जगन्नाथ मंदिरात सशस्त्र पोलिसांना प्रवेश नाही
11 Oct 2018►सर्वोच्च न्यायालयाचा आदेश,
नवी दिल्ली, १० ऑक्टोबर –
पुरी येथील जगन्नाथ मंदिरात कोणत्याही पोलिसाला पायात जोडे घालून आणि हातात शस्त्र घेऊन प्रवेश करता येणार नाही, असा स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवारी दिला.
या मंदिरात भाविकांसाठी रांगेत येण्याची व्यवस्था लागू करण्यात आल्यानंतर त्याच्या निषेधार्थ ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या आंदोलनात हिंसाचार उफाळून आला होता. या हिंसाचारप्रकरणी ४७ लोकांना अटक करण्यात आली असून, स्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती ओडिशा सरकारने आजच्या सुनावणीत दिली. यानंतर न्या. मदन बी. लोकूर आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या दोन सदस्यीय न्यायासनाने उपरोक्त आदेश दिले. मंदिराच्या आत हिंसाचाराची कुठलीही घटना घडलेली नाही. मंदिरापासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या मंदिर प्रशासनाच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली होती, अशी माहितीही ओडिशा सरकारतर्फे देण्यात आली. याचिका दाखल करणार्या स्यवंसेवी संस्थेच्या वकिलाने आपली बाजू मांडताना, हिंसाचाराच्या काळात सशस्त्र पोलिस पायात बूट घालून मंदिरात शिरले होते, असा दावा केला.

Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry