काँग्रेस अविश्‍वास प्रस्ताव आणणार

काँग्रेस अविश्‍वास प्रस्ताव आणणार

►मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १७…

काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर

काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर

►दिग्विजयसिंह, द्विवेदी, कमलनाथ, शिंदे बाहेर, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७…

टेरेसांच्या बालसंगोपन संस्थांची चौकशी होणार

टेरेसांच्या बालसंगोपन संस्थांची चौकशी होणार

►केंद्र सरकारचे राज्यांना आदेश, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ जुलै…

नवाझ शरीफ व कन्येचा तुरुंगातील मुक्काम वाढला

नवाझ शरीफ व कन्येचा तुरुंगातील मुक्काम वाढला

►याचिकेवरील सुनावणी तहकूब, वृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ जुलै – भ्रष्टाचाराच्या…

शरीफ कुटुंबीयांची उच्च न्यायालयात याचिका

शरीफ कुटुंबीयांची उच्च न्यायालयात याचिका

वृत्तसंस्था इस्लामाबाद, १६ जुलै – भ्रष्टाचार प्रकरणात दोषी आढळलेल्या…

दहशतवादाविरोधात सर्व देशांनी एकत्र यावे

दहशतवादाविरोधात सर्व देशांनी एकत्र यावे

►राजनाथसिंह यांनी घेतली शेख हसीनांची भेट, वृत्तसंस्था ढाका, १४…

शिवस्मारकाच्या उंचीवरून विधानसभेत गदारोळ

शिवस्मारकाच्या उंचीवरून विधानसभेत गदारोळ

►चार वेळा कामकाज तहकूब, तभा वृत्तसेवा नागपूर, १७ जुलै…

दूध दरवाढीवरून विधिमंडळात गोंधळ

दूध दरवाढीवरून विधिमंडळात गोंधळ

►विधानसभेत सभात्याग ►विधानपरिषदेत कामतहकुबी, तभा वृत्तसेवा नागपूर, १६ जुलै…

मालेगावात पेटविला दुधाचा टँकर

मालेगावात पेटविला दुधाचा टँकर

►स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल, तभा वृत्तसेवा मालेगाव,…

निदान हा कोहिनूर तरी नीट सांभाळु!

निदान हा कोहिनूर तरी नीट सांभाळु!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | मोदी हटाव मोहीमेवर…

का वाढताहेत झुंडशाहीतून हत्या?

का वाढताहेत झुंडशाहीतून हत्या?

॥ विशेष : कृष्णा चांदगुडे, सामाजिक कार्यकर्ते | आधुनिक…

महापुरुष कोण, हे कोण ठरविणार?

महापुरुष कोण, हे कोण ठरविणार?

॥ रोखठोक : हितेश शंकर | आपल्या देशात एका…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:02 | सूर्यास्त: 19:03
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » नागरिकांना प्रामाणिकपणे कर भरण्याची विनंती

नागरिकांना प्रामाणिकपणे कर भरण्याची विनंती

►तेलावरील अबकारी शुल्कात कपात नाही
►जेटली यांची भूमिका,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १८ जून –
कच्च्या तेलावरील अबकारी शुल्कात कुठलीही कपात होणार नाही, असे स्पष्ट संकेत देतानाच, नागरिकांनी प्रामाणिकपणे कर भरावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी केले आहे.
महसुलीचा स्रोत म्हणून आपल्याला आयातीत तेलावरील करावर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी करायचे असल्याने नागरिकांनी आपल्या कराचा वाटा वेळेत आणि प्रामाणिकपणे भरणे आवश्यक आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सध्या वाढत आहेत, याची आम्हालाही जाणीव आहे; पण अशा स्थितीत अबकारी शुल्कात कपात केल्यास त्याचे प्रतिकूल परिणामच समोर येतील. त्यामुळे तेलावरील अबकारी शुल्कात कपात करण्याची कुठलीही शक्यता नाही, असे अरुण जेटली यांनी स्पष्ट केले.
नोकरदार वर्गांनीही कराचा भरणा प्रामाणिकपणे करायलाच हवा, याशिवाय समाजातील इतर घटकांनीही नियमितपणे कर भरावा. कारण, तुमच्या करामुळेच देशाची आर्थिक स्थिती सुधारणार असून, आपली आयातीत तेलावर अवलंबून राहण्याची सवयही कमी होणार आहे, असे जेटली यांनी आपल्या फेसबूक पोस्टवर म्हटले आहे. कर बुडविण्याची मानसिकता आपण बदलायलाच हवी. कारण, तुमच्या या करावर विकासाच्या योजना अवलंबून आहेत. मी सर्व नागरिकांना, नोकरदार वर्गाला आणि समाजातील अन्य घटकांना, प्रामाणिकपणे कर भरण्याचे आवाहन करीत आहे, असे जेटली म्हणाले. मध्यम आणि दीर्घ काळाचा विचार केल्यास, आपली आर्थिक शिस्त बिघडवणे देशाला मुळीच लाभदायक ठरणार नाही. भाजपा सरकारच्या गेल्या चार वर्षांच्या काळात सकल राष्ट्रीय उत्पादनात कराचे योगदान १० टक्क्यांवरून ११.५० टक्क्यांवर पोहोचले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
भारतीय अर्थव्यवस्था गतिमान
भारताची अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे, अशी टीका करणार्‍या विरोधकांचाही जेटली यांनी खरपूस समाचार घेतला. मार्चच्या चौथ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेने ७.७ टक्के असा विकासदर साध्य केला आहे. भारतीय अर्थव्यवस्था अतिशय गतीने विकास करीत असल्याचे हे द्योतकच असून, भविष्यात यापेक्षाही मोठा विकासदर आपण गाठणार आहोत, असे जेटली यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम् यांचा, पेट्रोल व डिझेलवर प्रती लिटर २५ रुपये करकपातीचा सल्लाही फेटाळून लावला. अर्थव्यवस्थेला जाळ्यात अडकविणारा असाच त्यांचा सल्ला आहे, अशी टीका जेटली यांनी केली. जीडीपीच्या विकासदरात दोन टक्क्यांची घसरण झाली असल्याचा दावा विरोधक करीत आहेत, पण मार्चमधील दराने ते आता तोंडघशी पडले आहेत, असा दावाही त्यांनी केला.

Posted by : | on : Jun 19 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (151 of 1721 articles)


►शस्त्रसंधीला मुदतवाढ न देण्याचा निर्णय ►दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाईचा निर्धार, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ जून - रमजानच्या पवित्र महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये लागू ...

×