ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

►४ वर्षांत सव्वा कोटी घरांची निर्मिती
►२०२२ पर्यंत सर्वांसाठी घर : पंतप्रधान,
शिर्डी, १९ ऑक्टोबर –

Narendra Modi Devendra Fadanavis In Shirdi

Narendra Modi Devendra Fadanavis In Shirdi

महाराष्ट्रात यावर्षी पाऊस कमी झाल्याने काहीशी चिंता आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना तातडीने मदत देण्यात येईल. तसेच राज्य शासनाद्वारे करण्यात येणार्‍या उपाययोजनांसाठीही केंद्र शासन भरीव मदत करेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यात विविध प्रकल्पांची कामे करण्यात येत आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून १६ हजार गावे टंचाईमुक्त झाली असून, ९ हजार गावात कामे सुरू आहेत. राज्याने या योजनेच्या अंमलबाजवणीत चांगली कामगिरी केल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतकर्‍यांच्या पिकांना दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्याचा अनेक शेतकर्‍यांना लाभ झाल्याचे त्यांनी नमूद केले.
शिर्डी येथे साई समाधी शताब्दी सोहळ्याचा समारोप, संस्थानच्या विविध प्रकल्पाचे भूमिपूजन, राज्यातील अडीच लाख घरकुलांच्या लाभार्थींना घरकुलाच्या चावीचे हस्तांतरण आणि राज्यातील इतर लाभार्थ्यांच्या ई-गृहप्रवेश कार्यक्राप्रसंगी पंतप्रधान बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष सुरेश हावरे आदी उपस्थित होते.
देशातील बेघरांना २०२२ पर्यंत हक्काचे घरकुल देण्याचा संकल्प सरकारने केला असून, गेल्या ४ वर्षांत सव्वा कोटी घरांची मूलभूत सोईसुविधांसह निर्मिती करण्यात आली आहे. असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. देशातील सर्वसामान्यांना विश्‍वास वाटावा असेच काम केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या ४ वर्षांत केले असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
स्वत:च्या घराचे स्वप्न बघणार्‍या लाखो कुटुंबांना चांगले घरकुल विजयादशमीची भेट आहे. घरकुलाच्या माध्यमातून गरिबीवर मात करण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना सर्व नागरिकांना घरे देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचा संकल्प करीत असताना ही घरे तुलनेने मोठ्या आकाराची आणि सर्व सोयीयुक्त देण्यात येत आहेत. त्यासाठी दिले जाणार्‍या अनुदानात ७० हजारावरून आता १ लाख २० हजार इतकी वाढ करण्यात आली आहे. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत असून, लाभार्थ्यांची निवड पारदर्शकतेने करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
दर्शन रांग इमारतीचे भूमिपूजन
शिर्डी संस्थानच्या दर्शन रांग इमारतीचे भूमिपूजन, शैक्षणिक संकुल, १० मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प आणि साईसृष्टी प्रकल्पाचा शुभारंभही यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते झाला. यावेळी संस्थानच्यावतीने साई प्रतिमा असणारे चांदीच्या नाण्याचे अनावरण व लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रतिनिधिक स्वरूपात एक नाणे संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांना देण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात प्रधानमंत्री आवास योजनेच्या १० लाभार्थ्यांना घरकुलाच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते श्री साईबाबा समाधी शताब्दी सोहळा समारोपाचे ध्वजावतरण करण्यात आले.
घर मिळाले, मिठाई कुठे आहे?
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यातील अडीच लाख लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश प्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मराठीत संवाद साधला. ई- गृहप्रवेश सोहोळ्याची सुरुवात झाली, ती नंदुरबार जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी झालेल्या संवादाने. ‘‘नवीन घर मिळाले, आता तुम्ही प्रसन्न आहेत का? नवीन घर मिळाल्यामुळे मिठाई खाल्ली का,’’ असा प्रश्‍न मोदी यांनी सिंगा वसावे यांना करीत माझ्यासाठी मिठाई पाठवणार का, अशी विचारणा केली. तसेच मोदी यांनी ‘श्रद्धा असू द्या, सबुरी ठेवा, साईबाबाचा आशीर्वाद आपल्या सर्वांना लाभो ही साईचरणी प्रार्थना’ अशा शब्दात भाषणाचा मराठीतून समारोप केला.

Posted by : | on : 20 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (822 of 2226 articles)

Dr Mohan Bhagwat Dasara
उत्सवात सरसंघचालकांचे ठाम प्रतिपादन, नागपूर, १९ ऑक्टोबर - अयोध्येत राममंदिराच्या निर्मितीसाठी तातडीने संसदेत कायदा तयार करण्याची गरज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ...

×