ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » देशातील सर्वात उंच विमानतळाचे लोकार्पण

देशातील सर्वात उंच विमानतळाचे लोकार्पण

सिक्कीममधील पाक्योंग १००वे विमानतळ,
पाक्योंग, २४ सप्टेंबर –

Pakyong Airport Sikkim

Pakyong Airport Sikkim

बांधकाम तंत्रज्ञानाचा चमत्कार ठरलेले आणि चीन सीमेपासून अवघ्या ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या सिक्कीमच्या पाक्योंग येथील अत्याधुनिक विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सोमवारी लोकार्पण करण्यात आले. देशातील हे शंभरावे विमानतळ असून, यामुळे सिक्कीम हे राज्य प्रथमच देशाच्या हवाई नकाशावर आले आहे.
या विमानतळाचे भूमिपूजन २००९ मध्ये झाले होते. पण, प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नव्हती. २०१४ मध्ये केंद्रात भाजपाप्रणीत रालोआ सरकार आल्यानंतर चीनचा धोका ओळखून पंतप्रधान मोदी यांनी विमानतळ बांधणीच्या कामाला गती दिली. या विमानतळाच्या उभारणीसाठी सुमारे ५५० कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
आजचा दिवस केवळ सिक्कीमकरिताच नव्हे, तर देशासाठीही गौरवाचा आहे. देशाने आज विमानतळांचे शतक पूर्ण केले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून २०१४ पर्यंतच्या ६७ वर्षांच्या काळात देशात केवळ ६५ विमानतळांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले होते. अर्थात प्रत्येक वर्षी एका विमानतळाची निर्मिती होत आली आहे, पण गेल्या चार वर्षांच्या काळात आपल्या सरकारने देशभरात ३५ नवीन विमानतळांची उभारणी केली आहे. म्हणजेच, वर्षाला सुमारे ९ विमानतळे उभी राहिली आहेत, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी यावेळी आयोजित कार्यक्रमात दिली.
ईशान्य भागाला देशाच्या प्रगतीचे इंजिन म्हणून विकसित करण्याचा आपल्या सरकारचा निर्धार आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात प्रथमच हवाई आणि रेल्वेमार्गाने देशाला जोडण्याचा उपक्रम व्यापक प्रमाणात हाती घेण्यात आला आहे. ईशान्य भारतातील प्रत्येक घरात आपल्या सरकारने वीज उपलब्ध करून दिली आहे. अतिशय मजबूत अशा पायाभूत सुविधाही उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.
चीनचे अंतर अवघे ६० किमी
भारत-चीन सीमेपासून अवघ्या ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या या विमानतळावरून पहिले व्यावसायिक उड्डाण येत्या ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. अलीकडेच या विमानतळावर भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान उतरविण्यात आले होते. सिक्कीमची राजधानी असलेले गंगटोक हे शहर या विमानतळापासून ३३ किमी अंतरावर आहे.
४५०० फूट उंचीवर बांधले विमानतळ
बांधकाम तंत्रज्ञानाचा अद्भूत चमत्कार हे या विमानतळाचे वैशिष्ट आहे. पाक्योंग गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगराळ भागात समुद्रसपाटीपासून ४५०० फूट उंचीवर अत्याधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून या विमानतळाची निर्मिती करण्यात आली आहे. सुमारे २०१ एकर इतका या विमानतळाचा परिसर आहे. धावपट्टीच्या बाजूलाच मोठी खाईदेखील आहे.

Posted by : | on : 25 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (267 of 1774 articles)

Prakash Javadekar2
प्रचार खोटारडेपणाचा कळस, जयपूर, २४ सप्टेंबर - काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी हे दिशाहीन नेते आहेत. पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीतही ...

×