ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » उत्तर प्रदेश, नागरी, राज्य, राष्ट्रीय » फैजाबादचे झाले अयोध्या!

फैजाबादचे झाले अयोध्या!

►दीपोत्सव कार्यक्रमाची सुरुवात,
अयोध्या, ६ नोव्हेंबर –

Adityanath Ayodhya

Adityanath Ayodhya

अलाहाबादचे प्रयागराज असे नामकरण केल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज मंगळवारी फैजाबाद जिल्ह्याचे अयोध्या असे नामकरण करण्याची घोषणा केली.
अयोध्या हे आपल्या सन्मान, गर्व आणि प्रतिष्ठेचे प्रतीक आहे. अयोध्येसोबत जगातील कोणतीही शक्ती अन्याय करू शकत नाही. प्रभू श्रीराम यांच्यामुळेच या पवित्र शहराची ओळख आहे, असे आदित्यनाथ यांनी कथा पार्क येथे आयोजित दीपोत्सव कार्यक्रमात बोलताना सांगितले. दीपोत्सव कार्यक्रम हा नव्या परंपरेची सुरुवात होय, असे आदित्यनाथ म्हणाले.
या दीपोत्सव कार्यक्रमात दक्षिण कोरियाच्या प्रथम महिला किम जुंग सूक या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. आम्ही आमचा भूतकाळ पुन्हा जोडण्यासाठी अयोध्येला आलो आहोत, असे त्या यावेळी म्हणाल्या. त्यांनी आदित्यनाथ यांच्यासोबत अयोध्येतील रामलला परिसराला भेट दिली आणि कोरियाला गेलेल्या अयोध्येच्या राजकुमारी हेवो वाँग ओक यांच्या सन्मानार्थ बांधण्यात आलेल्या स्मारकाच्या सौंदर्यीकरण कार्यक्रमातही त्या सहभागी झाल्या. यानंतर किम जुंग सूक या प्रभू राम आणि देवी सीता यांची प्रतिमा साकारणार्‍या कलावंतांचे स्वागत करण्यासाठी शरयू नदीच्या तीरावर गेल्या. किम यांनी देवी सीतेच्या, तर मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि राज्यपाल राम नाईक यांनी श्रीरामाच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह हे देखील उपस्थित होते.
विमानतळाला रामाचे, वैद्यकीय महाविद्यालयाला दशरथाचे नाव
योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत नवीन विमानतळ उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली. या विमानतळाला श्रीरामांचे नाव देण्यात येणार आहे. तसेच येथे लवकरच उभारण्यात येत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाला राजा दशरथाचे नाव देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केली.
अयोध्या-कोरियाचा असा आहे इतिहास
१३ व्या शतकातील कोरियन इतिहासानुसार, अयोध्येच्या राजकुमारी इसवी सनपूर्व ४८ व्या शतकात कोरियाला गेल्या होत्या आणि महाराज किंग सुरो यांच्याशी विवाह केला होता. कोरियात त्यांचे नाव हेवो वाँग ओक असे होते. या विवाहामुळे अयोध्या आणि कोरिया हे दोन्ही राज्य सांस्कृतिकदृष्ट्या एकत्र आले होते.
गिनीज बुकात नोंद
अयोध्येत आयोजित दीपोत्सवाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेतली आहे. शरयू नदीच्या तीरावर या दीपोत्सवासाठी ३ लाख १ हजार १५२ दिवे लावण्यात आले होते. इतक्या मोठ्या प्रमाणात दिवे अल्पावधीत लावणे हा एक विक्रमच असल्याने गिनीज बुकाने या दीपोत्सवाची नोंद घेतली आहे.

Posted by : | on : 7 Nov 2018
Filed under : उत्तर प्रदेश, नागरी, राज्य, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उत्तर प्रदेश, नागरी, राज्य, राष्ट्रीय (902 of 2908 articles)

Gonsalvis Pharera Pune Court
६ नोव्हेंबर - कोरेगाव भीमा येथील हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेले कथित मानवी हक्क कार्यकर्ते सुधा भारद्वाज, अरुण फरेरा आणि ...

×