ads
ads
जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

•भारतीय लष्कराचा कठोर संदेश •पुलवामा हल्ल्यामागे पाक लष्कर, आयएसआयच,…

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – महाराष्ट्राच्या कडे-कपारीत ज्यांच्या नावाचा…

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

•एका वैमानिकाचा मृत्यू, दोन सुरक्षित •एअर शो सरावादरम्यान दुर्दैवी…

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

•इम्रान खानची धमकी, इस्लामाबाद, १९ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी…

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

सॅन फ्रान्सिस्को, १९ फेब्रुवारी – मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी…

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

•सर्व आरोप काल्पनिक, आंतरराष्ट्रीय तत्त्वांचीही पायमल्ली •हरीश साळवे यांचा…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

मुंबई, १७ फेब्रुवारी – यापुढे पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » पंतप्रधान मोदींनी दिल्या इम्रान खान यांना शुभेच्छा

पंतप्रधान मोदींनी दिल्या इम्रान खान यांना शुभेच्छा

फोनद्वारे केली चर्चा,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ३१ जुलै –

Pm Narendra Modi2

Pm Narendra Modi2

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानमधील तहरिक ए इन्साफ पक्षाचे (पीटीआय) प्रमुख आणि माजी क्रिकेट कर्णधार इम्रान खान यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पाकिस्तानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पीटीआय सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आल्याबद्दल मोदी यांनी इम्रान यांचे अभिनंदनही केले.
मोदींनी इम्रान खान यांना फोन करून शुभेच्छा दिल्या. शिवाय शेजारच्या राष्ट्राशी शांततेच्या मार्गाने विकास साध्य करायचा असल्याचे त्यांनी फोनवरून सांगितले आणि पाकिस्तानमध्ये लोकशाहीची पाळेमुळे आणखी बळकट होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पाकिस्तानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या पीटीआयने सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. आपण ११ ऑगस्ट रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेऊ, असे इम्रान खान यांनी जाहीर केले असून याबाबतची अधिकृत घोषणा पुढच्या ४८ तासात होईल, असे त्यांनी सांगितले आहे.
पाकिस्तानमध्ये २५ जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत इम्रान खान यांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. असे असले तरी पीटीआयकडे अजून बुहमताचा आकडा नाही. त्यामुळे छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.
पाकिस्तान संसदेच्या ३४२ जागांपैकी २७२ जागा प्रत्यक्ष निवडून येतात. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमतासह सरकार स्थापन करण्यासाठी १७२ जागांची गरज असते. मात्र, प्रत्यक्ष निवडून आलेल्या २७२ जागांपैकी १३७ जागा बहुमतासाठी गरजेच्या आहेत. संसदेतील ६० जागा महिलांसाठी, तर १० जागा अल्पसंख्यांकांसाठी राखीव ठेवल्या जातात. दरम्यान, इम्रान खान यांच्या हातात पाकिस्तानचे नेतृत्व गेल्यानंतर सीमेवर शांतता स्थापित होण्याची अपेक्षा आहे. दोन्ही देशांमधून हीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, मोदी याअगोदर गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही इम्रान खान यांच्याशी त्यांची भेट झाली आहे.
पाकिस्तानात नरेंद्र मोदींना शपथविधीचे निमंत्रण?
लाहोर – पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीनंतर सत्तेच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफने इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्याचे ठरवले आहे.
येत्या ११ ऑगस्ट रोजी इम्रान खान पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. स्वत: इम्रान खान यांनीच सोमवारी याबाबतची घोषणा केली होती.
सार्क परिषदेतील सर्वच सदस्य देशांच्या प्रमुखांना आपल्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण पाठविण्याची तयारी इम्रान खान यांच्या पक्षाने सुरू केली आहे, अशी माहिती त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
नरेंद्र मोदी यांनी आज सकाळीच इम्रान खान यांना फोन करून विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. इम्रान खान यांच्या नेतृत्वात भारत आणि पाक संबंध सुरळीत होतील आणि मैत्रीचे नवे पर्व सुरू होईल, याचेच हे संकेत आहेत, असे या नेत्याने सांगितले.
विशेष म्हणजे, नरेंद्र मोदी यांनीही मे २०१४ मध्ये आपल्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याला सार्क परिषदेतील सर्वच सदस्य राष्ट्रांच्या प्रमुखांना निमंत्रण दिले होते. पाकचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ या सोहळ्यात उपस्थित झाले होते.

Posted by : | on : 1 Aug 2018
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (1067 of 2042 articles)

Rajya Sabha
संसदेत माहिती, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ३१ जुलै - भारतामध्ये ६१,१६४ किमी महामार्ग बांधणीची कामे सुरू असून त्या प्रकल्पांची किंमत ६ ...

×