ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » जगातील सर्वात मोठ्या आरोग्य योजनेचा शुभारंभ

जगातील सर्वात मोठ्या आरोग्य योजनेचा शुभारंभ

►आयुष्यमान भारत,
रांची, २४ सप्टेंबर –

Pmjay Modi

Pmjay Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी झारखंडच्या रांची येथे ‘आयुष्यमान भारत’ या जगातील सर्वांत मोठ्या आरोग्य योजनेचे लोकार्पण केले. या योजनेंतर्गत १० कोटी गरीब कुटुंबांतील सुमारे ५० कोटी लोकांना ५ लाख रुपयांचा कॅशलेस आरोग्य विमा उपलब्ध केला जाणार आहे.
या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या संपूर्ण युरोपीय समूहाच्या एकूण लोकसंख्येइतकी आहे. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांच्या एकूण लोकसंख्येची बेरीज, या योजनेतील लाभार्थ्यांच्या जवळपास जाणारी असेल.
तथापि, या योजनेच्या नावावर आक्षेप घेत, ती लागू करण्यास नकार देणार्‍या सहा राज्यांतील नागरिकांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे. यात तेलंगणा, बंगाल, ओडिशा, दिल्ली, केरळ आणि पंजाबचा समावेश आहे. देशातील २९ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील ४४५ जिल्ह्यांमध्ये रविवारपासून ही योजना लागू झाली आहे.
या योजनेशी जोडली गेलेली व्यक्ती कोणत्याही राज्यात योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे. आतापर्यंत देशभरातील १३ हजारांवर रुग्णालये योजनेशी जोडली गेली आहेत. कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंड, यकृत, मधुमेह यासह १३०० पेक्षा जास्त आजारांवर उपचार होणार आहेत. गंभीर आजारांवर केवळ सरकारीच नव्हे तर खाजगी रुग्णालयांमध्येही उपचार होणार आहेत. यात आरोग्य तपासणी, औषधे आणि रुग्णालयात दाखल होण्यासह त्यापूर्वीचा खर्चही समाविष्ट आहे. आधीपासून आजारी असलेली व्यक्तीही या समाविष्ट असेल. या योजनेद्वारे १३ हजार सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये गरिबांसाठी २.६५ लाख खाटा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
९८ टक्के लाभार्थ्यांची ओळख निश्‍चित
या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी राष्ट्रीय आरोग्य संस्थेकडे सोपविण्यात आली आहे. या योजनेंतर्गत ९८ टक्के लाभार्थ्यांची ओळख पटविण्यात आली असून, त्यांना योजनेच्या लाभाबाबतची माहिती देणारे पत्रही पाठविण्यात आले आहे. हे पत्र संबंधित रुग्णालयात दाखवल्यास रुग्णाची ओळख पटवून उपचार केले जाणार आहेत. आयुष्यमान भारत योजनेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश अरोरा यांनी सांगितले की, आम्ही गेल्या महिन्यात २६ राज्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर काम केले आणि त्यात यश आले. आतापर्यंत १० हजारापेक्षा जास्त लोकांना गोल्ड कार्ड पाठविण्यात आले आहेत.
१४ हजार आरोग्य मित्र
राष्ट्रीय आरोग्य संस्थेने या योजनेत सहभागी असलेल्या देशभरातील सरकारी व खाजगी रुग्णालयांमध्ये १४ हजारावर आरोग्य मित्रांना नियुक्त केले आहे. त्यांच्याकडे रुग्णांची ओळख पटविणे, त्यांना उपचारादरम्यान मदत करण्याचे काम असणार आहे. चौकशी आणि इतर माहितीसाठीही लाभार्थी त्यांच्याशी संपर्क साधू शकणार आहेत.
ही बालिका ठरली पहिली लाभार्थी
पंतप्रधान मोदी यांनी आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ केल्यानंतर झारखंडमध्ये रविवारी सायंकाळी जन्माला आलेली एक बालिका या योजनेची पहिली लाभार्थी ठरली आहे. या बालिकेचा जन्म सीझरिनद्वारे झाल्यानंतर तिची आई पूनम महातो यांना त्यांच्यावर झालेला १८,५०० रुपयांचा खर्च लगेच त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला.

Posted by : | on : 25 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (585 of 1862 articles)

Pakyong Airport Sikkim
पाक्योंग १००वे विमानतळ, पाक्योंग, २४ सप्टेंबर - बांधकाम तंत्रज्ञानाचा चमत्कार ठरलेले आणि चीन सीमेपासून अवघ्या ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या सिक्कीमच्या ...

×