ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:27 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राष्ट्रीय, वाणिज्य » पेमेंट कंपन्यांना भीती कार्यान्वयन खर्च, घोटाळ्यांची

पेमेंट कंपन्यांना भीती कार्यान्वयन खर्च, घोटाळ्यांची

►भारतात सर्व्हर उभारल्यास सायबर हल्ल्यांचा वर्तवला धोका,
बंगळुरू, ३० ऑक्टोबर –

Cyber War

Cyber War

भारतात होणार्‍या व्यवहारांसाठी देशात डाटा सर्व्हर उभारल्यास कार्यान्वयन खर्च वाढण्याची तसेच त्यांच्या येथील माहितीस धोका संभवण्याची भीती पेमेंट कंपन्यांनी व्यक्त केली आहे.
भारतात डाटा सर्व्हर उभारल्यास माहितीचे विकेंद्रीकरण आणि सायबर हल्ल्याच्या धोक्याचे आव्हान कंपन्यांसमोर असल्याचे एका जागतिक पेमेंट कंपनीच्या दोन वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.
केंद्रीकृत डाटा यंत्रणा सुरक्षित असते, असे एकंदरीत पाहता लक्षात येते. मात्र, डाटाचे विकेंद्रीकरण केल्यास सुरक्षात्मक धोका उद्भवतो, अशी माहिती एका अधिकार्‍याने दिली. कमकुवत दुवा हा सर्वच डाटाबेससाठी मोठा धोका असतो, असे या अधिकार्‍याने सांगितले. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशाप्रमाणे या अधिकार्‍याची कंपनी भारतात डाटा सर्व्हर उभारणार असली, तरी या अधिकार्‍याने स्वत:चे व कंपनीचे नाव उघड न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली.
एप्रिलपासून भारतात सुरक्षित डाटा संवर्धित करण्याचे, तसेच तो सातत्याने उपलब्ध करण्याचे आदेश यापूर्वी रिझर्व्ह बँकेने पेमेंट कंपन्यांना दिले होते. यासाठी कंपन्याही तयार झाल्या होत्या. या मुद्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ठाम भूमिका घेतल्याने व्हिसा, मास्टरकार्ड आणि पेपालसारख्या पेमेंट कंपन्यांनी आरबीआयचे हे कठोर पाऊल असल्याची नाराजी व्यक्त केली होती.
अखेर या कंपन्यांनी माहिती भारतातच संवर्धित करण्याबाबत रिझर्व्ह बँकेकडे योजना सादर केली. या योजनेप्रमाणे त्यांना भारतात माहिती संवर्धित करण्यासाठी ९ ते १२ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती सूत्राने दिली. भारतात माहिती संवर्धित करण्यासाठी दिलेली मुदत १५ ऑक्टोबर रोजी संपलेली आहे.
भारतात डाटा सर्व्हर उभारल्यास तांत्रिकदृष्ट्या काय गडबड होऊ शकते, याची माहिती देताना एका कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, निर्धारित मुदतीत पेमेंट व्यवहार होऊ शकणार नाहीत. विशेषत: ही अडचण येथून विदेशात होणार्‍या व्यवहारांसाठी येईल. ऑनलाईन व्यवहार होत असताना पेमेंट कंपन्या या व्यवहारांच्या काही विशिष्ट तपासण्या करतात. भारतातून विदेशात व्यवहार होत असताना त्याच कालावधीत कंपन्यांना वेगवेगळ्या ठिकाणांवरून व्यवहार तपासावा लागेल. या प्रक्रियेत व्यवहाराची मुदत संपण्याची शक्यता आहे. परिणामी मुदत संपल्याने हे व्यवहार होणार नाहीत, अशी माहिती सूत्राने दिली.
व्यवहारांची प्रक्रिया होत असताना काही मिलिसेकंदात हजारो मापदंडांची तपासणी केली जाते. डाटा सर्व्हर एकाच ठिकाणी असल्याने ही कार्यक्षमता पेमेंट कंपन्यांमध्ये आहे, अशी माहिती एका कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. व्यवहारामध्ये काही घोटाळा आहे का, याची तपासणी जगभरात विखुरलेल्या माहितीतून केल्यास या व्यवहारांमध्ये अडचणी येतील. ते सुरळीत पार पडणार नाहीत, असे त्याने सांगितले.
ठळक मुद्दे
-माहिती स्थानिक पातळीवर संवर्धित करण्यासाठी व्हिसा, मास्टरकार्डद्वारा योजना सादर
– भारतात माहिती संवर्धित करण्यासाठी ९ ते १२ महिन्यांचा कालावधी
हे आहेत धोके
– व्यवहारांदरम्यान मुदत संपण्याचा धोका
– सर्व्हर डाटाचे नूतनीकरण प्रभावित होण्याची शक्यता

Posted by : | on : 31 Oct 2018
Filed under : राष्ट्रीय, वाणिज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, वाणिज्य (779 of 2234 articles)

Ed Dierctorate Of Enforcement1
दिल्ली, ३० ऑक्टोबर - मागील तीन वर्षात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने तब्बल ३३ हजार ५०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली ...

×