ads
ads
तिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक

तिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक

►हवाईदल प्रमुख धानोआ यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर…

‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

►६८ टक्के लाभार्थ्यांनी घेतला फायदा, नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर…

फक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा

फक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा

►एनआरसीमध्ये समावेश करण्याचा मुद्दा, गुवाहाटी, १८ नोव्हेंबर – राष्ट्रीय…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

१३ विधेयके सादर होणार

१३ विधेयके सादर होणार

►आजपासून मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ►मराठा आरक्षणाचे विधेयकही सादर…

वरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता

वरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता

►पुणे पोलिसांचा न्यायालयात दावा ►आठ दिवसांची पोलिस कोठडी, पुणे,…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:35 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » पेट्रोल, डिझेलचे दर का कमी केले नाही?

पेट्रोल, डिझेलचे दर का कमी केले नाही?

►अरुण जेटली यांचा काँगे्रसवर जोरदार हल्ला
►सोशल मीडिया, टीव्हीवरच व्यक्त होते का चिंता,
नवी दिल्ली, ६ ऑक्टोबर –

Arun Jaitly2

Arun Jaitly2

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात केल्यानंतर लगेच भाजपाशासित राज्यांनी दरकपात करून नागरिकांना मोठा दिलासा दिला, पण काँगे्रस आणि अन्य विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांनी अद्याप दरकपात केलेली नाही. आतापर्यंत इंधनाच्या वाढत्या किमतीवरून सरकारवर टीका करून, सर्वसामान्यांविषयी चिंता व्यक्त करणार्‍या विरोधकांचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यांना सामान्यांची काळजी नाही, तर सोशल मीडियावर ट्विट करून आणि वृत्तवाहिन्यांवर चमकून त्यांना केवळ राजकारण करायचे आहे, असा जोरदार हल्ला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज शनिवारी चढवला.
‘तेलाच्या किमती आणि विरोधकांचे ढोंग’ या शीर्षकाखाली लिहिलेल्या फेसबुक पोस्टवर अरुण जेटली यांनी काँगे्रस आणि अन्य विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढत असताना, सर्वच राज्यांनी अतिरिक्त कर वसूल केला, पण केंद्र सरकारने या दोन्ही इंधनाच्या किमतीत कपात केली असतानाही गैरभाजपा आणि गैररालोआशासित राज्यांनी दरकपातीचा निर्णय घेतला नाही. किमती वाढत असताना हेच विरोधक अगदी दररोज फेसबुक, ट्विटर आणि वृत्तवाहिन्यांवरून सरकारवर टीका करण्याची आणि सामान्यांच्या काळजीचे ढोंग करण्याची एकही संधी सोडत नव्हते. हीच काय ती काळजी. तुम्हाला जर सामान्य नागरिकांची काळजी असती, तर तुम्ही देखील तीन दिवसांपूर्वीच पेट्रोल व डिझेलच्या किमती कमी केल्या असत्या, अशी खरमरीत टीका जेटली यांनी केली.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने जे आव्हान निर्माण झाले आहे, त्याचा सामना ट्विटर, फेसबुक किंवा वृत्तवाहिन्यांवर टीका करून करता येणार नाही. या विरोधकांनी सांगावे की, कच्च्या तेलाच्या किमती वाढत असताना, जादा कर आकारून त्यांनी आपली तिजोरी भरली नाही काय, मग आता केंद्राने दरकपात केली असताना ते जनतेला दिलासा देण्यासाठी कोणत्या मुहूर्ताची प्रतीक्षा करीत आहे, असा स्पष्ट सवाल त्यांनी केला.
बँका, मोबाईल कंपन्या आधारचा वापर करू शकतात
संसदेने जो कायदा मंजूर केला आहे, त्यानुसार बँका आणि मोबाईल कंपन्या आधार लिंक करणे बंधनकारक करू शकतात, असे मतही जेटली यांनी व्यक्त केले. आधारला वैधानिक दर्जा असल्याचे सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केले आहे. तथापि, सर्वच योजनांसाठी आधार बंधनकारक नसावे, असा निर्वाळाही दिला होता.
आधार म्हणजे नागरिकत्व कार्ड नाही आणि तसेही विविध शासकीय योजनांचे अनुदान प्राप्त करण्यासाठी नागरिकांपुढे अनेक पर्याय आहेत. आधार कार्ड लागू करण्याचा एक विशिष्ट उद्देश होता, असे जेटली यांनी सांगितले.

Posted by : | on : 7 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (184 of 1765 articles)

Akhilesh Yadav
छत्तीसगडमध्ये आघाडीस नकार, लखनौ, ६ ऑक्टोबर - राज्यस्तरीय पक्षांच्या मदतीने केंद्रातील सत्तेचे स्वप्न रंगवत असलेल्या काँगे्रसला विशेषत: पक्षाध्यक्ष राहुल गांधी ...

×