ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » फुकटात काहीच मिळत नाही

फुकटात काहीच मिळत नाही

►चीनची मदत घेणार्‍या देशांना लष्करप्रमुखांचा इशारा,
वृत्तसंस्था
पुणे, १७ सप्टेंबर –

Bipin Rawat Pti

Bipin Rawat Pti

फुकटात काहीच मिळत नाही, प्रत्येक मदतीची आपल्याला मोठी किंमत चुकवावीच लागते, असा स्पष्ट इशारा भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी चीनकडून आर्थिक मदत स्वीकारणार्‍या देशांना दिला.
‘बिमस्टेक’ समूहातील सदस्य राष्ट्रांच्या ‘लष्करी कवायत-२०१८’ बंगालच्या उपसागरात रविवारी संपन्न होत असल्यानिमित्त्याने पुण्यात आयोजित पत्रपरिषदेत लष्करप्रमुख बोलत होते.
सध्या नेपाळ हा देश चीनकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत स्वीकारत आहे, यामुळे या दोन्ही देशांमध्ये जवळीकही वाढत आहे. हा धागा पकडून जनरल रावत म्हणाले की, जो देश आपल्या आर्थिक प्रगतीच्या दिशेने पावले उचलतो, तो देश द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय सहकार्याचे मार्ग विस्तारित करण्याचे प्रयत्न करीत असतो. चीनकडे अमाप पैसा आहे आणि हा देश पैशाचे इतर देशांना वाटप करीत आहे, पण मदत स्वीकारणार्‍या देशांनी एक सत्यता नेहमीच लक्षात ठेवायला हवी की, कोणतीच गोष्ट किंवा मदत फुकट मिळत नसते. कारण, दोन देशांमधील द्विपक्षीय संबंध तात्पुरते किंवा काही काळापुरते असते. जागतिक सामाजिक व आर्थिक बदलानुसार हे संबंधही बदलत असतात.
रावत यांनी यावेळी अमेरिका आणि पाकिस्तानचे उदाहरण दिले. आधी या दोन देशांचे संबंध कसे होते, अमेरिकेकडून पाकला किती प्रचंड प्रमाणात मदत मिळत होती. वेगवेगळ्या कारणांसाठी अमेरिका पाकला लाखो डॉलर्स द्यायची. आजचे चित्र आपल्या सर्वांच्या डोळ्यापुढे आहे. त्यामुळे अशा तात्पुरत्या संबंधाची चिंता न करता, त्यात गुंतून न राहता, आपला देश आर्थिकदृष्ट्या बळकट कसा होईल, या दिशेने पावले उचलण्याची गरज आहे, असे रावत यांनी स्पष्ट केले.
सत्यता अशी आहे की, भौगोलिक स्थितीचा विचार करता, नेपाळ आणि भूतान यासारख्या देशांनी फक्त भारतासोबत राहायला हवे; कारण ही स्थिती इतर कोणत्याही देशासाठी पुरक नाही. भारताने आपल्या शेजारील देशांसोबत मैत्रीपूर्ण राजनयिक संबंध विकसित करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. ‘नेबरहूड फस्ट अ‍ॅण्ड अ‍ॅक्ट ईस्ट’ हेच भारताचे आजवरचे धोरण राहिले आहे आणि बिमस्टेक याच धोरणाचा एक भाग आहे, याकडेही जनरल रावत यांनी लक्ष वेधले.
चीन हा भारताचा उदयोन्मुख आर्थिक स्पर्धक आहे. दक्षिण-पूर्व आशिया प्रांतात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी हे दोन्ही देश एकमेकांशी स्पर्धा करीत आहेत, असे ते म्हणाले.
घुसखोरी ही जागतिक समस्या
बेकायदेशीर घुसखोरी ही भारत किंवा इतर कोणत्याही एका देशाची समस्या नसून, ती जागतिक स्वरूपाची आहे. चांगला रोजगार आणि चांगले आयुष्यमान प्राप्त होण्याच्या इच्छेने असंख्य घुसखोर जगभरात भ्रमण करीत असतात आणि जिथे त्यांना आपले आयुष्य चांगले जाईल, असे वाटते, तिथे ते घुसखोरी करतात. आज मॅक्सिकन नागरिक अमेरिकेत काय करीत आहेत, ते देखील याच एकमेव उद्देशाने अमेरिकेत पोहोचले, असे त्यांनी स्पष्ट केले.

Posted by : | on : 18 Sep 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (309 of 1774 articles)


बदलता येत नाही, हे पाकने समजून घ्यावे • ►राजनाथसिंह यांची स्पष्ट भूमिका, वृत्तसंस्था जम्मू, १७ सप्टेंबर - केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह ...

×