Home » राष्ट्रीय, सांस्कृतिक » नववर्षाच्या स्वागतासाठी भारतीयांची पसंती न्यूझीलंड!

नववर्षाच्या स्वागतासाठी भारतीयांची पसंती न्यूझीलंड!

=ताज्या पाहणीतील निष्कर्ष=
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २५ नोव्हेंबर
rainbows-newzeland-turisumनोव्हेंबर महिना अजून संपायचा असला, तरी मावळत्या वर्षाचा निरोप आणि नववर्षाच्या स्वागताची तयारी देशभरात आतापासूनच सुरू झाली आहे. इतकेच नव्हे, तर नववर्षाच्या स्वागतासाठी कुठे जायला हवे, याचे नियोजनही अनेकांनी केले आहे. याच अनुषंगाने एका ताज्या पाहणीत बहुतांश भारतीयांनी २०१७ च्या स्वागतासाठी न्यूझीलंडला पहिली पसंती दिली असल्याचे आढळून आले.
स्कायस्कॅनर या संस्थेने देशभरातच ही पाहणी केली. नववर्षाच्या स्वागतासाठी आपण भारताबाहेर कोणत्या देशाला सर्वाधिक पसंती द्याल, असा प्रश्‍न विदेशात जाण्याची तयारी करीत असलेल्या नागरिकांना विचारण्यात आला होता. पॅसिफिक आयलँड देशात जाण्याचे नियोजन करणार्‍या सुमारे ५२ टक्के लोकांनी आपली पसंती न्यूझीलंडला दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी या देशाला पसंती देणार्‍या भारतीयांची संख्या वाढली असल्याचेही यात दिसून आले आहे.
लोकांचा न्यूझीलंडविषयी वाढता कल लक्षात घेऊन विमान कंपन्यांनीही आर्थिकदृष्ट्या परवडू शकेल, असे पॅकेज सादर केले आहे. त्यामुळे या देशाला जाण्यासाठी इच्छूक असलेले लोकही खुश झाले आहेत.
आशिया उपखंडातील अनेक देशांची यादी या अभ्यासात सादर करण्यात आली होती. काही लोकांनी युरोप, मध्य-पूर्वेतील देशांना आपली पसंती दिली. न्यूझीलंडच्या शेजारी असलेल्या ऑस्ट्रेलियाला भारतीयांनी दुसरा प्रसंतीक्रम दिला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ४७ टक्के लोकांनी ऑस्ट्रेलियात जाण्याचा आपला मानस व्यक्त केला आहे. याशिवाय मलेशिया, ब्रिटनला अनुक्रमे २८ व १५ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. ही संस्था प्रत्येक वर्षी भारतीयांची नववर्षाच्या स्वागतासाठी पसंतीच्या देशाची माहिती जाणून घेत असते, हे विशेष!

शेअर करा

Posted by on Nov 25 2016. Filed under राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

    व्हिडीओ संग्रह

    मागील बातम्या, लेख शोध

    Search by Date
    Search by Category
    Search with Google
    More in राष्ट्रीय, सांस्कृतिक (662 of 944 articles)


    वृत्तसंस्था नवी दिल्ली, २५ नोव्हेंबर - ५०० व हजाराच्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाची संवैधानिक मान्यता तपासण्यात यावी ...