ads
ads
भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक

भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक

►पाच राज्यांतील निवडणुकीबाबत चर्चा, नवी दिल्ली, २० ऑक्टोबर –…

‘स्माईली’च्या जन्माची आगळीवेगळी कथा!

‘स्माईली’च्या जन्माची आगळीवेगळी कथा!

नवी दिल्ली, २० ऑक्टोबर – व्हॉट्स अ‍ॅप, फेसबूक, इंस्टाग्राम,…

दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

►४ वर्षांत सव्वा कोटी घरांची निर्मिती ►२०२२ पर्यंत सर्वांसाठी…

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

►करणार्‍यांच्या यादीत सर्वाधिक भारतीय, वॉशिंग्टन, २० ऑक्टोबर – अमेरिकेत…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

औरंगाबाद, १९ ऑक्टोबर – सोशल मीडियावर तिहेरी तलाक दिल्याने…

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, मुंबई, १९ ऑक्टोबर – पाच…

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

॥ विशेष : गोविंद कल्याणकर | अनेक जण सामाजिक…

राजकारणातील मानपान व मानापमान

राजकारणातील मानपान व मानापमान

॥ विशेष : वसंत गणेश काणे | भारताला नेपाळशी…

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

॥जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तरूण तेजपाल यानेच…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:59
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संसद » तीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले

तीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १० ऑगस्ट –

Sansad1

Sansad1

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात तीन तलाकसंदर्भातील विधेयक पारित करण्याचा सरकारचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. या विधेयकावर सहमती होऊ न शकल्यामुळे आज शुक्रवारी हे विधेयक पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारला राज्यसभेत सादर करता आले नाही.
राज्यसभेच्या कामकाज पत्रिकेवर आज हे विधेयक दर्शवण्यात आले होते. त्यामुळे हे विधेयक पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पारित केले जाईल, असे मानले जात होते. राफेल विमानाच्या सौद्यावरून गदारोळ झाल्यामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी २.३० वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते. दुपारी २.३० वाजता कामकाज सुरू होताच सभापती व्यंकय्या नायडू यांनी तीन तलाकसंदर्भातील विधेयक चर्चेला न घेता अशासकीय कामकाज पुकारले. अशासकीय विधेयकांचर चर्चा झाल्यावर तीन तलाक सदंर्भातील विधेयक चर्चेला घेतले जाईल, असे ते म्हणाले. मात्र अशासकीय विधेयकांवरील चर्चा आटोपल्यावरही हे विधेयक सादर करण्यात आले नाही. या विधेयकावर सहमती न झाल्यामुळे हे विधेयक आज सादर कले जाणार नाही, असे नायडू यांनी नंतर जाहीर केले. हे विधेयक आज सादर करण्यात न आल्यामुळे आता संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारला हे विधेयक पारित करावे लागणार आहे. या विधेयकावर अध्यादेश काढण्याचा पर्यायही सरकारसमोर खुला आहे.
सरकारने आधी महिला आरक्षण विधेयक पारित करावे, अशी मागणी काँग्रेसने केली होती. महिला आरक्षण विधेयक पारित झाल्यावर आम्ही तीन तलाक विधेयक पारित करण्यासाठी सहकार्य करू, असे काँग्रेसने स्पष्ट केले होते, तर काँग्रेसने आधी तीन तलाक संदर्भातील विधेयक पारित करण्यासाठी सहकार्य करावे, त्यानंतर सरकार महिला आरक्षण विधेयक पारित करण्याचसाठी पुढाकार घेईल, असे सरकारतर्फे सांगण्यात आले होते. मात्र या मुद्यावर दोन्ही पक्षांची सहमती न झाल्यामुळे तीन तलाकसंदर्भातील विधेयक रखडले, असे समजते. तीन तलाकसंदर्भातील विधेयक लोकसभेने आधीच पारित केले आहे.
रामानेही तर सीतेला सोडले होते!
तिहेरी तलाकवर राज्यसभेत बोलताना काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी, प्रभू श्रीराम यांनीही सीतेला तलाक दिला होता, असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर त्यांनी माफीही मागितली. सर्वच धर्मांत स्त्रियांना कमी-अधिक फरकाने अन्यायी वागणूक दिली जाते. रामायणात श्रीरामानेही सीतेवर संशय घेऊन तिला सोडले होते. याचाच अर्थ, सर्व धर्मांत पुरुषांचे वर्चस्व पाहायला मिळते. मग फक्त मुस्लिम धर्मातील रुढींवर बोट का ठेवले जाते, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला होता.

Posted by : | on : 11 Aug 2018
Filed under : राष्ट्रीय, संसद.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संसद (376 of 1638 articles)

Pm Narendra Modi4
निर्धारित केले लक्ष्य, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १० ऑगस्ट - पेट्रोलमध्ये उसाच्या रसाचा आणि अन्य कृषी उत्पादनातील टाकावू पदार्थांचा वापर करून ...

×