अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

अटलबिहारी वाजपेयी अनंतात विलीन

►शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ►मानसकन्या नमिता यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी,…

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ ऑगस्ट – आयुष्यभर जोडलेली माणसे,…

अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

भारत-पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान : इम्रान

वृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ ऑगस्ट – पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान…

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » देशभरात स्थापन होणार कौटुंबिक सलोखा केंद्र

देशभरात स्थापन होणार कौटुंबिक सलोखा केंद्र

मुस्लिम राष्ट्रीय मंचचा पुढाकार,
वृत्तसंस्था
लखनौ, ५ ऑगस्ट –

Muslim Rashtriya Manch

Muslim Rashtriya Manch

मुस्लिम राष्ट्रीय मंच आता ‘दारुल कजा’च्या धर्तीवर संपूर्ण देशातील जिल्ह्यांमध्ये ‘कौटुंबिक सलोखा केंद्र’ सुरू करणार आहे. शरई अदालतच्या विपरित या केंद्रात महिलेलाच प्रमुख केले जाणार आहे.
मंचाचे राष्ट्रीय संयोजक मोहम्मद अफजल यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अलिकडेच झालेल्या बैठकीत प्रत्येक जिल्ह्यात ‘कौटुंबिक सलोखा केंद्र’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्षभरात देशातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हे केंद्र सुरू केले जाईल, असा आमचा प्रयत्न आहे.
ज्याप्रमाणे दारुल कजामध्ये पुरुषांना प्रमुख केले जाते त्याप्रमाणे कौटुंबिक सलोखा केंद्रात महिलेला प्रमुख केले जाईल. याशिवाय समस्यांचा निपटारा करण्यासाठी उलेमांचीही मदत घेतली जाईल. मध्यस्थाची भूमिका पार पाडणार्‍या या केंद्रांमध्ये सर्वच जाती-जमातीच्या समस्या व अडचणी सोडविल्या जातील. परंतु, मुसलमानांशी संबंधित तलाक आणि वारसा हक्कासह विविध विषयांकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने देशात विविध स्थळी मुसलमानांच्या तलाक, वारसा हक्क आणि इतरही मुद्यांबाबत सुरू केलेल्या दारुल कजामध्ये महिला काजीची नियुक्त करण्यात यावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून महिला संघटनांकडून केली जात आहे. मात्र, त्यावर अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. याबाबत बोलताना अफजल यांनी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आरोप केले. ते म्हणाले, तलाक योग्य असल्याचाच निर्णय देणार्‍या स्थापन करण्यात आलेल्या दारुल कजाकडून महिला न्याय कधीच मिळत नाही. दारुल कजा हे कुटुंबाला तोडण्याचेच काम करीत आहे. आमचा प्रयत्न कुटुंबाला जोडण्याचा राहणार आहे.
मुस्लिम राष्ट्रीय मंच देशभरातील आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करणार आहे की, त्यांनी जागोजागी कौटुंबिक सलोखा केंद्र सुरू करावे, असेही अफजल म्हणाले. या केंद्रात लोकांना त्यांच्या कायदेशीर हक्काविषयीची माहिती दिली जाईल. आमच्या संघटनेने तलाक मिळालेल्या मुस्लिम महिलांना गैरसरकारी पेन्शन देण्याची योजना सुरू केली आहे. दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सुमारे शंभर महिलांना ही पेन्शन दिली जात आहे. लवकरच या योजनेचा विस्तार केला जाणार आहे. अशी पेन्शन पाहिजे असल्यास संबंधित महिला या कौटुंबिक सलोखा केंद्रात येऊन आपल्या नावाची नोंदणी करू शकतात, अशी माहितीही अफजल यांनी दिली. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने देशातील विविध जिल्ह्यांमध्ये दारुल कजा सुरू केले आहे. आणखी काही जिल्ह्यांमध्ये ते सुरू करण्याचा बोर्डाचा प्रयत्न होता. मात्र, समांतर न्यायालयाचा आरोप झाल्यामुळे व वाद वाढल्यामुळे दिल्लीतील एका बैठकीत याबाबत काही निर्णय घेण्यात आले. त्यानंतर स्पष्टीकरण देण्यात आले होते की, दारुल कजा कोणतेही समांतर न्यायालय नाही, तर मध्यस्थता परिषद आहे. यात केल्या जाणार्‍या निर्णयाला सामान्य न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते.

Posted by : | on : Aug 6 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (53 of 1864 articles)

Piyush Goyal
►अर्थमंत्री पीयूष गोयल यांची माहिती, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ४ ऑगस्ट - [caption id="attachment_46740" align="alignleft" width="300"] Piyush Goyal[/caption] जीएसटी व्यवस्थेंतर्गत रुपे ...

×