ads
ads
तिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक

तिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक

►हवाईदल प्रमुख धानोआ यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर…

‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

►६८ टक्के लाभार्थ्यांनी घेतला फायदा, नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर…

फक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा

फक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा

►एनआरसीमध्ये समावेश करण्याचा मुद्दा, गुवाहाटी, १८ नोव्हेंबर – राष्ट्रीय…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

१३ विधेयके सादर होणार

१३ विधेयके सादर होणार

►आजपासून मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ►मराठा आरक्षणाचे विधेयकही सादर…

वरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता

वरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता

►पुणे पोलिसांचा न्यायालयात दावा ►आठ दिवसांची पोलिस कोठडी, पुणे,…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:35 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » चौथ्या ‘बिम्सटेक’ परिषदेचा समारोप

चौथ्या ‘बिम्सटेक’ परिषदेचा समारोप

वृत्तसंस्था
काठमांडू, ३१ ऑगस्ट –

Bimestec4th

Bimestec4th

नेपाळमध्ये आज चौथ्या ‘बिम्सटेक’ परिषदेचा समारोप झाला. यावेळी नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी अध्यक्षपदाची सूत्रे श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपला सिरिसेना यांना सोपवली.
काठमांडू येथे झालेल्या दोन दिवसीय ‘बिम्सटेक’ परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर सदस्य राष्ट्रांच्या नेत्यांसह उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर सदस्य राष्ट्रांनी दिलेल्या वचनामुळे ‘बिम्सटेक’ प्रक्रियेला नवजीवन मिळाले आहे. काठमांडूमधील ही परिषद यशस्वी झाली, असे ट्विट परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी केले.
काठमांडू येथे झालेल्या परिषदेचे अध्यक्ष पंतप्रधान ओली यांनी काठमांडू जाहीरनाम्याचा मसुदा सादर केला. हा मसुदा सदस्यराष्ट्रांनी एकमताने स्वीकारला.
बंगाल उपसागर प्रदेशात शांतता प्रस्थापित करून विकास साधण्यासाठी सामूहिक दृष्टिकोन आणि वैचारिक लक्ष्य काठमांडू जाहीरनाम्यात साध्य करण्यात आले आहे, असे ओली यांनी सांगितले. या परिषदेमध्ये ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी ‘बिम्सटेक’ ग्रीड इंटरकनेक्शन सामंजस्य करारावर स्वाक्षरीही करण्यात आली.
पुढील ‘बिम्सटेक’ परिषद श्रीलंकेत आयोजित करण्यात येत असून, या आयोजनाबाबत पंतप्रधान ओली यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती सिरिसेना यांचे आभार मानले.
‘बिम्सटेक’मध्ये भारत, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, भूतान आणि नेपाळचा समावेश असून, जगातील एकूण लोकसंख्येच्या २२ टक्के लोकसंख्या या देशांतील आहे. या देशांची एकत्रित अर्थव्यवस्था २.८ लाख कोटी डॉलर्सची आहे.
पंतप्रधान मोदी यांची तीन देशांसोबत द्विपक्षीय चर्चा
चौथ्या ‘बिम्सटेक’ परिषदेसाठी नेपाळ दौर्‍यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज द्विपक्षीय चर्चेचा धडाका लावला. सर्वप्रथम त्यांनी थायलंडचे पंतप्रधान प्रायूट चॅन-ओ-चा यांच्यासोबत, त्यानंतर म्यानमारचे राष्ट्रपती विन मिंट यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली.
प्रायूट चॅन-ओ-चा यांच्यासोबत यशस्वी बैठक झाली. भारत व थायलंडमधील सहकार्य वाढवण्याचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी होता. दोन्ही देशांतील नागरिकांना लाभ मिळावा यादृष्टीने चर्चा करण्यात आली, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून दिली. अशाच प्रकारचे ट्विट परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेही केले आहे. या दोन्ही देशांचे नेते ‘बिम्सटेक’ परिषदेसाठी उपस्थित होते.
द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी थायलंडचे पंतप्रधान प्रायूट चॅन-ओ-चा यांच्यासोबत चर्चा केली, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिली. मोदी यांनी भूतानच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार डॅशो शेरिंग वांगचूक यांच्यासोबतही चर्चा केली.

Posted by : | on : 1 Sep 2018
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (410 of 1765 articles)


घोटाळा झाल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा ठपका, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ३१ ऑगस्ट - सरकारी कार्यालये आणि मंत्रालयांमध्ये कर्मचार्‍यांची भरती करण्याकरिता मागील वर्षी ...

×