कठुआ बलात्कार प्रकरण : मीडियाला प्रत्येकी १० लाखांचा दंड

कठुआ बलात्कार प्रकरण : मीडियाला प्रत्येकी १० लाखांचा दंड

►पीडितेचे नाव जाहीर केल्याने कोर्टाचा संताप ►पुढील सुनावणी २५…

हिंद महासागरात दिसल्या चिनी युद्धनौका

हिंद महासागरात दिसल्या चिनी युद्धनौका

►भारतीय नौदलाचे ‘अनोखे’ स्वागत, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १८ एप्रिल…

देशात चलन तुटवडा नाही

देशात चलन तुटवडा नाही

►बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात पैसा •: अरुण जेटली यांची स्पष्टोक्ती,…

तंत्रज्ञानामुळे विश्‍वासार्हता, पारदर्शकता वाढली : नरेंद्र मोदी

तंत्रज्ञानामुळे विश्‍वासार्हता, पारदर्शकता वाढली : नरेंद्र मोदी

►स्वीडनमधील भारतीयांशी संवाद, वृत्तसंस्था स्टॉकहोम, १८ एप्रिल – डिजिटल…

शिष्टाचार बाजूला सारून नरेंद्र मोदी यांचे स्वीडनमध्ये स्वागत

शिष्टाचार बाजूला सारून नरेंद्र मोदी यांचे स्वीडनमध्ये स्वागत

वृत्तसंस्था स्टॉकहोम, १७ एप्रिल – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…

व्हॉटसअ‍ॅपवरील फोटोमधून मिळवले बोटांचे ठसे

व्हॉटसअ‍ॅपवरील फोटोमधून मिळवले बोटांचे ठसे

►ड्रग व्यापारी गजाआड, ब्रिटिश पोलिसांची कमाल, वृत्तसंस्था लंडन, १७…

भूमिधारी शेतकरी होणार भूमिस्वामी

भूमिधारी शेतकरी होणार भूमिस्वामी

►राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय ►फेरबदलाची रक्कम माफ, वृत्तसंस्था मुंबई,…

सरकारजमा होणार भ्रष्ट लोकप्रतिनिधींची संपत्ती

सरकारजमा होणार भ्रष्ट लोकप्रतिनिधींची संपत्ती

वृत्तसंस्था मुंबई, १८ एप्रिल – लोकप्रतिनिधी किंवा लोकसेवकांनी भ्रष्ट…

कबीर कला मंच रडारवर

कबीर कला मंच रडारवर

►कार्यकर्त्यांच्या घरांवर छापे ►मुंबई, पुणे, नागपुरात कारवाई ►नवी दिल्लीतही…

मर्जी आपली, भवितव्यही आपले

मर्जी आपली, भवितव्यही आपले

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | मोदी सरकारने राष्ट्रहिताशी…

अस्वस्थपर्व…!

अस्वस्थपर्व…!

॥ विशेष : सुधीर पाठक | भगतसिंग मार्क्सवादी होते.…

आत्महत्येची पुर्वतयारी?

आत्महत्येची पुर्वतयारी?

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | म्हणजेच विरोधकांचा…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:08 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » ‘निर्भया’च्या वेळी राहुल गांधी कुठे होते?

‘निर्भया’च्या वेळी राहुल गांधी कुठे होते?

►प्रकाश जावडेकरांचा सवाल,
नवी दिल्ली, १५ एप्रिल –
उन्नाव आणि कठुआ बलात्काराच्या प्रकरणी रात्री रस्त्यावर उतरून कँडल मार्च काढणार्‍या, तसेच कठुआ प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टची मागणी करणार्‍या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर भाजपाने आज पलटवार केला आहे. निर्भया बलात्कार प्रकरणी राहुल गांधी कोठे होते, त्यावेळी त्यांनी कँडल मार्च का काढला नाही, आदी अनेक प्रश्‍नांची सरबत्ती भाजपाचे नेते व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज येथे केली. येथे आयोजित एका पत्रपरिषदेत त्यांनी काँग्रेसला अडचणीत आणले.
कठुआ घटनेच्या वेळी पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली होती, तेव्हा जम्मू-काश्मीर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष गनी अब्दुल मीर यांनी, प्रश्‍न तर उपस्थित होणारच. स्थानिक लोक जर म्हणत आहेत की या घटनेचा मुख्य आरोपी मोकाट आहे, तर त्यात काही तथ्य असेल. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप केला होता. मीर यांच्या त्या वक्तव्याची चित्रफितही जावडेकर यांनी या पत्रपरिषदेत दाखविली. जेव्हा भाजपाने स्थानिक लोकांची भावना मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा सारे जागे झाले आणि विरोधकांनी आरोप करणे सुरू केले. आता त्यांचे प्रदेशाध्यक्ष तीच भाषा बोलत आहे, तेव्हा राहुल गांधी गप्प का आहेत? असाही प्रश्‍न जावडेकर यांनी उपस्थित केला. या प्रकरणी स्थानिक लोकांनी आपली भावना व्यक्त करण्यासाठी रॅली काढली होती, त्यात भाजपाचे दोन मंत्री सहभागी झाले होते. त्यांना मिळालेला प्रतिसाद पाहून काँग्रेसचे धाबे दणाणले होते आणि त्यांनी त्या मंत्र्यांवर आरोप केले होते. त्यामुळे भाजपाच्या त्या मंत्र्यांनी पदाचे राजीनामे दिले होते. आता काँग्रेस आपल्या प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा घेणार का, असेही जावडेकर म्हणाले.
जे राहुल गांधी रात्री रस्त्यावर उतरून कँडल मार्च काढतात, ते आपल्या नेत्यावर कारवाई का करीत नाही. जेव्हा देशात आणि दिल्लीत काँग्रेसचे शासन होते त्यावेळी राजधानी दिल्लीत निर्भया हत्याकांड घडले होते, तेव्हा राहुल गांधी कोठे होते, त्यावेळी सारा देश द्वेषाने पेटून उठला असताना राहुल गांधी यांनी कँडल मार्च का काढला नाही. एवढेच नव्हे तर हरियाणामधील काँग्रेसप्रणित संपुआ सरकारच्या कार्यकाळात महिलांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार झाले. त्रासापायी महिला दिल्लीत मुक्कामाला आल्या होत्या. तेव्हा राहुल गांधी यांनी काय कारवाई केली. काँग्रेसच्या काळात अशाप्रकारच्या अनेक घटना घडल्या, त्यावेळी ते गप्प होते, का? राहुल गांधींची ही दुटप्पी वागणूक का? असा प्रश्‍नही जावडेकर यांनी उपस्थित केला.
कठुआ प्रकरणी आमच्या दोन मंत्र्यांनी राजीनामे दिले. त्यांच्यासारखेच विधान काँग्रेस प्रदेश अध्यक्ष गुलाम मीर यांनी केले. त्यांच्यावर काँग्रेसने का कारवाई केली नाही. आरोपींची पाठराखण करणारे जम्मू बार असोसिएशनचे प्रमुख हे गुलाम नबी आझाद यांच्या निवडणूक मतमोजणीच्या वेळी त्यांचे पोलिंग एजंट होते. आता त्यांची नैतिक जबाबदारी नाही. त्यांनीही देशाची माफी मागायला हवी, अशी मागणीही जावडेकर यांनी केली. उन्नाव आणि कठुआ प्रकरणावरून उगाच राजकारण तापविले जात आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर काँग्रेसला एक चांगला मुद्दा मिळाला आहे. मात्र, भाजपा या दोन्ही प्रकरणी आरोपींना कठोर शासन मिळाले पाहिजे म्हणून आग्रही आहे आणि त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्नही सुरू केले आहे.

Posted by : | on : Apr 16 2018 | Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0.
Both comments and pings are currently closed.

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (16 of 2161 articles)

Pm Modi At Jangala Chattisgadh
►बाबासाहेबांनीच घटनेत दलितांच्या रक्षणाची तरतूद केली ►आपल्या हक्कासाठी नक्षलवादी बनू नका ►पंतप्रधान मोदी यांचे आवाहन, तभा वृत्तसेवा जंगाला, १४ एप्रिल ...

×