ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » तंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत

तंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत

►पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन,
नवी दिल्ली, ३० ऑक्टोबर –

Pm Modi With Italy Pm Conte

Pm Modi With Italy Pm Conte

भारताने माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील आपल्या कौशल्याचा विस्तार करतानाच तंत्रज्ञान विकासावरही भर दिला आहे. तंत्रज्ञानात आपला देश इतका सक्षम झाला आहे की, आता जगालाही भारताकडून मदतीची अपेक्षा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी भारत-इटली तंत्रज्ञान परिषदेत केले. इटलीचे पंतप्रधान ज्युसेपे कॉन्टे या परिषदेला विशेषत्वाने उपस्थित होते.
भारताचा अंतराळ कार्यक्रम जगात सर्वोत्कृष्ट आणि सर्वाधिक स्वस्त आहे. याचा अनुभव संपूर्ण जगासह इटलीला आला आहे. इटलीसह अनेक देशांचे उपग्रह अतिशय कमी खर्चात भारताने अंतराळात पाठविले आहेत, असे मोदी यांनी या परिषदेत सांगितले. भारताने तंत्रज्ञानाला सामाजिक न्याय, सशक्तीकरण, सर्व समावेशकता, सरकारी क्षेत्र आणि पारदर्शकतेचे माध्यम बनवले असल्याचे ते म्हणाले.
भारतात जन्मदाखल्यापासून पेन्शनपर्यंतच्या अनेक सुविधा आज तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकारांच्या ३०० पेक्षा अधिक सेवांना ‘उमंग अ‍ॅप’च्या माध्यमातून एकत्र आणण्यात आल्या आहेत. देशातील तीन लाखांपेक्षा जास्त समान सेवा केंद्र ऑनलाईन सेवा देत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
भारतात डिजिटल पेमेंटची वाढ वेगाने होत असून, याचा वेग महिन्याला २५० कोटी व्यवहार असा आहे. भारतात गेल्या ४ वर्षांत १ जीबी डेटाची किंमत ९० टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. त्यानुसार आमचे ध्येय आहे की, संशोधन आणि विकास कार्यक्रम हे केवळ संशोधन केंद्रांपर्यंत मर्यादित स्वरुपात न राहता लोकांपर्यंत पोहोचायला हवा, असेही ते म्हणाले.
इटलीच्या पंतप्रधानांचे स्वागत
दरम्यान, इटलीचे पंतप्रधान ज्युसेपे कॉन्टे यांचे आज मंगळवारी भारताच्या एक दिवसाच्या दौर्‍यावर दिल्लीत आगमन झाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ते भारत-इटली तंत्रज्ञान परिषदेत भाग घेण्यासाठी आपल्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासोबत भारतात आले आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत व्यापार, शिक्षण, अंतराळ, आरोग्य आणि गुंतवणूक अशा महत्त्वाच्या क्षेत्रात सहकार्य वाढीबाबत चर्चा केली.

Posted by : | on : 31 Oct 2018
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (81 of 1770 articles)

Sardar Patel Statue Of Unity
सर्वांत मोठा पुतळा, उंची १८२ मीटर, अहमदाबाद, ३० ऑक्टोबर - देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १८२ मीटर उंच ...

×