण्याचे सत्रच नागरिकांनी सुरू केले होते. यामुळे एटीएममध्ये नोटांची टंचाई निर्माण झाली होती. ती दूर करण्यासाठी दिवस-रात्र काम सुरू आहे. कर्मचार्‍यांना सुट्याही नाकारण्यात आलेल्या आहेत.
साधारणपणे नोटांच्या छपाईची प्रक्रिया १५ दिवस चालत असते. सोमवारपासून ही प्रक्रिया युद्धपातळीवर हाती घेण्यात आली असल्याने आगामी ८ ते १० दिवसांमध्ये नोटांची टंचाई दूर झालेली असेल, असे हा अधिकारी म्हणाला.
दोन दिवसांत समस्या सुटेल : स्टेट बँक
भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी, येत्या दोन दिवसांतच नोटांच्या टंचाईची समस्या सुटलेली असेल, असा विश्‍वास व्यक्त केला. आमच्याकडे मोठ्या प्रमाणात नोटा उपलब्ध झालेल्या असून, टंचाई असलेल्या भागांमध्ये त्या वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असे रजनीश कुमार यांनी सांगितले. देशाच्या सर्वच भागांमध्ये नोटांची टंचाई निर्माण झालेली नाही. काही विशिष्ट राज्यांमध्येच ही समस्या आहे. उद्या शुक्रवारी सायंकाळपर्यंत ही समस्या बर्‍याच प्रमाणात दूर झालेली असेल, असे ते म्हणाले.
बँक कर्मचार्‍यांचा संपाचा इशारा
नोटांच्या टंचाईचा निषेध करीत, अ. भा. बँक कर्मचारी संघटनेने देशव्यापी संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. या स्थितीसाठी केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकच जबाबदार असल्याचा आरोपही संघटनेने केला. एटीएममध्ये नोटा नसल्याने संतप्त ग्राहक कर्मचार्‍यांवर चालून जात आहेत. कर्मचार्‍यांची कुठलीच चूक नसतानाही त्यांना जनतेच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. सत्यता अशी आहे की, ही स्थिती सरकार आणि आरबीआयने निर्माण केली आहे, असा आरोप महासंघाचे महासचिव सी. एच. व्यंकटचलम् यांनी केला.

Posted by : | on : Apr 20 2018 | Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0.
Both comments and pings are currently closed.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (268 of 2430 articles)


►सुप्रीम कोर्टाने जम्मू-काश्मीरच्या वकिलांना खडसावले, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १९ एप्रिल - तुमच्याजवळ केवळ वकिली पेशाचा अधिकार आहे, न्यायालयाचे कामकाज किंवा ...

×