काँग्रेस अविश्‍वास प्रस्ताव आणणार

काँग्रेस अविश्‍वास प्रस्ताव आणणार

►मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १७…

काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर

काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर

►दिग्विजयसिंह, द्विवेदी, कमलनाथ, शिंदे बाहेर, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७…

टेरेसांच्या बालसंगोपन संस्थांची चौकशी होणार

टेरेसांच्या बालसंगोपन संस्थांची चौकशी होणार

►केंद्र सरकारचे राज्यांना आदेश, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ जुलै…

नवाझ शरीफ व कन्येचा तुरुंगातील मुक्काम वाढला

नवाझ शरीफ व कन्येचा तुरुंगातील मुक्काम वाढला

►याचिकेवरील सुनावणी तहकूब, वृत्तसंस्था इस्लामाबाद, १७ जुलै – भ्रष्टाचाराच्या…

शरीफ कुटुंबीयांची उच्च न्यायालयात याचिका

शरीफ कुटुंबीयांची उच्च न्यायालयात याचिका

वृत्तसंस्था इस्लामाबाद, १६ जुलै – भ्रष्टाचार प्रकरणात दोषी आढळलेल्या…

दहशतवादाविरोधात सर्व देशांनी एकत्र यावे

दहशतवादाविरोधात सर्व देशांनी एकत्र यावे

►राजनाथसिंह यांनी घेतली शेख हसीनांची भेट, वृत्तसंस्था ढाका, १४…

शिवस्मारकाच्या उंचीवरून विधानसभेत गदारोळ

शिवस्मारकाच्या उंचीवरून विधानसभेत गदारोळ

►चार वेळा कामकाज तहकूब, तभा वृत्तसेवा नागपूर, १७ जुलै…

दूध दरवाढीवरून विधिमंडळात गोंधळ

दूध दरवाढीवरून विधिमंडळात गोंधळ

►विधानसभेत सभात्याग ►विधानपरिषदेत कामतहकुबी, तभा वृत्तसेवा नागपूर, १६ जुलै…

मालेगावात पेटविला दुधाचा टँकर

मालेगावात पेटविला दुधाचा टँकर

►स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल, तभा वृत्तसेवा मालेगाव,…

निदान हा कोहिनूर तरी नीट सांभाळु!

निदान हा कोहिनूर तरी नीट सांभाळु!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | मोदी हटाव मोहीमेवर…

का वाढताहेत झुंडशाहीतून हत्या?

का वाढताहेत झुंडशाहीतून हत्या?

॥ विशेष : कृष्णा चांदगुडे, सामाजिक कार्यकर्ते | आधुनिक…

महापुरुष कोण, हे कोण ठरविणार?

महापुरुष कोण, हे कोण ठरविणार?

॥ रोखठोक : हितेश शंकर | आपल्या देशात एका…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:02 | सूर्यास्त: 19:03
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संसद » पावसाळी अधिवेशनाचे कामकाज सुरळीतपणे चालू द्या

पावसाळी अधिवेशनाचे कामकाज सुरळीतपणे चालू द्या

►सुमित्रा महाजन यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, १० जुलै –
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरळीतपणे चालण्यासाठी तसेच सभागृहाचे कामकाज नियमितपणे होण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी एका पत्रातून सर्वपक्षीय खासदारांना केले आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गोंधळामुळे कोणतेच कामकाज होऊ शकले नव्हते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला १८ जुलैपासून प्रारंभ होत असून, १० ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे, त्या पार्श्‍वभूमीवर महाजन यांनी हे आवाहन केले आहे. १६ व्या लोकसभेने आपल्या शेवटच्या वर्षात प्रवेश केला आहे, या वर्षात संसदेची तीन अधिवेशन होणार आहेत, आपल्याजवळ वेळ अतिशय कमी आहे आणि आपल्याला खूप सारे संसदीय कामकाज पूर्ण करायचे आहे, त्यामुळे तुम्ही सभागृहाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन सुमित्रा महाजन यांनी या पत्रातून केले आहे.
आपल्या दोन पानांच्या या पत्रात सुमित्रा महाजन यांनी म्हटले की, लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर असलेल्या संसदेची प्रतिष्ठा आणि पावित्र्य कायम राखणे ही आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. याआधी दुसर्‍या पक्षांनीही संसदेच्या कामकाजात अडथळे आणले होते. आपण आणत असलेल्या अडथळ्यांचे समर्थन केले जात असेल तर, अडथळ्यांचे हे चक्र कधीच संपणार नाही. संसदेच्या पावसाळी आणि हिवाळी अधिवेशनातच जास्त कामकाज होऊ शकते, याकडे लक्ष वेधत महाजन म्हणाल्या की, मागील अधिवेशनात सभागृहात गोंधळामुळे काहीच कामकाज होऊ शकले नाही, माननीय सदस्य हातात पोस्टर्स घेऊन सभागृहाच्या वेलमध्ये येतात आणि घोषणाबाजी करून सभागृहाच्या कामकाजात अडथळे आणतात. त्यामुळे वारंवार सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागते.
आपल्या मतदारसंघातील जनतेचे आपल्या कामकाजावर आणि वागणुकीवर बारिक नजर असते, माध्यमे सुद्धा तुमची संसदेत वागणूक कशी आहे, हे मतदारांपर्यंत पोहोचवत असतात, हे मी माझ्या अनुभवावरून सांगते. संसदेच्या सभागृहाचे सदस्य होणे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. लोकांचा तुमच्यावर विश्‍वास असतो आणि त्यामुळेच तुमच्याकडून त्यांच्या अपेक्षाही असतात, या अपेक्षांची पूर्तता तुम्ही केली पाहिजे. तुम्ही आपल्या मतदारसंघाच्या नाही तर देशाच्या अपेक्षांनाही खरे उतरले पाहिजे, तसेच देशाच्या विकासात तसेच लोकशाही सुदृढ करण्यात आपले योगदान दिले पाहिजे, असे त्यांनी यात नमूद केले.
सभागृहातील तुमच्या वागणुकीचा तसेच दर्जेदार चर्चेचा देशातील तरुणांवर प्रभाव पडत असतो, असे स्पष्ट करत आणि भगवतगीतेतील एका श्‍लोकाचा संदर्भ देत महाजन म्हणाल्या की, प्रामाणिक व्यक्ती जे करत असतो, दुसरे त्याचे अनुकरण करत असतात.

Posted by : | on : Jul 11 2018
Filed under : राष्ट्रीय, संसद.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संसद (42 of 1721 articles)

Supreme Court 2
वृत्तसंस्था नवी दिल्ली, १० जुलै - [caption id="attachment_52906" align="alignleft" width="300"] Supreme Court 2[/caption] समलिंगी संबंधांना परत गुन्हा ठरविण्यात यावे, अशी ...

×