हरिद्वारमधील ब्रह्मकुंडात वाजपेयींच्या अस्थींचे विसर्जन

हरिद्वारमधील ब्रह्मकुंडात वाजपेयींच्या अस्थींचे विसर्जन

►अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती, वृत्तसंस्था हरिद्वार,…

मुंबई स्फोटातील टकलाला संपुआच्याच काळात पासपोर्ट

मुंबई स्फोटातील टकलाला संपुआच्याच काळात पासपोर्ट

►सीबीआयच्या आरोपपत्रातील माहिती, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १९ ऑगस्ट –…

राजघाट परिसरात वाजपेयी यांचे भव्य स्मारक उभारणार

राजघाट परिसरात वाजपेयी यांचे भव्य स्मारक उभारणार

नवी दिल्ली, १८ ऑगस्ट – दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी…

दाऊदच्या खजिनदाराला लंडनमध्ये अटक

दाऊदच्या खजिनदाराला लंडनमध्ये अटक

वृत्तसंस्था लंडन, १९ ऑगस्ट – मार्च १९९३ च्या मुंबई…

शहा मोहम्मद कुरेशी पाकचे विदेश मंत्री

शहा मोहम्मद कुरेशी पाकचे विदेश मंत्री

►मुंबई हल्ल्याच्या काळातही याच पदावर ►मंत्रिमंडळावर मुशर्रफ यांची सावली,…

युनोचे माजी महासचिव कोफी अन्नान कालवश

युनोचे माजी महासचिव कोफी अन्नान कालवश

वृत्तसंस्था संयुक्त राष्ट्रसंघ, १८ ऑगस्ट – संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी…

दाभोळकर हत्येत शिवसेनेचा नेता?

दाभोळकर हत्येत शिवसेनेचा नेता?

►माजी नगरसेवकाला अटक ►अंदुरेच्या चौकशीतून समोर आले नाव, मुंबई,…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

अटलजी: अनंत, अथांग

अटलजी: अनंत, अथांग

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्याच्याबद्दल लोकांकडून अगदी…

स्वयंसेवक अटलजी

स्वयंसेवक अटलजी

॥ आदरांजली : मदनदास देवी | स्वयंसेवकत्व हा आपल्या…

मेरा परिचय : अटलजींच्या काव्यप्रतिभेतून प्रकटलेले हिंदुसूक्त!

मेरा परिचय : अटलजींच्या काव्यप्रतिभेतून प्रकटलेले हिंदुसूक्त!

॥ आदरांजली : दि. भा. घुमरे | पंतप्रधानपदाच्या सर्वोच्च…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:11 | सूर्यास्त: 18:47
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » देशात दररोज २६.९३ किमी रस्तेबांधणी

देशात दररोज २६.९३ किमी रस्तेबांधणी

पंतप्रधान मोदींनी घेतला पायाभूत क्षेत्राचा आढावा,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ३ ऑगस्ट –

Prime Minister Narendra Modi1

Prime Minister Narendra Modi1

देशातील रस्तेबांधणीने आता वेग घेतला आहे. २०७१-१८ या आर्थिक वर्षात दररोज २६.९३ किलोमीटर रस्ते बांधले जात आहेत. २०१३-१४ मध्ये दररोज केवळ ११.६७ किलोमीटर रस्ताबांधणी व्हायची. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घेतलेल्या पायाभूत क्षेत्राच्या आढाव्यात हे तथ्य समोर आले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी आज रस्तेबांधणी, ग्रामीण व शहरी घरकुल योजना, रेल्वे, विमानतळ आणि बंदरांचा आढावा घेतला.
नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सादरीकरण करीत देशात रस्तेबांधणीचा वेग वाढल्याचे सांगितले. परिवहन क्षेत्रामध्ये डिजिटायझेशनच्या प्रगतीची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. आतापर्यंत २४ लाखांपेक्षा जास्त रेडियो फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) टॅग्ज वितरित करण्यात आले आहेत आणि २२ टक्क्यांपेक्षा जास्त महसूल इलेक्ट्रॉनिक टोल वसुलीच्या माध्यमातून जमा करण्यात आला, अशी माहिती पंतप्रधानांना देण्यात आली.
रस्त्यांच्या स्थितीची माहिती आणि त्यासंबंधी तक्रार करण्यासाठी तयार केलेले ‘सुखद यात्रा’ अ‍ॅप्लिकेशन आतापर्यंत एक लाख युजर्सने वापरले आहे. इलेक्ट्रॉनिक टोल वसुलीचा वेग वाढवण्याचे निर्देश यावेळी पंतप्रधानांनी दिले. पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत पात्र वस्त्यांसाठी रस्तेबांधणीचे काम ८८ टक्के झाल्याची माहिती देण्यात आली.
२०१४ ते २०१८ या कालावधीत ४४ हजार गावांना रस्त्यांशी जोडण्यात आले आहे. त्यापूर्वी ३५ हजार गावे रस्त्यांसोबत जोडण्यात आली होती, असे दिलेल्या माहितीत सांगण्यात आले.
रस्त्यांचे जीआयएस मॅपिंग केले जात असून, आतापर्यंत २० राज्ये ‘जीओस्पॅटियल रुरल रोड इन्फर्मेशन सिस्टिम’सोबत (जीआरपीआयएस) जोडली गेली आहेत. ग्रामीण भागातील रस्तेबांधणीसाठी प्लॅस्टिकचा कचरा आणि फ्लायअ‍ॅश या अपारंपरिक साहित्याचा वापर केला जात आहे, अशी माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. रेल्वे क्षेत्रातही लक्षणीय वाढ झाली असून रेल्वेची क्षमता आणि रेल्वेचे डबे व इंजीनची कार्यक्षमता वाढली आहे. या व्यतिरिक्त नवे मार्ग तसेच रुंदीकरणानेही वेग धरला आहे. २०१४ ते २०१८ मध्ये ९,५२८ किलोमीटर रेल्वेमार्ग वाढवण्यात आला. हा वेग त्यापूर्वीच्या चार वर्षांच्या तुलनेत ५६ टक्के जास्त आहे.
विमानचालन क्षेत्रामध्ये मागील चार वर्षांत प्रवाशांची संख्या ६२ टक्क्यांनी वाढली आहे.
उडान योजनेंतर्गत महानगरे आणि शहरांमध्ये २७ विमानतळ कार्यान्वित करण्यात आली आहेत. देशातील मोठ्या बंदरांमध्ये मागील चार वर्षांमध्ये जहाजांची वाहतूक १७ टक्क्यांनी वाढली आहे. ग्रामीण भागातील घरकुल योजनेंतर्गत मागील चार वर्षांत एक कोटींपेक्षा जास्त घरे बांधण्यात आली आहेत. त्यापूर्वीच्या चार वर्षांत केवळ २५ लाख घरे बांधण्यात आली होती, अशी माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. यामुळे बांधकाम क्षेत्रामध्ये रोजगारही मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे.
घरबांधणी पूर्ण होण्याच्या कालावधीही मोठ्या प्रमाणात घटला आहे. २०१५-१६ मध्ये एक घर बांधण्यासाठी ३१४ दिवस लागायचे. त्या तुलनेत २०१७-१८ मध्ये ११४ दिवसांमध्ये घर पूर्ण होत असल्याचा निष्कर्ष एका अभ्यासात काढण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तीचा प्रतिकार करण्यासाठी तसेच घरबांधणीवरील खर्च कमी करण्यासाठी आधुनिक गृहनिर्माण तंत्रज्ञान यासाठी वापरले जात आहे. सुमारे दोन तास झालेल्या या बैठकीसाठी संबंधित मंत्रालयांचे, नीती आयोगाचे आणि पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.

Posted by : | on : Aug 4 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (66 of 1869 articles)

Priyanka Vadhara
►सोनिया गांधींचे निवृत्तीचे संकेत, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, ३ ऑगस्ट - [caption id="attachment_59115" align="alignleft" width="300"] Priyanka Vadhara[/caption] २०१९ ची लोकसभा ...

×