ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » त्या पाचही जणांचे नक्षल्यांशी संबंध

त्या पाचही जणांचे नक्षल्यांशी संबंध

►राज्य शासनाचे सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ५ सप्टेंबर –

Vernon Gonsalves Arun Ferreira Gautam Navlakha Sudha Bharadwaj Varavara Rao

Vernon Gonsalves Arun Ferreira Gautam Navlakha Sudha Bharadwaj Varavara Rao

ऑगस्टच्या अखेरीस पाच शहरांमध्ये धाडी घालून ज्या पाच जणांना अटक करण्यात आली होती, त्यांचे नक्षलवादी नेत्यांशी अतिशय जवळचे संबंध होते, असा दावा महाराष्ट्र सरकारने आज बुधवारी सर्वोच्च न्यायालयात केला.
या लोकांच्या विरोधी भूमिकेमुळे आणि आंदोलन करण्याच्या धोरणामुळे आम्ही त्यांना अटक केली असून, त्यांचे नक्षलवादी गटांशी जवळचे संबंध असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाल्यानंतरच धाडी टाकून त्यांच्याविरुद्ध अटकेची कारवाई करण्यात आली, असे राज्य सरकारने आज दाखल केलेल्या शपथपत्रात स्पष्ट केले.
या वर्षीच्या जानेवारीत भीमा कोरेगाव येथे उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी पुणे पोलिसांनी २८ ऑगस्ट रोजी दिल्ली, हैदराबाद, मुंबई आणि पुण्यासह पाच शहरांमध्ये धाडी टाकून या लोकांना अटक केल्यानंतर त्यांनी लगेच आपल्या बचावासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि केवळ आमच्या सरकारविरोध प्रदर्शनामुळे, सूडापोटी आमच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप केला होता. यानंतर न्यायालयाने त्यांना त्यांच्या घरातच नजरकैद करण्यात यावे, असे आदेश देताना, विरोध दडपण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा मोठा उद्रेक होईल, असे मतही व्यक्त केले होते.
आपल्या शपथपत्रात महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले की, या लोकांनी देशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडविण्याचा कट आखला होता. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी आम्ही दडपशाहीचा मार्ग स्वीकारला नसून, या लोकांनी संपूर्ण देश अस्थिर करण्याचा कट रचल्यानेच ही कारवाई करण्यात आली आहे आणि हे सिद्ध करणारे ठोस पुरावे आमच्याकडे आहेत. सोबतच या नक्षल समर्थकांच्यावतीने इतिहासकार रोमिला थार, अर्थतज्ज्ञ प्रभात पटनायक व देवकी जैन, समाजवादी नेते सतीश देशपांडे आणि कायदेतज्ज्ञ माजा दारूवाला यांनी दाखल केलेल्या याचिकेवरही राज्य सरकारने गंभीर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. इतक्या गंभीर प्रकरणाच्या तपासात खोडा निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, असा स्पष्ट आरोप सरकारने केला. नक्षलवादी संघटनेशी संबंध सिद्ध झाल्यानंतर पुणे पोलिसांनी कवी वरवरा राव, अ‍ॅड. सुधा भारद्वाज, अ‍ॅड. अरुण परेरा, वर्नान गोन्साल्विस आणि गौतम नवलाखा या पाच जणांना अटक केली होती. या पाचही आरोपींनी केवळ हिंसाचाराचा कट रचला नाही तर, मालमत्तेचे नुकसान करून समाजात अशांतता निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असे पोलिसांनी शपथपत्रात म्हटले आहे. सीलबंद लिफाफ्यात शथपपत्रासह काही कागदपत्रेही सादर करण्यात आली.
कोठडीची मागणी
सध्या नजरकैदेत असलेल्या पाचही आरोपींना त्यांच्या घरात नजरकैदेत ठेवण्याऐवजी पोलिस कोठडीत रवानगी करण्यात यावे, अशी विनंती महाराष्ट्र सरकारने केली. ते आपल्या घरातच नजरकैद असल्याने हे आरोपी पुरावे नष्ट करू शकतात, तसेच संघटनेच्या अन्य लोकांनाही सतर्क करतील, असा युक्तिवाद सरकारच्या वतीने करण्यात आला.

Posted by : | on : 6 Sep 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (383 of 1774 articles)

Randeep Surjewal
सुरजेवाला यांचे मत, वृत्तसंस्था चंदीगड, ५ सप्टेंबर - काँग्रेसचे प्रवक्ता आणि हरयाणातील आमदार रणदीपसिंह सुरजेवाला हे पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे ...

×