ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » जीएसटी प्रणाली रुळली

जीएसटी प्रणाली रुळली

►चांगले परिणाम आता दिसतील : जेटली,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १ जुलै –

Narendra Modi Arun Jaitley Gst Bill Gst

Narendra Modi Arun Jaitley Gst Bill Gst

जीएसटीबाबत अनेक मोठ्या देशांना जे जमले नाही, ते भारताने करून दाखविले. कुठल्याही मोठ्या अडथळ्यांविना वस्तू व कर प्रणाली अर्थात् जीएसटी आपल्या देशात रुळली आहे. या नव्या कररचनेने समाजासाठी काय योगदान दिले आहे, हे अद्याप समोर आले नसले, तरी त्याचे चांगले परिणाम लवकरच दिसून येतील, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी केले.
आतापर्यंत ज्या देशांनी जीएसटी प्रणाली अंमलात आणली, त्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला होता. जीएसटीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवरही समस्या उद्भवतील, असे माझे स्वत:चे मत होते. जीएसटी स्थिर होण्यासाठी वेळ लागतो, याची मला जाणीव असल्याने जीएसटी लागू करण्यासंदर्भात मी स्वत: ‘अडथळे’ या शब्दाचा प्रयोग केला होता. पण, एका वर्षाच्या अनुभवानंतर, मीच तो शब्द वापरला होता काय, असा प्रश्‍न मला पडत आहे, असे जेटली यांनी जीएसटीच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितले.
आपल्या भारतात ज्या सहजतेने जीएसटीचा नागरिकांनी स्वीकार केला, ते अन्य कोणत्याही देशात घडले नाही. भारताने अवघ्या एका वर्षात जीएसटी अंतर्गत जे प्राप्त केले, ते कोणत्याही देशाने प्राप्त केले नाही. आता जीएसटीने समाजासाठी काय योगदान दिले, ते समोर येण्याची वेळ आलेली आहे, असेही जेटली म्हणाले.
आणखी करकपात होणार
जीएसटीमुळे देशात अप्रत्यक्ष करांची गुंतागुंत संपलेली आहे. यापुढे जीएसटीच्या टप्प्यांमध्ये आणखी सुलभता आणून नागरिकांना दिलासा देणार आहे, असे संकेत जेटली यांनी दिले. जीएसटीमुळे करसंकलनात वाढ झालीच, शिवाय आवश्यक वस्तू आणि सेवांवरील कर कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अग्रीम कर संकलनामुळे सकल उत्पन्नात वाढ झाली. जीएसटीमुळे भारत संघटित बाजारपेठ बनला आहे, असेही जेटली म्हणाले.
गेल्या वर्षी १ जुलै रोजी सरकारने देशातील सर्वात मोठी गुंतागुंतीची कर प्रणाली संपुष्टात आणली, तेव्हा अनेक प्रकारचे करपरतावे अस्तित्वात होते. करावर कर लागत असल्याने नागरिक त्रस्त होते. प्रत्येक राज्याचे स्वत:चे वेगवेगळे कराचे दर होते आणि त्यानुसार कर परतावा होत होता. देशाची संघराज्य रचना लक्षात घेऊन आम्ही देशभरात एकच करप्रणाली तयार केली, असे त्यांनी सांगितले.
दूध आणि मर्सिडिजवर एकच कर ठेवावा का? : जीएसटीच्या वर्षपूर्तिदिनी पंतप्रधानांचा विरोधकांना सवाल
जीएसटी अंतर्गत एकच करप्रणाली लागू करण्याची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी ठामपणे फेटाळून लावली. मर्सिडिज आणि दुधावर आपण एकसारखाच कर आकारू शकत नाही, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. याचवेळी त्यांनी अन्नधान्य आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंवर १८ टक्के समान कर आकारण्याची काँगे्रस पक्षाची मागणी मान्य केली.
गेल्या वर्षी आजच्याच दिवशी अर्थात् १ जुलै रोजी वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी व्यवस्था देशभरात लागू करण्यात आली होती. यासाठी ३० जून रोजी रात्री उशिरा संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते आणि तत्कालीन राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी यांनी मध्यरात्री बाराच्या ठोक्याला बटन दाबून जीएसटी लागू झाल्याची घोषणा केली होती.
जीएसटी व्यवस्थेत अवघ्या एकाच वर्षात अप्रत्यक्ष कराचा आधार सुमारे ७० टक्क्यांनी वाढला आहे. अनेक ठिकाणचे चुंगी नाके बंद झाले आणि १७ कर व २३ उपकर एकाच करव्यवस्थेत आणण्यात आले, अशी माहिती मोदी यांनी ‘स्वराज्य’ मासिकाला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली.
या नव्या करव्यवस्थेत अबकारी कर, सेवा कर आणि विविध राज्यांच्या व्हॅटचा समावेश आहे. अप्रत्यक्ष करप्रणाली सुलभ करून, ‘इन्स्पेक्टर राज’ कायमचा संपुष्टात आणण्यासाठीच जीएसटी लागू करण्यात आली आहे. जीएसटी ही सर्वंकष व्यवस्था असुन, यात राज्य सरकारे, व्यापारी आणि सर्व भागधारकांचे मत जाणून घेतले जाते, असे पंतप्रधान म्हणाले.
जीएसटी अंतर्गत एकच कररचना असावी, असे म्हणणे फार सोपे आहे. पण, याचा अर्थ असा आहे काय, की अन्नधान्यावर शून्य टक्के कर नसावा आणि दूध व मर्सिडिजकरिताही एकसारखाच कर आकारला जावा. काँगे्रसमधील आमचे मित्र जेव्हा असे सांगतात की, जीएसटीतील कररचना एकसारखीच असायला हवी, तेव्हा त्यांना असे म्हणायचे असते काय की, सद्यस्थितीत शून्य ते पाच टक्के कराच्या टप्प्यात असलेल्या अन्नधान्यावरही आता सरकारने १८ टक्के कर आकारावा, असा सवाल पंतप्रधानांनी आपल्या सुमारे पाऊण तासाच्या मुलाखतीत केला.
एका वर्षात ४८ लाख कंपन्यांची नोंदणी
देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हापासून गेल्या वर्षीपर्यंत एकूण ६६ लाख अप्रत्यक्ष करदात्यांची नोंदणी झाली होती, तिथेच जीएसटी लागू झाल्यानंतर अवघ्या वर्षभरात ४८ लाख नव्या कंपन्यांनी या अंतर्गत आपले नाव नोंदविले आहे. या वर्षभरात ३५० कोटी पावत्यांवर प्रक्रिया करण्यात आली असून, ११ कोटी कर परतावे भरले गेले आहेत, असे सांगताना, जीएसटी किचकट आहे, असा आरोप करणार्‍यांनी ही सत्यताही लक्षात घ्यायला हवी. केंद्र सरकारने आतापर्यंत ४०० वेगवेगळ्या वस्तूंवर करकपात केली असून, सुमारे १५० वस्तूंवरील कर रद्द करण्यात आला आहे, अशी माहितीही मोदी यांनी दिली.

Posted by : | on : 2 Jul 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (1188 of 2024 articles)

India Russia Flags
दबाव झुगारणार ►महत्त्वाच्या शहरांचे होणार संरक्षण, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १ जुलै - रशियाकडून अत्याधुनिक एस-४०० ट्रायम्फ एअर डिफेन्स क्षेपणास्त्र प्रणाली ...

×