ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » तीन पोलिसांचे अपहरण करून हत्या

तीन पोलिसांचे अपहरण करून हत्या

►आयएसआयच्या आदेशावरून अतिरेक्यांचे भ्याड कृत्य,
वृत्तसंस्था
श्रीनगर, २१ सप्टेंबर –

Jammu Kashmir Map

Jammu Kashmir Map

भारतीय सुरक्षा जवानांशी समोरासमोर लढा देणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर पाकधार्जिण्या अतिरेक्यांनी आता भ्याड हल्ले सुरू केले आहेत. पाकी आयएसआयच्या आदेशावरून अतिरेक्यांनी काश्मीरच्या तीन पोलिसांचे आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अपहरण करून, त्यांची हत्या केली, तर जीवाच्या भीतीपोटी सहा पोलिसांनी राजीनाम्यांची घोषणा केली.
जम्मू-काश्मिरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उधळण्यासाठी आणि पोलिसांना राजीनामे देण्यास भाग पाडण्यासाठी पाकी आयएसआयने काश्मिरातील फुटीरतावादी नेते व अतिरेक्यांना थेट पोलिसांना लक्ष्य बनविण्याचे आदेश दिले आहेत, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याच नापाक षडयंत्राचा भाग म्हणून अतिरेक्यांनी आज पहाटेच्या सुमारास शोपियाँ जिल्ह्यातून तीन पोलिसांचे अपहरण केले. त्यानंतर काही वेळातच गोळ्यांनी चाळणी केलेले त्यांचे मृतदेह रस्त्यावर आढळून आले. विशेष पोलिस अधिकारी फिरदौस अहमद आणि कुलवंत सिंग, तसेच कॉन्स्टेबल निसार अहमद अशी या शहीद पोलिसांची नावे आहेत, अशी माहिती पोलिस प्रवक्त्याने दिली.
नदी ओलांडून आले अतिरेकी
शोपियाँ जिल्ह्यातील बाटगुंड आणि कापरान गावाला लागून असलेली नदी पार करून अतिरेकी आज सकाळीच या तीन पोलिसांच्या घरात घुसले.
लगेच गावातील लोक धावून आले आणि पोलिसांना सोडा, अशी गयावया करू लागले, पण अतिरेक्यांनी हवेत गोळीबार करून गावकर्‍यांना पिटाळले, अशी माहिती काही गावकर्‍यांनी दिली.
हिजबुलने स्वीकारली जबाबदारी
हिजबुल मुजाहिदीनने या तीन पोलिसांच्या अपहरण व हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. हिजबुलचा कमांडर रियाझ नायकू याने अनेकदा, पोलिसांना राजीनामा द्या अन्यथा मरायला तयार राहा, असा इशारा दिला होता. याच अनुषंगाने आज त्याने दोन मिनिटांचा व्हिडीओ जारी करून, तीन पोलिसांची आमच्याच अतिरेक्यांनी हत्या केली असल्याचा दावा त्याने केला.
तोयबा, हिजबुल, जैशचा सहभाग
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उधळण्यासोबतच पोलिस आणि राजकीय उमेदवारांना लक्ष्य बनविण्यात यावे, असे निर्देशच पाकी आयएसआयने जारी केले आहेत. कुठल्याही स्थितीत पंचायत आणि अन्य निवडणुका व्हायला नको, अशी नापाक योजना आयएसआयने तयार केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सहा पोलिसांचे राजीनामे
या घटनेनंतर लगेच राज्य पोलिस दलातील सहा पोलिसांनी सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड करून राजीनाम्याची घोषणा केली. यातील एका पोलिसाने, ‘माझे नाव इर्शाद अहमद असून, मी यापुढे पोलिस दलात काम करणार नाही. आता याच क्षणाला मी राजीनामा देत आहे,’ असे व्हिडीओत जाहीर केले.
तजाला हुसैन लोन यांच्यासह अन्य चार पोलिसांनीही आपले राजीनामा अशाच प्रकारे जाहीर केले आहेत.

Posted by : | on : 22 Sep 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (283 of 1774 articles)


न्यायालयाचा संताप, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २१ सप्टेंबर - सर्वोच्च न्यायालयाकडे एखादे प्रकरण प्रलंबित आहे म्हणून राज्यांनी त्याविषयी काळजी करण्याचे किंवा ...

×