ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » पदोन्नतीतील आरक्षणाचे राज्यांनी बघावे

पदोन्नतीतील आरक्षणाचे राज्यांनी बघावे

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल,
नवी दिल्ली, २६ सप्टेंबर –

Supreme Court 6

Supreme Court 6

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (एससी, एसटी) प्रवर्गांना पदोन्नतीत आरक्षण देण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे नकार न देता, हे प्रकरण राज्यांवर सोडले आहे. राज्यांना वाटल्यास ते एससी, एसटींना पदोन्नतीत आरक्षण देऊ शकतात, असे सांगतानाच पदोन्नतीत आरक्षण देण्याबाबतचे प्रकरण मात्र सात सदस्यांच्या न्यायासनाकडे सोपवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
यावेळी सर्वोच्च न्यायालयाने एससी, एसटींच्या पदोन्नतीतील आरक्षणाबाबतच्या नागराज खटल्याचेही उदाहरण दिले.
नागराज खटल्यात अनुसूचित जाती आणि जमातींच्या मागासलेपणाचे अधिकृत रेकॉर्ड असावे हे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, राज्यांनी विविध वर्गांचे मागासलेपण दूर करण्यासाठी सार्वजनिक रोजगारात त्या वर्गांचे प्रतिनिधित्व पुरेसे नसल्याचे रेकॉर्ड ठेवण्याची गरज नसल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. दरम्यान, २००६ मध्ये नागराज खटल्यात दिलेला निर्णय ७ सदस्यांच्या खंडपीठाकडे सोपवण्याची गरज नाही. हा निर्णय योग्यच आहे. त्यावर पुन्हा विचार करण्याची गरज नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि राज्यांचे युक्तिवादही ग्राह्य धरले आहेत. विशेष म्हणजे पदोन्नतीत आरक्षण देण्यासाठी मागासलेपणाचा अभ्यास करणे ही सर्वात मोठी समस्या होती. मात्र, न्यायालयाच्या निर्णयामुळे या सर्वेक्षणाची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने राज्यांना पदोन्नतीत आरक्षण लागू करणे सोपे जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश कुरियन जोसेफ, रोहिंग्टन नरीमन, संजय किशन कौल आणि इंदू मल्होत्रा यांच्या न्यायासनाने हा निर्णय दिला.
पदोन्नतीत आरक्षणाबाबतचा वाद अनेक वर्षांचा आहे. १९९२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा सहानी विरुद्ध सरकार या खटल्यात पदोन्नतीतले आरक्षण घटनाबाह्य ठरवणारा निकाल दिला. १९९५ साली काँग्रेस सरकारने घटनादुरुस्ती करून त्यात अनुच्छेद १६/४ अचा समावेश केला आणि पदोन्नतीत आरक्षणाचे धोरण चालू ठेवले. या दुरुस्तीनंतरही प्रकरण पुन्हा न्यायालयात गेले. २००६ मध्ये नागराज विरुद्ध केंद्र सरकार याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने सरकारची घटनादुरुस्ती मान्य केली. मात्र, या संदर्भात कोणताही कायदा बनवण्यापूर्वी तीन शर्तींचे सक्तीने पालन करण्याचा आदेशही दिला होता. अनुसूचित जाती आणि जमातींच्या मागासलेपणाचे अधिकृत रेकॉर्ड तयार करावे, पदोन्नतीत या जाती-जमातींना योग्य जागा मिळाली, अथवा खरोखर वंचित ठेवण्यात आले याचेही रेकॉर्ड तयार करावे, पदोन्नतीतल्या आरक्षणामुळे प्रशासकीय क्षमतेवर कोणताही विपरित प्रभाव पडणार नाही, याची काळजी घेण्यात यावी, अशा या शर्ती आहेत.
सहमत नाही ः रामदास आठवले
मुंबई ः अनुसूचित जाती जमातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी असहमती दर्शवली आहे.
अनुसूचित जाती/जमातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारांना देण्याचा निर्णय योग्य नसल्याचे सांगत सर्वच राज्यांची सरकारे अनुसूचित जाती/जमातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण देणारा निर्णय घेतील, असे नाही. त्यामुळे संविधानाने दिलेला आरक्षणाचा अधिकार अनुसूचित जाती/जमातींना आणि मागासवर्गीयांना मिळाला पाहिजे यासाठी संसदेत कायदा करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
रालोआ घटक पक्षांच्या बैठकीत अनुसूचित जाती व जमातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करण्यासाठी संसदेत कायदा करावा, ही रिपब्लिकन पक्षाची मागणी आपण मांडली आहे. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची लवकरच भेट घेऊन संसदेत अनुसूचित जाती/जमातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करणारा कायदा आगामी अधिवेशनात मंजूर करावा, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अनुसूचित जाती/जमातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. अनुसूचित जातीजमातींवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 27 Sep 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (254 of 1774 articles)


न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, नवी दिल्ली, २६ सप्टेंबर - सर्वोच्च न्यायालयाने आज काही ऐतिहासिक निर्णय दिले आहेत. त्यापैकी एक म्हणजे काही ...

×