ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » तिहेरी तलाकविरोधी अध्यादेश काढला

तिहेरी तलाकविरोधी अध्यादेश काढला

►राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी,
नवी दिल्ली, १९ सप्टेंबर –

Muslim Womens Celebrates Triple Talaq Bill Passed In Loksabha

Muslim Womens Celebrates Triple Talaq ordinance

तिहेरी तलाक गुन्हा ठरवणार्‍या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या अध्यादेशावर स्वाक्षरी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर यासाठी पाऊल उचलणे आवश्यक झाले होते, असे विधी व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.
काँग्रेस पक्ष केवळ मतपेटीवर आधारित राजकारण करीत असून, या पक्षामुळे मुस्लिम महिलांच्या संरक्षण हक्कासाठी आणलेले विवाह विधेयक राज्यसभेत अडकले आहे, असा आरोप त्यांनी यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.
दखलपात्र गुन्हा दाखल करण्यासाठी पीडित महिला किंवा तिच्या नातेवाईकांना पोलिसांत तक्रार द्यावी लागेल, असे त्यांनी या अध्यादेशाबाबतच्या माहितीवरून विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. हा गुन्हा अजामीनपात्र असला, तरी खटला सुरू होण्यापूर्वी न्यायाधीशांकडून जामीन मिळवण्याचा अधिकार आरोपीला राहणार आहे. या अजामीनपात्र गुन्ह्यात पोलिस ठाण्यातून जामीन मिळू शकणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पीडितेची बाजू ऐकल्यावरच न्यायाधीश या प्रकरणात आरोपीला जामीन देऊ शकतील, असेही त्यांनी सांगितले.
पत्नीला नुकसानभरपाई देण्याची तयारी आरोपीने दर्शवल्यास न्यायाधीश त्याला जामीन देऊ शकतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. ही नुकसानभरपाई किती असेल, याचा निर्णय न्यायाधीशच घेतील.
या गुन्ह्यात तडजोडही केली जाऊ शकते. संबंधित महिलेने मान्यता दिल्यास याबाबतचा खटला न्यायाधीशासमोर जाण्यापूर्वी या गुन्ह्यात तडजोड केली जाऊ शकते, अशी माहिती त्यांनी दिली.
प्रस्तावित कायद्याप्रमाणे तिहेरी तलाक किंवा तलाक-ए-बिद्दतमध्ये पीडित महिला न्यायाधीशांकडे स्वतःसाठी व तिच्या मुलांसाठी निर्वाह भत्ता मागू शकेल. केवळ इतकेच नव्हे, तर मुलांचा ताबा मागण्याचा अधिकारही तिला असेल. मात्र, याबाबत अंतिम निर्णय न्यायाधीशच घेतील, असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.
प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केलेल्या वृत्तांनुसार आतापर्यंत तिहेरी तलाकची ४३० प्रकरणे समोर आली आहेत. या पैकी २२९ प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयापूर्वीची आहेत, तर २१० प्रकरणे त्यानंतर समोर आल्याची माहिती त्यांनी दिली. ही सर्व प्रकरणे जानेवारी २०१७ ते १३ सप्टेंबर २०१८ या कालावधीतील असल्याचे त्यांनी सांगितले.
तिहेरी तलाक ही एक क्रूर आणि अमानवीय पद्धत आहे. जवळपास २२ देशांमध्ये तिहेरी तलाक नियंत्रित करण्यात आला आहे. केवळ मतपेट्यांवर नजर ठेवून भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशामध्ये महिलांना न्याय देण्यास नकार दिला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
व्होट बँकेच्या राजकारणापलीकडे जाऊन मुस्लिम महिलांना न्याय देण्यासाठी सोनिया गांधी यांनी हे विधेयक राज्यसभेत पारित करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
राज्यसभेत हे विधेयक पारित करण्यासाठी यावेळी त्यांनी बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती आणि तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनाही आवाहन केले. लोकसभेमध्ये पारित झालेले हे विधेयक सरकारच्या संख्याबळाअभावी राज्यसभेत अडकले आहे. मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत तिहेरी तलाकवर बंदी घातली होती.
इशरत जहाँने केले स्वागत
तिहेरी तलाक प्रकरणात याचिका दाखल करणार्‍या इशरत जहाँने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. देशातील मुस्लिम महिलांच्या सशक्तीकरणाच्या दिशेने उचललेले हे एक सकारात्मक पाऊल असल्याची प्रतिक्रिया तिने व्यक्त केली. मुस्लिम पुरुष व धार्मिक नेत्यांनी आता स्वतःला बदलावे किंवा कायद्याला तोंड देण्याची तयारी ठेवावी, असेही तिने सांगितले.
काँग्रेसला आता लाज वाटेल ः भाजपा
तिहेरी तलाक गुन्हा ठरवणारा केंद्रीय मंत्रिमंडळाने काढलेला अध्यादेश म्हणजे महिला सशक्तीकरणाच्या दिशेने उचललेले मोठे पाऊल असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी व्यक्त केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात तिहेरी तलाकची पाठराखण केली होती, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. व्होट बँकेसाठी आतापर्यंत काँग्रेसने तिहेरी तलाकवर केवळ राजकारणच केले आहे. स्वतःच्या वर्तनाची काँग्रेसला आता लाज वाटेल, असा हल्ला त्यांनी पक्ष कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला.
तिहेरी तलाक मुद्याचा राजकीय फूटबॉल ः काँग्रेस
मुस्लिम महिलांना न्याय देण्याच्या नावाखाली मोदी सरकार तिहेरी तलाक मुद्याचा राजकीय फूटबॉल करीत असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी केली. तिहेरी तलाक दिल्यावर पीडितेला नुकसानभरपाई न दिल्यास आरोपीची संपत्ती जप्त करण्याची तरतूद कायद्यात करावी, अशी काँग्रेसची मागणी केंद्र सरकारने फेटाळल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तिहेरी तलाक हा आमच्यासाठी नेहमीच मानवी मुद्दा असून, तो महिलांच्या अधिकारासोबत व त्यांना न्याय देण्याचा आहे. मात्र, भाजपा या मुद्यावर राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
ऐतिहासिक निर्णय : अमित शाह
तीन तलाकची प्रथा हा दंडनीय गुन्हा असल्याची नोंद करण्यासाठी सरकारने या संदर्भात पारित करण्यात आलेला अध्यादेश हा ऐतिहासिक निर्णय असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी नोंदविली आहे. हा त्रास इतके दिवस मुस्लिम महिलांना सहन करण्यासाठी मतांचे राजकारण करणार्‍या पक्षांनी या संदर्भात आत्मपरीक्षण करणे गरजेचे असल्याचेही शाह म्हणाले.
अध्यादेशावर कॅबिनेटचे शिक्कामोर्तब झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना शाह ट्विटरच्या माध्यमातून म्हणाले की, या ऐतिहासिक निर्णयामुळे मुस्लिम महिलांना समाजात सन्मानाने जगता येणार आहे.
रविशंकर प्रसाद
काँग्रेसचे नेतृत्व एक महिला करीत असतानाही, मुस्लिम महिलांना न्याय देण्यासाठी राज्यसभेत हे विधेयक पारित करण्यासाठी काँग्रेसने मदत केली नाही, हा माझा गंभीर आरोप आहे.

Posted by : | on : 20 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (294 of 1774 articles)


पडल्यास अध्यादेश काढावा ►आरक्षण, आंतरजातीय विवाहाला समर्थन ►जाती व्यवस्था हटविली जावी ►हिंदुत्वाला हिंदुइझम म्हणणे चुकीचे ►संघात सर्व जातींचे स्वयंसेवक, नवी ...

×