ads
ads
जगातील सर्वात मोठ्या एलपीजी पाईपलाईनचे उद्या भूमिपूजन

जगातील सर्वात मोठ्या एलपीजी पाईपलाईनचे उद्या भूमिपूजन

नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी – स्वयंपाकाच्या (एलपीजी) गॅसच्या देशातील…

‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्येच राहणार पाकिस्तान

‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्येच राहणार पाकिस्तान

नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जागतिक…

शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता उद्या

शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता उद्या

•एकाच वेळी १२ कोटी खात्यात होणार जमा, नवी दिल्ली,…

पुलवामा हल्ल्याचा सुरक्षा परिषदेकडून धिक्कार

पुलवामा हल्ल्याचा सुरक्षा परिषदेकडून धिक्कार

•जैश-ए-मोहम्मदचा स्पष्ट उल्लेख •भारताच्या मुत्सद्देगिरीचा विजय, संयुक्त राष्ट्रसंघ, २२…

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार

•रक्कम ‘नमामि गंगे’ला समर्पित, सेऊल, २२ फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

शिक्षकांना सातवा वेतन आयोग, शासन निर्णय जारी

शिक्षकांना सातवा वेतन आयोग, शासन निर्णय जारी

मुंबई, २२ फेब्रुवारी – महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:49 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » पाक सैनिक, अतिरेक्यांना धडा शिकवण्याची वेळ

पाक सैनिक, अतिरेक्यांना धडा शिकवण्याची वेळ

लष्करप्रमुख रावत यांचा इशारा,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २२ सप्टेंबर –

Bipin Rawat Pti

Bipin Rawat Pti

पाकिस्तानी सैनिक आणि त्यांच्या आश्रयात असलेल्या अतिरेक्यांनी जी कू्ररता सुरू केली आहे, ती ठेचण्याची आणि त्यांना अद्दल घडविणारा धडा शिकविण्याची वेळ आता आलेली आहे, असा स्पष्ट इशारा लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी आज शनिवारी विशद केली.
पाकी सैनिक आणि अतिरेक्यांनी अलीकडील काळात कू्ररतेची सीमा ओलांडली आहे. आता कठोर कारवाई करण्याची वेळ आलेली आहे. आता शांत बसता येणार नाही. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागणार आहे, पण याचा अर्थ आम्हीही त्यांच्यासारखेच कू्रर वागणार, असा मुळीच नाही. आम्हाला ज्या वेदना होत आहेत, त्याच वेदना त्यांनाही होतील, अशा पद्धतीने आम्ही कारवाई करणार आहोत, असे जनरल रावत यांनी स्पष्ट केले.
पाकसोबत चर्चा करण्यासंदर्भात विचारले असता, सरकारच्या भूमिकेशी मी पूर्णपणे सहमत आहे. शांतता चर्चा आणि दहशतवाद एकाचवेळी हातात हात घालून प्रवास करू शकत नाही. भारतासोबत चर्चा हवी असेल, तर पाकला दहशतवाद थांबवावाच लागेल, असे रावत यांनी सांगितले. भारत सरकारने न्यूयॉर्क येथे होणारी परराष्ट्र व्यवहार मंत्री स्तरावरील चर्चा रद्द केल्यानंतर पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचा निर्णय अहंकारी असल्याची टीका केली. यानंतर लगेच लष्करप्रमुखांनी पत्रपरिषद बोलावून पाकच्या दुटप्पी धोरणाचा समाचार घेतला.
लष्कराच्या तालावर नाचणार्‍यांशी चर्चा अशक्य : भाजपा
इम्रान खान यांचे सरकार पाकिस्तान लष्कराच्या आशीर्वादाने विराजमान झाले आहे. लष्कराच्या आदेशाशिवाय पंतप्रधान इम्रान खान एकही निर्णय घेऊ शकत नाहीत. दहशतवादाचा विमोड करण्याच्या कितीही गप्पा ते मारत असले, तरी त्यांच्यात ती क्षमता नाही. कारण, दहशतवाद हा पाकिस्तानी लष्कराच्या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे दहशतवादाला आश्रय देणार्‍या तसेच लष्कराच्या तालावर नाचणार्‍या पाकिस्तान सरकारशी द्विपक्षीय चर्चा रद्द करण्याचा भारत सरकारचा निर्णय अतिशय योग्य असाच आहे, असे भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले.
एकीकडे आमच्या सैनिकांची क्रूर हत्या करून त्यांच्या मृतदेहाची विटंबना करायची, आयएसआयच्या आदेशाने पोलिसांचे अपहरण करून त्यांना ठार मारायचे आणि दुसरीकडे भारतासोबत शांतता चर्चेचा प्रस्ताव सादर करायचा, हे कोणते धोरण आहे, असा सवालही त्यांनी केला.
पाकने दिली युद्धाची धमकी
जनरल रावत यांच्या भूमिकेने संतप्त झालेल्या पाकच्या लष्करी महासंचालनालयाने थेट भारताला युद्धाचीच धमकी दिली. भारताला शांतता मान्य नसल्यास आम्हीही युद्धासाठी सज्ज आहोत, असे पाकच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. आम्हाला वेदना होतील, अशी कारवाई करण्याची भारतीय लष्करप्रमुखांची भाषा युद्धाला प्रोत्साहन देणारीच आहे. आम्हीही युद्धासाठी सज्ज आहोत, असे हा अधिकारी म्हणाला.

Posted by : | on : 23 Sep 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (794 of 2060 articles)


सरकारचाही खरा चेहरा दिसला ►भारताचा स्पष्ट आरोप, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २१ सप्टेंबर - न्यू यॉर्क येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या अनुषंगाने ...

×