ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » धर्मनिरपेक्षतेसाठी सर्वच धार्मिक प्रथांशी खेळ नको

धर्मनिरपेक्षतेसाठी सर्वच धार्मिक प्रथांशी खेळ नको

►शबरीमला प्रकरणी न्या. इंदू मल्होत्रा यांची भूमिका,
नवी दिल्ली, २८ सप्टेंबर –

Justice Indu Malhotra

Justice Indu Malhotra

केरळातील जगप्रसिद्ध शबरीमला मंदिरात सर्वच वयोगटातील महिलांना प्रवेश करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने आज शुक्रवारी दिली. हा निकाल चार विरुद्ध एक असा होता आणि विशेष म्हणजे, या प्रकरणी विरोधी निकाल देणार्‍या न्यायमूर्ती या देखील महिलाच होत्या. अर्थात् न्या. इंदू मल्होत्रा यांनी या ऐतिहासिक मंदिरात महिलांच्या प्रवेशाला विरोध करणारी भूमिका मांडली.
देशात धर्मनिरपेक्षतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्राचीन काळापासून चालत आलेल्या धार्मिक प्रथांशी खेळ केला जाऊ नये, असे न्या. मल्होत्रा यांचे स्पष्ट मत होते. सतीसारखी सामाजिक कुप्रथा वगळता इतर धार्मिक प्रथा कायम ठेवायच्या की रद्द करायच्या, यावर न्यायालयाने निकाल देऊ नये, असे मतही त्यांनी मांडले.
समानतेचा अधिकार हा स्वामी अयप्पाच्या भक्तांच्या पूजेचा अधिकारापेक्षा भिन्न आहे. हा मुद्दा केवळ शबरीमला मंदिरापुरता मर्यादित नसून, देशभरातील अन्य धार्मिक स्थळीही त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. घटनेच्या कलम २५ अंतर्गत पूजेच्या मूलभूत अधिकारावर समानतेच्या सिद्धांताने कुरघोडी करता येणार नाही, असेही त्यांनी आपल्या निकालपत्रात स्पष्ट केले. मूळ धार्मिक प्रथा काय आहे, याबाबतचा निर्णय भाविकांनाच घ्यायचा आहे, न्यायालयाने यात हस्तक्षेप करायला नको. प्राचीन काळापासून रुजलेल्या धार्मिक भावनांमध्ये किंवा प्रथांमध्ये सहजपणे ढवळाढवळ करता येणार नाही. धार्मिक भावना आणि रूढ झालेले भेदभावरहित तत्त्व, तसेच राज्य घटनेने ठरवून दिलेला समानतेचा सिद्धांत यात समतोल राखण्याची गरज आहे. तर्कशुद्धतेची कल्पना धार्मिक प्रकरणांमध्ये आणली जाऊ नये, असेही त्यांनी सांगितले.
हा मुद्दा व्यक्तिगत श्रद्धेचा आहे. भारतात विविध धर्मातील लोक आपल्या श्रद्धा व परंपरेनुसार धार्मिक प्रथांचे पालन करतात. आपल्या बहुविध समाजात प्रत्येक समाजाला त्यांच्या धार्मिक प्रथांचे पालन करण्याचे स्वातंत्र्य घटनेने प्रदान केले आहे, असे मतही न्या. इंदू मल्होत्रा यांनी मांडले.

Posted by : | on : 29 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (748 of 2053 articles)

Tariq Anwar
दिल्ली, २८ सप्टेंबर - राफेल प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठराखण केल्यामुळे नाराज झालेले ...

×