ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » जगातील सर्वात उंच पुतळ्याचे लोकार्पण

जगातील सर्वात उंच पुतळ्याचे लोकार्पण

►सरदार पटेल यांच्या अंगी शिवरायांचे शौर्य अन् कौटिल्याची कूटनीती : पंतप्रधान,
केवडिया, ३१ ऑक्टोबर –

Modi Dedicates World S Tallest Statue Of Sardar Patel To Nation

Modi Dedicates World S Tallest Statue Of Sardar Patel To Nation

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अंगी शिवरायांचे शौर्य आणि कौटिल्याची कूटनीती होती, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १८२ मीटर उंचीच्या पुतळ्याचे लोकार्पण करताना सांगितले. धैर्य आणि भारताचे विभाजन टाळण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी वल्लभभाई पटेल नेहमीच स्मृतीत राहतील असे त्यांनी सांगितले.
स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या लोकार्पण कार्यक्रमास गुजरातचे राज्यपाल ओ. पी. कोहली, मुख्यमंत्री विजय रूपानी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची उपस्थिती होती. लोहपुरुष या नावाने ओळखल्या जाणार्‍या वल्लभभाई पटेल यांच्या १४३ व्या जयंतीचा योग साधून आज त्यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले.
हा पुतळा ऐक्याचे प्रतीक आहे आणि याच भावनेतून आपण समोर जाऊन एक भारत, श्रेष्ठ भारत निर्माण करणे आवश्यक असल्याचे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.
भारताच्या अस्तित्वावर प्रश्‍न निर्माण करणार्‍या लोकांना, हा देश शास्वत असून, तो शास्वत राहील याची सदोदित आठवण हा पुतळा देत राही, असेही त्यांनी सांगितले.
सशक्त, सतर्क आणि समावेशी भारत घडवण्याचे स्वप्न सरदार पटेल यांनी पाहिले. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सरदार पटेल यांच्या पुतळ्याच्या निर्मितीबाबत झालेल्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी सांगितले की, सरदार पटेल यांच्यासारख्या महान नेत्यांची स्तुती करतानाही भाजपाला टीकेचा सामना करावा लागतो. महान नेत्यांची स्तुती करणे हा गुन्हा आहे का, असा प्रश्‍न त्यांनी या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित असलेल्या नागरिकांना केला.
भारताला एकसंध राखणारा नेता योग्य त्या मानाचा अधिकारी आहे आणि तो मान या नेत्याला देण्याची भावना कोट्यवधी लोकांमध्ये होती. देशात दुफळी निर्माण करण्याचा हेतू ठेवणार्‍यांना चोख प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी आता नागरिकांवर आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
भारतातील भावी पिढी धैर्य, क्षमता आणि दृढ निश्‍चय अंगी बाणलेली आहे. ती भारत मातेला छिन्नविछिन्न करण्याचा कट रचणार्‍यांना चोख प्रत्युत्तर देईल, याची जाणीव हा जगातील सर्वाधिक उंच असलेला हा पुतळा समस्त जगाला करून देत असल्याचे त्यांनी सांगितले.
सरदार पटेल यांनी भारत अखंड ठेवला नसता, तर आज गिर अभयारण्यातील सिंह पाहण्यासाठी, सोमनाथमध्ये प्रार्थना करण्यासाठी किंवा हैदराबाद येथील चारमिनार पाहण्यासाठी व्हिसाची गरज भासली असती, असे त्यांनी सांगितले.
स्टॅच्यू ऑफ युनिटी देशातील अभियांत्रिकी आणि तांत्रिक क्षमतेचे प्रतीक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ज्याप्रमाणे देशातील राजेशाही संपुष्टात आणून सरदार वल्लभभाई पटेल यांनी भौगोलिकदृष्ट्या देश एकसंघ केला, त्याचप्रमाणे भाजपाने जीएसटी आणून देशात आर्थिक एकवाक्यता आणली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शेतकर्‍यांचे कौतुक
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांची स्तुुती करीत, पुतळा उभारण्यासाठी लाखो शेतकरी एकत्र आले. त्यांनी त्यांच्या जमिनी आणि साहित्य हा पुतळा उभारण्यासाठी दिले. शेतकर्‍यांनी सरदार पटेल यांचा पुतळा उभारण्यासाठी लाखमोलाची मदत केल्याचे त्यांनी सांगितले.
पुतळा उभारण्यासाठी वापरलेले साहित्य
सिमेंट – ७०,००० टन
प्रक्रिया केलेेले पोलाद – १८,५०० टन
कच्चे पोलाद – ६००० टन
कांस्य- १७०० टन

Posted by : | on : 1 Nov 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (398 of 1862 articles)

The World Bank
वर्षात २३ स्थानांची झेप, नवी दिल्ली, ३१ ऑक्टोबर - जागतिक बँकेने आज बुधवारी जाहीर केलेल्या उद्योगस्नेही (इझ ऑफ बिझिनेस) देशांच्या ...

×