ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » प्लॅस्टिक कचर्‍यापासून जैवइंधन बनविणारा प्रकल्प अंतिम टप्प्यात

प्लॅस्टिक कचर्‍यापासून जैवइंधन बनविणारा प्रकल्प अंतिम टप्प्यात

Dr Harshvardhan1

Dr Harshvardhan1

नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर –
प्लॅस्टिक कचर्‍यापासून जैविक इंधन तयार करणारा प्रकल्प डेहराडून येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम येथे लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज शनिवारी दिली. प्लॅस्टिक कचर्‍यापासून जैविक इंधन तयार करणारा हा देशातील पहिलाच प्रकल्प राहणार आहे.
जागतिक ‘ई-वेस्ट’ दिनानिमित्त इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. हा प्रकल्प डेहराडून येथे स्थापन करण्यात आला असून, येत्या जानेवारीत तो कार्यान्वित होणार आहे. प्लॅस्टिक कचर्‍याचे जैविक इंधनात रुपांतर करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे. येथे हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर असून, त्यानंतर देशभरातच अशा प्रकारचे प्रकल्प सुरू होणार आहेत, असे हर्ष वर्धन यांनी सांगितले.
एक टन प्लॅस्टिक कचर्‍यापासून ८०० लिटर जैविक इंधनाची निर्मिती या प्रकल्पात होणार आहे. हे इंधन उच्च प्रतीचे राहणार आहे आणि त्याचा वापर डिझेलवर चालणार्‍या वाहनांमध्ये केला जाणार आहे, असे ते म्हणाले.
प्लॅस्टिक आणि तत्सम स्वरूपाच्या कचर्‍यामुळे संपूर्ण देश चिंतीत आहे. या कचर्‍याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र सरकार नियमांमध्ये आवश्यक ते बदल करीत आहे. या कचर्‍यांपासून जैविक इंधनाची निर्मिती करून, आयातीत तेलाची निर्भरता कमी करण्यावर सरकारचा भर आहे, असे हर्ष वर्धन यांनी सांगितले.
जागतिक ई-वेस्ट मॉनिटर २०१७ च्या अहवालानुसार, संपूर्ण जगात २०१६ मध्ये ४४.७ दशलक्ष मेट्रिक टन इतक्या प्लॅस्टिकच्या कचर्‍याची निर्मिती झाली होती. भारतात दरवर्षी २० लाख मेट्रिक टन इतका प्लॅस्टिक कचरा तयार होतो. अर्थात् या ई-वेस्टमध्ये भारताचा वाटा ४.४७ टक्के आहे. आपण या समस्येत आकंठ बुडालो आहोत आणि उद्योग व इतरांशी चर्चा करून सरकारने याच वर्षी नियमात काही आवश्यक बदलही केले आहेत. पर्यावरणाप्रमाणेच ई-वेस्ट क्षेत्रातही आम्ही सर्वोत्कृष्ट कामगिरी करू, अशी ग्वाही आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने आता जगाला देऊ या, असे ते म्हणाले.

Posted by : | on : 14 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (476 of 1862 articles)

Annapurna Devi
१३ ऑक्टोबर - हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रात आपली वेगळी छाप उमटविणार्‍या प्रख्यात सतारवादक, पद्मभूषण अन्नपूर्णा देवी यांचे आज शनिवारी पहाटे ...

×