ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:27 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » ‘डिजिटल परिवर्तन : एक नवीन औद्योगिक क्रांती’

‘डिजिटल परिवर्तन : एक नवीन औद्योगिक क्रांती’

►आज अभियंता दिन
►२०१८च्या अभियंता दिनाची संकल्पना,
तभा वृत्तसेवा
नागपूर, १४ सप्टेंबर –

Mokshagundam Vishveshwaryyaji

Mokshagundam Vishveshwaryyaji

भारतातील अभियंत्यांनी देशाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्याचे स्मरण म्हणून १५ सप्टेंबर देशभरात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. ‘डिजिटल परिवर्तन : एक नवीन औद्योगिक क्रांती’ ही यावर्षीच्या अभियंतादिनाची संकल्पना ठेवण्यात आली आहे. उद्या देशभरात अभियंता दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असला, तरी या क्षेत्रापुढील आव्हाने अलीकडील काळात अधिकच बिकट झालेली आहेत. आधीच्या काळात अभियांत्रिकी हा बारावी उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्याचा आवडीचा मार्ग असायचा, पण आता या वाटेवर जाणार्‍यांची संख्या कमालीची घटलेली आहे. कारणही तसेच आहे, प्रत्येक पाचपैकी दोन घरांमध्ये अभियांत्रिकीचा पदवीधर सापडतो, पण काम मिळत नसल्याने ‘बेकार अभियंता’ असा ठपका त्याच्यावर जडलेला असतो.
आधुनिक भारतात औद्योगिकीकरणाची मुहूर्तमेढ करणारे ‘भारतरत्न’ सर मोक्षगुंडम विश्‍वेश्‍वरैय्या यांचा १५ सप्टेंबर हा जन्मदिन. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस अभियंतादिन म्हणून साजरा करतात. विश्‍वेश्‍वरैया यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६१ रोजी कर्नाटकच्या चिकबल्लापूर तालुक्यातील मुद्देनहळ्ळी या गावी झाला. सर मोक्षगुंडम विश्‍वेश्‍वरय्या यांनी भारताच्या औद्योगीकरणाच्या मुहूर्तमेढीत अनेक यशस्वी प्रकल्प प्रस्थापित केले. त्यांनी केलेल्या कार्याने प्रभवित होऊन भारत सरकारने १९५५ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरिक सन्मानाने सन्मानित केले. ब्रिटिश सरकारनेही त्यांना ‘नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडियन एम्पायर’ हा सन्मान दिला होता.
‘अभियंता’ शब्दात अनेक क्षेत्रांचा समावेश
तसे पाहता जगभरातच वेगवेगळ्या तारखांना अभियंतादिन साजरा केला जातो. अभियंता या शब्दाच्या परिभाषेत इलेक्ट्रिकल, टेक्निकल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. त्यामुळे वेगवेगळे विभाग त्यांच्या परीने हा दिवस साजरा करतात. कंपन्यांचीही हा दिवस साजरा करण्याची पद्धत वेगळी असते. सरकारी कार्यालयांमध्ये प्रत्येक वर्षी या दिनाची नवीन संकल्पना तयार केली जाते, पण खाजगी कंपन्यांना ही संकल्पना मान्य असेलच, असे नाही. त्यामुळे अनेक खाजगी कंपन्या स्वत:ची वेगळी संकल्पना तयार करतात किंवा सरकारी संकल्पना स्वीकारतात. ‘डिजिटल परिवर्तन : एक नवीन औद्योगिक क्रांती’ ही यावर्षीच्या अभियंतादिनाची संकल्पना ठेवण्यात आली आहे.
विसाव्या व एकविसाव्या शतकातील अंतर
विसाव्या शतकात अभियंत्यांचे महत्त्व फार जास्त होते. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत अभियांत्रिकीकडे जाणार्‍यांचे प्रमाण फार जास्त होते, पण अलीकडील काळात अभियांत्रिकीकडे जाणार्‍यांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. यामागील कारण म्हणजे जेईई अर्थात् सामायिक प्रवेश परीक्षेचे कठीण होत असलेले स्वरूप. गेल्या १० वर्षांच्या काळात देशात १० नवीन आयआयटी स्थापन करण्यात आल्या. दर्जेदार अभियंत्यांची फळी तयार करणे हा यामागील प्रमुख उद्देश, पण या संस्थांमध्ये प्रवेश मिळवणे अत्यंत अवघड झाले आहे. सध्या देशात हैदराबाद, गोवा, मुंबई, दिल्ली, चेन्नई, कानपूर, गुवाहाटी, रुडकी, वाराणसी, रोपर, भुवनेश्‍वर, गांधीनगर, पाटणा, जोधपूर, मंडी, इंदूर, पलक्कड, तिरुपती, भिलई, खडगपूर येथे आयआयटी संस्था आहेत.
विद्यार्थ्यांची सुमार कामगिरी
गेल्या २० वर्षांच्या काळात अभियांत्रिकीचा ओढा असलेल्या विद्यार्थ्यांचा दर्जा खालावला आहे. यामागे अनेक कारणे आहेत. मात्र यातील प्रमुख कारण जेईई पद्धतीत झालेला बदल होय. अवघ्या एक मिनिटात एक प्रश्‍न सोडविण्यावर या परीक्षेत भर दिला जातो.
यामुळे विद्यार्थ्यांना योग्य उत्तर शोधण्यासाठी संपूर्ण प्रश्‍न न सोडवता, केवळ अंदाजाने अचूक रकाना चिन्हांकित करावा लागतो. त्यामुळे ही पद्धत अतिशय घातक ठरत आहे. त्यामुळे अभियांत्रिकी प्रवेशाकरिता असलेल्या जुन्याच पद्धतीकडे वळायचे काय, हा देखील आता महत्त्वाचा व चर्चेचा विषय ठरू पाहात आहे.
इतर देशातील अभियंतादिन
१. रोमानिया – १४ सप्टेंबर
२. अर्जेंटिना – १७ जून
३. ईराण – २४ फेब्रुवारी
४. इटली – १५ जून
५. तुर्की – ५ डिसेंबर

Posted by : | on : 15 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (1025 of 2234 articles)


प्रसाद यांचा पलटवार, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १३ सप्टेंबर - काँग्रेसच्या दबावामुळेच विजय मल्ल्याने अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतल्याचा ...

×