ads
ads
राहुल गांधींचे आरोप खोटे

राहुल गांधींचे आरोप खोटे

►दसाँ एव्हिएशनच्या सीईओचे स्पष्टीकरण ►रिलायन्स कंपनीला आम्ही निवडले, नवी…

असोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली

असोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली

►नॅशनल हेरॉल्ड इमारत रिकामी करण्याचे प्रकरण, नवी दिल्ली, १३…

दरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी

दरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी

नवी दिल्ली, १३ नोव्हेंबर – भारतातून दरवर्षी सुमारे १…

आंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला

आंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला

►रोहिंग्या प्रकरण ►नऊ वर्षांपूर्वी दिला होता पुरस्कार, नेईपिडॉ, १३…

स्टॅन ली यांचे निधन

स्टॅन ली यांचे निधन

►स्पायडर मॅन, हल्क यांचे जनक, न्यू यॉर्क, १३ नोव्हेंबर…

तुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता

तुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता

मुंबई, १३ नोव्हेंबर – अमेरिकेच्या पहिल्या हिंदू खासदार तुलसी…

मंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून शिवसेनेचा गदारोळ!

मंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून शिवसेनेचा गदारोळ!

►कुणी ‘ब्र’ देखील काढला नाही : मुनगंटीवारांचा दावा, मुंबई,…

प्रकाश आंबेडकरांनी टाळला संभाजी भिडेंचा उल्लेख!

प्रकाश आंबेडकरांनी टाळला संभाजी भिडेंचा उल्लेख!

►कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण, मुंबई, १३ नोव्हेंबर – कोरेगाव…

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

►चाचपणी सुरू केली ►राफेल प्रकरणी राकाँच्या भूमिकेने नाराज, मुंबई,…

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

॥ विशेष : धनश्री बेडेकर | हिंदू धर्मात निसर्गचक्राला…

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | भ्रष्टाचाराचे अनेक आश्रयदाते…

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | देशात किंवा कदाचित…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:32 | सूर्यास्त: 17:49
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » निर्भयाच्या मारेकर्‍यांना फाशीच

निर्भयाच्या मारेकर्‍यांना फाशीच

►पुनर्विचार याचिका फेटाळली,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ९ जुलै –
दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणातील तिन्ही नराधमांच्या फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने आज सोमवारी कायम ठेवली आहे.
१६ डिसेंबर २०१२ रोजी रात्रीच्या सुमारास निर्भयावर चालत्या बसमध्ये सहा जणांनी अतिशय अमानूषपणे बलात्कार केला होता. तिला देण्यात आलेल्या प्रचंड यातनांमुळे ती बेशुद्ध झाली होती. यानंतर नराधमांनी तिला चालत्या बसमधून बाहेर फेकले होते आणि ती मेली असावी, असा समज करून पळ काढला होता. १७ दिवस मृत्युशी झुंज दिल्यानंतर २९ डिसेंबर रोजी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या भीषण घटनेतील एक जण अल्पवयीन, तर अन्य चौघे प्रौढ होते. त्यामुळे अल्पवयीन दोषीची तीन वर्षानंतर बालसुधारगृहातून मुक्तता करण्यात आली होती, तर रामसिंग नावाच्या नराधमाने तिहार तुरुंगातच आत्महत्या केली होती. उर्वरित तिघांनी फाशीच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार करावा, अशी विनंती करणारी याचिका दाखल केली होती.
मुकेशकुमार, पवन गुप्ता आणि विनय शर्मा या तिघांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. आर. भानुमती आणि न्या. अशोक भूषण यांच्या तीन सदस्यीय न्यायासनाने याचिका फेटाळून लावली. आम्ही आपल्या गेल्या वर्षीच्या निकालावर फेरविचार करावा, असे कोणतेही ठोस कारण येथे दिसत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. ५ मे २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी चौघांना फाशीची शिक्षा ठोठावली होती. यातील चौथा दोषी अक्षयकुमार सिंह याने पुनर्विचार याचिका दाखल केली नव्हती.
आम्ही गेल्या वर्षी जो निकाल दिला होता, तो चुकीचा होता, किंवा कायद्याला अनुसरून नव्हता, हे सिद्ध करण्यात दोषींना अपयश आले आहे. त्यांनी केवळ दिल्ली उच्च न्यायालयाच्या फाशीच्या आदेशातील त्रुटी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे, असेही न्यायालयाने नमूद केले. कायद्याची चूक असेल तर गुन्हेगारी प्रकरणात पुनर्विचार केला जातो, असे न्या. अशोक भूषण म्हणाले. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ४ मे रोजी या तिघांच्या पुनर्विचार याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. आजच्या सुनावणीवेळी निर्भयाचे कुटुंबीय न्यायालयात उपस्थित होते. नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी निर्भयाच्या कुटुंबीयांनी केली होती.

Posted by : | on : 10 Jul 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (646 of 1747 articles)

Modi Samsung
सॅमसंगच्या सर्वात मोठ्या कारखान्याचे उद्घाटन ►नरेंद्र मोदी व मून जे. इन यांची प्रमुख उपस्थिती, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ९ जुलै - ...

×