ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » पाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधानांना न विचारताच?

पाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधानांना न विचारताच?

नवी दिल्ली, २२ ऑक्टोबर –

Uno United Nations Building

Uno United Nations Building

संयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यू यॉर्क येथे झालेल्या आमसभेदरम्यान सुषमा स्वराज पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने २० सप्टेंबर रोजी दिली होती. मात्र, परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सल्लामसलत केली नव्हती, अशी माहिती साऊथ ब्लॉकच्या एका उच्चपदस्थ सूत्राने दिल्याचा दावा ‘द हिंदू’ वृत्तपत्राने केला आहे.
पंतप्रधानांसोबत सल्लामसलत न झाल्याने, दुसर्‍या दिवशी म्हणजे २१ सप्टेंबर रोजी परराष्ट्र मंत्रालयाने वेगळे वक्तव्य करीत ही चर्चा रद्द झाल्याचे सांगितले. ही घोषणा करण्यापूर्वी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीसोबत बैठक झाली नसल्याचा दुजोरा अधिकार्‍याने दिला, असा दावाही या वृत्तात करण्यात आला. पंतप्रधानांसोबत सल्लामसलत झाली अथवा नाही, असा प्रश्‍न परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांना विचारला असता, त्यांनी यावर तत्काळ प्रतिसाद दिला नसल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रतिसाद देणारे पत्र पाकिस्तानातील भारतीय दूतावासाला १७ सप्टेंबर रोजी प्राप्त झाले. त्याच दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मंत्र्यांची चर्चा व्हावी, या आशयाचे पाकिस्तानने पाठवलेले पत्र त्याच दिवशी प्राप्त झाले, असे रवीश कुमार यांनी २० सप्टेंबर रोजी सांगितले होते.
काश्मीर मुद्दा चर्चेच्या माध्यमातूनच सोडवावा : इम्रान खान
इस्लामाबाद : काश्मीर मुद्दा चर्चेतूनच सोडवण्यासाठी भारताने समोर यावे, असे आवाहन पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज सोमवारी केले आहे. दक्षिण काश्मीरमधील कुलवामा येथे रविवारी चकमकीदरम्यान झालेल्या स्फोटात ६ नागरिकांना प्राण गमवावे लागले, त्यानंतर त्यांनी हे आवाहन केले आहे. भारतीय सुरक्षा दलाकडून होणार्‍या नागरिकांच्या हत्येचा मी निषेध करतो, असे ट्विट त्यांनी केले.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावाप्रमाणे आणि काश्मिरी नागरिकांच्या इच्छेप्रमाणे हा मुद्दा चर्चेच्या माध्यमातून सोडवला जावा, याची जाणीव आता भारताला झाली असेल, असेही त्यांनी सांगितले.
कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चमकीत सुरक्षा दलाने तीन अतिरेक्यांचा खातमा केला होता. या चकमकीवेळी झालेले स्फोट व गोळीबारात ६ नागरिकांचाही मृत्यू झाला होता. काश्मीरचे तुणतुणे वाजवायची ही इम्रान खान यांची पहिलीच वेळ नाही.
पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय जवानाची क्रूर हत्या झाल्यावर आणि बुर्‍हान वाणीवरील टपाल तिकीट पाकिस्तानने काढल्यावर भारत-पाकिस्तानदरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या पातळीवरील सप्टेंबरमध्ये होणारी बैठक भारताने रद्द केली होती.
पाकिस्तानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांनी जुलैमध्ये विजय मिळवल्यानंतर इम्रान खान यांनी भारतासोबत संबंध सुरळीत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावेळीही काश्मीर हा महत्त्वाचा मुद्दा असल्याने तो चर्चेच्या माध्यमातून सोडवला जावा, असेही म्हटले होते. भारत-पाकिस्तानचे संबंध सुरळीत होणे संपूर्ण क्षेत्राच्या फायद्याचे आहे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले होते.
जम्मू-काश्मीर हा भारताचाच भाग असल्याचे सरकारने वारंवार स्पष्ट करीत गुलाम काश्मिरावर पाकिस्तानचा अवैध ताबा असल्याचेही स्पष्ट केले आहे.
पाकने घुसखोरांचे मृतदेह परत घेऊन जावे
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरातील सुंदरबनी क्षेत्रात नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करणाचा दहशतवाद्यांचा डाव भारतीय लष्कराने मोडून काढत त्यांचा खातमा केला होता. त्या घुसखोरांचे मृतदेह पाकिस्तानात परत घेऊन जाण्याची सूचना भारतीय लष्कराने पाक सैन्याकडे केली आहे, असे अधिकृत सूत्रांनी आज सोमवारी सांगितले. या घुसखोरांच्या हालचालींवरून त्यांना पाकच्या बॅट टीमने प्रशिक्षण दिले असल्याचे एका अधिकार्‍यांने सांगितले.

Posted by : | on : 23 Oct 2018
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (130 of 1774 articles)

Supreme Court 6
न्यायालयाने फेटाळली याचिका, नवी दिल्ली, २२ ऑक्टोबर - लग्नासाठी मुलाचे वय २१ वरून १८ वर्षे करण्याबाबत दाखल केलेली याचिका सर्वोच्च ...

×