भाजपा देशभर करणार जल्लोष

भाजपा देशभर करणार जल्लोष

►मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण ►२६ मे ते ११…

मान्सून आला रे! अंदमानात दाखल

मान्सून आला रे! अंदमानात दाखल

►केरळमार्गे महाराष्ट्राकडे वाटचाल, वृत्तसंस्था अंदमान बेट, २५ मे –…

‘सबको शिक्षा अच्छी शिक्षा’मोदी सरकारचा निर्धार

‘सबको शिक्षा अच्छी शिक्षा’मोदी सरकारचा निर्धार

►प्रकाश जावडेकर यांची माहिती ►समग्र शिक्षा अभियानाचा शुभारंभ ►विद्यार्थ्यांच्या…

इसिस दहशतवाद्यांच्या ४० बायकांना फाशी

इसिस दहशतवाद्यांच्या ४० बायकांना फाशी

►अवघ्या १० मिनिटात दिला निकाल, वृत्तसंस्था बगदाद, २४ मे…

पाकिस्तानात ‘आझादी’चे नारे

पाकिस्तानात ‘आझादी’चे नारे

►सिंधी विद्यार्थी रस्त्यावर उतरले, वृत्तसंस्था इस्लामाबाद, २३ मे –…

पाकिस्तानला हवा अटलजींसारखा नेता

पाकिस्तानला हवा अटलजींसारखा नेता

►माजी आयएसआय प्रमुखाचे मत , वृत्तसंस्था इस्लामाबाद, २२ मे…

भाजपाने जागा राखल्या, सेनेला २ जागा

भाजपाने जागा राखल्या, सेनेला २ जागा

►भुजबळांच्या माध्यमातून राष्ट्रवादीला धोबीपछाड, मुंबई, २४ मे – स्थानिक…

पेट्रोल, डिझेल जीएसटीअंतर्गत आल्यास दर कमी : मुख्यमंत्री

पेट्रोल, डिझेल जीएसटीअंतर्गत आल्यास दर कमी : मुख्यमंत्री

वृत्तसंस्था मुंबई, २४ मे – वस्तू आणि सेवा कराअंतर्गत…

निरंजन डावखरेंचा आमदारकीचा राजीनामा

निरंजन डावखरेंचा आमदारकीचा राजीनामा

तभा वृत्तसेवा मुंबई, २३ मे – राकाँचे कोकण पदवीधर…

झणझणीत कर्नाटकी ठेचा!

झणझणीत कर्नाटकी ठेचा!

॥ विशेष : विनोद देशमुख | मोदींनी अनेक सभा…

‘आत्मविलोपी’ मामासाहेब घुमरे!

‘आत्मविलोपी’ मामासाहेब घुमरे!

॥ प्रासंगिक : डॉ. कुमार शास्त्री | मामासाहेब घुमरे…

कर्नाटक निकाल सर्वांना इशारा देणारा!

कर्नाटक निकाल सर्वांना इशारा देणारा!

॥ रोखठोक : हितेश शंकर | कर्नाटकासाठी वेगळा झेंडा,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 05:53 | सूर्यास्त: 18:54
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » ‘जादा खुषी, थोडा गम’

‘जादा खुषी, थोडा गम’

श्यामकांत जहागीरदार
नवी दिल्ली, १ फेब्रुवारी –

Budget 2018 19

Budget 2018 19

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पातून देशातील गोरगरीब जनतेला तसेच शेतकर्‍यांना दिलासा देतांना पगारदार वर्गाची मात्र निराशा केली. त्याचवेळी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपालांना भरघोस पगारवाढ देताना खासदारांच्या स्थायी स्वरूपातील पगारवाढीचा मार्गही मोकळा केला. अर्थसंकल्पातून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला. त्यामुळे ‘जादा खुषी थोडा गम’असे या भाषणाचे वर्णन करावे लागेल.
अर्थमंत्री अरुण जेटली यांचा हा पाचवा अर्थसंकल्प होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधीचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे यातून लोकप्रिय घोषणाचा पाऊस पडेल, असा अंदाज होता. मात्र तो काही प्रमाणात खोटा ठरला. निवडणुकीवर डोळा ठेवत काही लोकप्रिय घोषणा अर्थसंकल्पातून निश्‍चितपणे करण्यात आल्या, मात्र त्याचवेळी देशाच्या तसेच अर्थव्यवस्थेच्या विकासाकडे दुर्लक्ष होणार नाही, याची खबरदारी अर्थसंकल्पातून घेण्यात आली.
अर्थसंंकल्प सादर करतांनाचे जेटली यांचे भाषण एक तास पन्नास मिनिटांचे होते. हे भाषण त्यांनी हिंदी आणि इंग्रजीतून केले. भाषणाचा काही भाग त्यांनी हिंदीतून वाचला तर काही इंग्रजीतून. सामान्यपणे आतापर्यंतच्या सर्व अर्थमंत्र्यांनी इंग्रजीतून अर्थसंकल्पाचे भाषण केले. मात्र देशाच्या इतिहासात प्रथमच जेटली यांनी अर्थसंकल्पाचे भाषण हिंग्लिश भाषेत म्हणजे हिंदी आणि इंग्रजीत सादर करत नवा पायंडा पाडला. जेटली यांनी सुरुवातीला उभे राहून भाषण केले. नंतर मात्र बसून त्यांनी उर्वरित भाषण वाचले. भाषणाचा समारोप त्यांनी पुन्हा उभे राहून केला.
जेटली अर्थसंकल्प सादर करत असतांना त्यांच्या एका बाजूला केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, तर दुसर्‍या बाजूला भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी बसले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्ताधारी बाजूच्या पहिल्या रांगेतील पहिल्या आसनावर बसले होते. त्यांच्या बाजूूच्या आसनावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज होत्या. जेटली यांचे अर्थसंकल्पाचे भाषण संपल्यावर मोदी यांनी हस्तांदोलन करत त्यांचे अभिनंदन केले. नंतर अनेक केंद्रीय मंत्री आणि खासदारांनी जेटली यांना घेरत अर्थसंकल्पासाठी त्यांचे अभिनंदन केले.
तृणमूल काँग्रेसचे सौगत रॉय आणि अन्य सदस्यांनी जेटली यांचे भाषण सुरू असतांना शेतकर्‍यांच्या आत्महत्या तसेच अन्य मुद्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्पाचे भाषण रंजक करण्यासाठी सर्वच अर्थमंत्री शेरेशायरीचा मुक्त वापर करत होते, मात्र यावेळच्या जेटली यांच्या अर्थसंकल्पाच्या भाषणात शेरोशायरीचा समावेश नव्हता. ‘सर्वे भवंतु सुखिन: सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणि पश्‍चंतु मा…’ हा संस्कृतमधील श्‍लोक जेटली यांनी वाचून दाखवला.
जेटली अर्थसंकल्पाचे भाषण वाचत असतांना भाजपा सदस्य अनेकवेळा बाके थपथपवून त्याचे स्वागत करत होते. २८ पानांचे अर्थसंकल्पाचे भाषण वाचतांना जेटली यांना अनेक वेळा पाणी प्यावे लागले. जेटली यांनी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपालांच्या पगारवाढीचा घोषणा करतांच विरोधी तसेच सत्ताधारी सदस्यांनी खासदारांच्या पगारवाढीचा मुद्दा उपस्थित केला. यामुळे थोडा गोंधळ झाला, अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना शांततेचे आवाहन करावे लागले. अर्थमंत्री जेटली यांनी, भाषणाचा पुढचा मुद्दा ऐका असे, म्हणत खासदारांच्या अपेक्षा उंचावल्या.
अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अर्थमंत्री जेटली १५ मिनिटे आधीच सभागृहात पोहोचले होते. दूरदर्शनच्या कॅमर्‍यात जेटलीसोबत दिसण्यासाठी त्यांच्या पाठीमागच्या रांगेतील मोक्याच्या जागा अनेक राज्यमंत्र्यानी आणि खासदारांनी प्रयत्नपूर्वक पकडल्या होत्या. संपुआच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यावेळी सभागृहात उपस्थित होते. जेटली यांचे अर्थसंकल्पाचे भाषण ऐकण्यासाठी त्यांच्या पत्नी आणि अन्य कुटुंबीय अध्यक्षांच्या गॅलरीत उपस्थित होते. राज्यसभा सदस्यांसाठीच्या गॅलरीत भाजपाचे डॉ. विनय सहस्रबुद्धे, अजय संचेती, डॉ. विकास महात्मे यांच्यासह अनेक राज्यसभा सदस्य उपस्थित होते.

Posted by : | on : Feb 2 2018 | Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0.
Both comments and pings are currently closed.

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (484 of 2299 articles)


नवी दिल्ली, १ फेब्रुवारी - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज गुरुवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क ...

×