ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » डिजिटल पडताळणीसाठी दूरसंचार कंपन्यांना दिलासा नाही

डिजिटल पडताळणीसाठी दूरसंचार कंपन्यांना दिलासा नाही

कोलकाता, ६ नोव्हेंबर –

Telecom Tower

Telecom Tower

ग्राहक पडताळणीसाठी दूरसंचार कंपन्यांनी आधारचा वापर करू नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर पर्यायी व्यवस्था उभारण्यासाठी ५ नोव्हेंबरपर्यंतची दिलेली मुदत वाढवण्यास दूरसंचार विभागाने नकार दिला. त्यामुळे व्होडाफोन-आयडिया, भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ इन्फोकॉमने नवी ग्राहक पडताळणी यंत्रणा उभारण्याचे काम सुरू केले आहे.
असे असले तरी, नवी यंत्रणा सुरू करेपर्यंत आधारचा वापर करूनच नव्या ग्राहकांचे ईकेवायसी (इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर) केले जाईल, असे दूरसंचार कंपन्यांच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. नव्या डिजिटल केवायसी यंत्रणेवर काम केले जात असून, ते देशभरात लागू केले जाईल, असेही अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. पर्यायी डिजिटल केवायसी यंत्रणा उभारण्यासाठी दूरसंचार विभागाने व्होडाफोन-आयडियाला परवानगी दिली आहे. अशा स्वरूपाची ही पहिलीच परवानगी असल्याची माहिती टेल्को कंपनीने एका निवेदनात दिली आहे.
व्होडाफोन-आयडिया कंपनीने अगोदरच दूरसंचार विभागाला या पर्यायी यंंत्रणेचे प्रात्यक्षिक दूरसंचार विभागाला दोन वेळा करून दाखवले होते आणि याची माहिती युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाला दिली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दिल्ली, पूर्व उत्तरप्रदेश आणि पश्‍चिम उत्तरप्रदेशातील सहा ते सात बाजारपेठांमधील नव्या ग्राहकांसाठी भारती एअरटेलने पर्यायी डिजिटल पडताळणी यंत्रणा आणली आहे. हीच यंत्रणा उर्वरित सर्कलमध्ये राबविली जाणार असल्याची माहिती या क्षेत्रातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. काही बाजारपेठांना पर्यायी डिजिटल केवायसी यंत्रणा देण्याची प्रक्रिया रिलायन्स जिओकडूनही राबवली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलने माहिती देण्यास नकार दिला.
नवी पडताळणी प्रक्रिया पेपरलेस राहणार आहे. यामध्ये ग्राहकांचा पत्ता आणि छायाचित्र असलेले ओळखपत्र स्कॅन करून घेतले जाणार आहे. ग्राहक पडताळणीसाठी पर्यायी व्यवस्था उभारण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने मागील आठवड्यात दूरसंचार विभागाकडे केली होती.

Posted by : | on : 7 Nov 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (53 of 1774 articles)

Rahul Gandhi
दिल्ली, ५ नोव्हेंबर - भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेच्या मुद्यावरून केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेत निर्माण झालेल्या वादात काँगे्रसने टीकेची झोड ...

×