ads
ads
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ते विधान भाजपाने नाकारले

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ते विधान भाजपाने नाकारले

नवी दिल्ली, १९ एप्रिल – शहीद हेमंत करकरे यांच्यासंदर्भात…

रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू संशयास्पद

रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू संशयास्पद

•खुनाचा गुन्हा दाखल, नवी दिल्ली, १९ एप्रिल – उत्तरप्रदेश…

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:08 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » पाच शहरी नक्षल्यांना अटक, पोलिसांच्या धाडी

पाच शहरी नक्षल्यांना अटक, पोलिसांच्या धाडी

►मोदींचा हत्येचा कटप्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई
►मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह साहित्य जप्त
►भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण,
वृत्तसंस्था
पुणे, २८ ऑगस्ट –

City Naxal Varavara Rao, Vernon Gonsalves, Sudha Bharadwaj

City Naxal Varavara Rao, Vernon Gonsalves, Sudha Bharadwaj

पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे घडलेल्या हिंसाचारात नक्षल्यांचा हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या परिषदेशी संबंधित काही लोकांचे नक्षल्यांशी संबंध आहेत काय, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आयोजित एल्गार परिषदेच्या काळात याचा छडा लावण्यासाठी पुणे पोलिसांनी आज मंगळवारी विविध राज्यांमध्ये धाडी टाकल्या. या कारवाईत नक्षलसमर्थक पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
पुणे पोलिसांच्या विविध पथकांनी आज पहाटेलाच हैदराबाद, मुंबई, गोवा, दिल्ली, छत्तीसगड येथे छापे घालून शोधमोहीम हाती घेतली. नक्षल्यांच्या समर्थनात नेहमीच लिखाण करणारे वरावरा राव (हैदराबाद), वेर्नोन गोन्सालविस, अरुण फेरिरा (मुंबई), कामगार संघटनेच्या नेत्या सुधा भारद्वाज (छत्तीसगड) आणि नागरी हक्क संघटनेचा कार्यकर्ता गौतम नवलखा (दिल्ली) यांच्या घरावर धाडी घालण्यात आल्या. या सर्वांच्या घरांची असून झडती घेण्यात आली असून, यात मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह कागदपत्रे आणि अन्य नक्षलसमर्थक दस्तावेज ताब्यात घेण्यात आले आहे. पुण्याचे सहपोलिस आयुक्त शिवाजी बोडखे यांनीही या धाडसत्राला दुजोरा दिला आहे.
चौघांना अटक, नवलखा नजरकैदेत
या कारवाईनंतर पोलिसांनी वरावरा रावला हैदराबादेतील व सुधा भारद्वाजला फरिदाबाद येथे घरातून अटक करण्यात आली असून, नवलखाला दिल्लीतील त्याच्या घरातच नजरकैद करण्यात आले आहे. याशिवाय, करुण फेरीराला ठाण्यातील आणि वर्नोन गोन्सालविसला मुंबईतील घरात बेड्या ठोकण्यात आल्या. नवलखाला दिल्लीत अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याला पुण्यात नेण्यासाठी न्यायालयात ट्रान्झिट रिमांड मागितला, पण न्यायालयाने त्यास नकार दिला आणि उद्या बुधवारी सुनावणी करण्याचा निर्णय घेतला. उद्यापर्यंत नवलखाला त्याच्या घरातच नजरकैदेत ठेवण्यात यावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले.
आधीच दाखल झाली होती याचिका ः पुणे पोलिसांनी भारद्वाजच्या घराची झडती सुरू केल्यानंतर काही वेळातच त्याच्या वकिलाने दिल्ली उच्च न्यायालयात हेबिअस कार्पस याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने त्याला एक दिवसाचा दिलासा दिला आहे.
यांच्या घरावरही धाडी ः पुणे पोलिसांनी रांची येथील सुसान अब्राहम, क्रांती टेकुला, फादर स्टॅन स्वामी आणि गोव्यातील आनंद तेलतुंबडे यांच्या घरांवरही धाडी घातल्या असून, तिथेही पोलिसांना मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आढळून आली आहेत.
एल्गार परिषदेनंतरची कारवाई ः १८१८ मधील कोरेगाव भीमा लढाईला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पुण्यातील शनिवारवाडा येथे गेल्या वर्षी ३१ डिसेंबर रोजी आयोजित एल्गार परिषदेत नक्षल्यांनी पैसे पुरविल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणी पुणे पोलिसांनी परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे, अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, रॉनी विल्सन आणि प्रा. शोमा सेन यांना अटक केली होती.
पंतप्रधान मोदी होते लक्ष्य ः त्यांच्याकडे सापडलेल्या २५० ई-मेल आणि पत्रांमध्ये या पाचवी जणांचा नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याचे दिसून आले. यातील एका पत्रात वरावरा राव यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेखही आहे. एल्गार परिषदेत या नेत्यांनी प्रक्षोभक भाषणेही दिली होती. राजीव गांधी यांची ज्याप्रमाणे हत्या करण्यात आली होती, त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य बनविण्यात यावे, असे यातील एका पत्रात नमूद होते.
तपासाच्या काळात पोलिसांनी हैदराबाद, मुंबई, दिल्ली तसेच छत्तीसगडमध्ये या नक्षली समर्थकांशी संबंधित असलेल्यांची माहिती घेतली. ते त्यांच्या घरातच असल्याची खात्री झाल्यानंतर आज पहाटे एकाचवेळी धाडी घालण्यात आल्या. दुपारी उशिरापर्यंत हे धाडसत्र सुरू होते. नक्षलवादी संघटनांशी या पाचही जणांचे संबंध उघड झाल्याने त्यांची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मानवाधिकार संघटनांचे रडगाणे ः या कारवाईवर मानवी हक्क संघटनांनी मात्र रडगाणे सुरू केले आहे. हे अटकसत्र केंद्र सरकारचे घातक इरादेच सिद्ध करीत आहे. हे सरकार झपाट्याने जनाधार गमावत असल्याने नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी सरकारने हा मार्ग स्वीकारला आहे. अतिशय हास्यापद आरोपांमध्ये वकील, कवी, लेखक, दलित नेते आणि विचारवंतांना अटक करण्यात येत आहे, असा आरोप वामपंथी लेखिका अरुंधती रॉय यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना केला.
डाव्यांचाही थयथयाट ः नागरी आणि मानवी हक्क कार्यकर्त्यांच्या घरांवर टाकण्यात आलेल्या धाडींवर डाव्या पक्षांनीही आक्षेप घेतला आहे. लोकशाही आणि नागरी स्वातंत्र्यावर केंद्र सरकारने केलेला हा फार मोठा आघातच आहे, असा आरोप माकपने केला. या सर्व कार्यकर्त्यांवर दाखल असलेले गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे आणि त्यांना मुक्त करण्यात यावे, अशी मागणी माकप पोलिट ब्युरोने केली आहे. तर, भाकपने (एमएल) आजच्या स्थितीमुळे १९७५ च्या आणिबाणीची आठवण ताजी केल्याची टीका केली.

Posted by : | on : 29 Aug 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (1286 of 2394 articles)


अहमदाबाद, २८ ऑगस्ट - नोटबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर पहिल्या पाच दिवसांत अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेत ७४६ कोटी रुपयांच्या बाद नोटा ...

×