ads
ads
गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

•नितीन गडकरी यांची घोषणा, अमरावती, २१ जानेवारी – दक्षिणेतील…

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

बंगळुरू, २१ जानेवारी – प्रख्यात गुरुवर्य आणि कर्नाटकच्या तुमकुरू…

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी – पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:01 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » निवडणुका आल्यावरच कर्जमाफीची भाषा का?

निवडणुका आल्यावरच कर्जमाफीची भाषा का?

उपराष्ट्रपतींचा रोखठोक सवाल,
नवी दिल्ली, २६ ऑक्टोबर –

Venkaiah Naidu5

Venkaiah Naidu5

निवडणुका जवळ आल्यावरच राजकीय पक्ष कर्जमाफीची भाषा का करीत असतात, असा सवाल उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज शुक्रवारी उपस्थित केला. कर्जमाफी हा कृषिक्षेत्रातील समस्यांवर कायमचा तोडगा असूच शकत नाही. या क्षेत्रापुढील नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी दीर्घकालीन आणि ठोस उपायांची गरज असल्याचे प्रतिपादनही उपराष्ट्रपतींनी केले.
पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीनंतर काँगे्रस केंद्रात सत्तेत आल्यास देशभरातील शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली जाईल, असे आश्‍वासन काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकतेच दिले होते. याच अनुषंगाने नायडू यांनी हा सवाल उपस्थित केला.
अन्नधान्याची वाढती मागणी, वातावरणातील बदल आणि पर्यावरणाचा होत असलेला र्‍हास या पृष्ठभूमीवर संसद, राजकीय पक्ष, नीती आयोग आणि प्रसारमाध्यमांनी शेतकर्‍यांच्या समस्यांकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे, पण तसे होताना दिसत नाही. उलट निवडणुका आल्यानंतर आपण सत्तेत कसे येऊ, या एकाच विचाराने अनेक राजकीय पक्ष शेतकर्‍यांना कर्जमाफीचे, मोफत वीज पुरवठ्याचे प्रलोभन दाखवत असतात. यात हे सारेच पक्ष आघाडीवर असतात. मोफत वीज देण्यास माझा व्यक्तिश: विरोध आहे. तसेच कर्जमाफी हा कृषी क्षेत्रातील समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा असू शकत नाही. त्यासाठी दीर्घकालीन उपायांचीच आवश्यकता असते, असेही नायडू यांनी स्पष्ट केले.
तुम्ही सत्तेत आल्यावर फक्त एकदाच कर्जमाफी द्याल, पण नैसर्गिक संकटाचा फटका शेतकर्‍यांना वारंवार बसत असतो. शेतकर्‍यांना प्रत्येकच वर्षी कृषी कर्जाची आवश्यकता असते, मग तुम्ही त्यांना प्रत्येकवेळी कर्जमाफी देणार आहात काय, असा सवालही त्यांनी केला.
देशात अशी कोणती बँक आहे काय, जी तुम्हाला कर्ज देईल आणि त्याची परतफेडच करू नका, असे सांगेल. त्यामुळे आपण दीर्घ मुदतीचा विचार करायला हवा. शेतकरी, वैज्ञानिक आणि धोरणकर्त्यांनी यावर गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
मोफत वीज हा देखील लोकप्रिय नारा झाला आहे. माझा यास विरोध आहे, कारण मोफत वीज म्हणजे, सुरुवातीला कमी वीज आणि त्यानंतर विजेचा पुरवठा खंडित करणे होय. लोकांना चोवीसही तास दर्जेदार वीज हवी असते आणि हीच आजची काळाची गरज आहे, याकडे त्यांनी वेधले.

Posted by : | on : 27 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (436 of 1873 articles)

Ram Madhav4
माधव यांची स्पष्ट भूमिका, नवी दिल्ली, २६ ऑक्टोबर - ब्रिटिश लष्करातील दोन कपटी अधिकार्‍यांनी गिलगिट बाल्टिस्तानचा प्रदेश पाकिस्तानी लष्कराला दिला ...

×