ads
ads
एम. जे. अकबर यांचा राजीनामा

एम. जे. अकबर यांचा राजीनामा

►आरोपांचा केला इन्कार ►न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार, नवी दिल्ली,…

नोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक

नोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक

नवी दिल्ली, १७ ऑक्टोबर – मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदी…

केवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता

केवायसी पूर्ण करणार्‍या मोबाईल वॉलेट कंपन्यांच्या आंतरक्रियाशीलतेला मान्यता

►रिझर्व्ह बँकेचे आदेश, बंगळुरू, १७ ऑक्टोबर – केवायसी प्रक्रिया…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

विद्यमान संमेलनाध्यक्षांचा महिना उलटल्यावर आक्षेप

विद्यमान संमेलनाध्यक्षांचा महिना उलटल्यावर आक्षेप

►साहित्य संमेलनाध्यक्ष निवड प्रकरण, नागपूर, १६ ऑक्टोबर – अखिल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:21 | सूर्यास्त: 18:00
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » भय्यू महाराज यांची आत्महत्या

भय्यू महाराज यांची आत्महत्या

►डोक्यात झाडली गोळी,
वृत्तसंस्था
इंदूर, १२ जून –

Bhaiyyu Maharaj

Bhaiyyu Maharaj

राजकीय वर्तुळात सतत वावर असलेले युवा आध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांनी आज एक कठोर पाऊल उचलत दुपारच्या सुमारास येथील आपल्या सिल्वर स्प्रिंग निवासस्थानी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. ते ५० वर्षांचे होते.
त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या पत्रात, ताणतणावाला आपण कंटाळलो असल्याचे नमूद केले होते. आपल्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये, असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. अन्य एका वृत्तानुसार त्यांच्यावर कर्जाचा मोठा बोझा होता आणि त्याचाही त्यांना ताण होता.
भय्यू महाराज यांनी उजव्या कानशिलाजवळ गोळी झाडून घेतली. या घटनेनंतर त्यांना तातडीने बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक हरिनारायणचारी मिश्रा यांनी दिली.
भय्यू महाराज यांचे राजकीय वर्तुळात मोठे वजन होते. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या राजकारणात अनेकदा त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्यांच्या शब्दाला शासन दरबारीही मान होता. मध्यप्रदेशातील शिवराजसिंह चौहान सरकारने नुकताच त्यांना आध्यात्मिक गुरू म्हणून राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल केला होता. मात्र, हा सन्मान भय्यू महाराज यांनी नम्रपणे नाकारला होता. संतांसाठी पद महत्त्वाचे नसून लोकांच्या सेवेलाच माझ्या दृष्टीने जास्त महत्त्व असल्याची भावना त्यांनी त्यावेळी व्यक्त केली होती.
भय्यू महाराज यांचे मूळ नाव उदयसिंह देशमुख होते. भ्रष्टाचाराविरुद्ध ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत जेव्हा आमरण उपोषण केले होते तेव्हा त्यांची मनधरणी करण्यासाठी संपुआ सरकारने भय्यू महाराज यांना दूत म्हणून पाठविले होते.
कर्जाचा डोंगर वाढत जात असल्यामुळे ते ताणतणावात होते, अशी माहिती समोर येत आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी स्वत:ला राजकीय क्षेत्रापासूनही दूर ठेवले होते.
मॉडेल ते आध्यात्मिक गुरू
‘सियाराम’ कापड कंपनीसाठी केलेल्या मॉडेलिंगमुळे सर्वात आधी भय्यू महाराज चर्चेत आले. नंतर हळूहळू त्यांचा अध्यात्माकडे ओढा वाढत गेला आणि पुढे ते भय्यूजी महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले. सुरुवातीला काही काळ त्यांनी मुंबईत नोकरीही केली होती. अध्यात्माकडे ओढा असला तरी शेतीसोबतच तलवारबाजी आणि घोडेस्वारीचाही त्यांना छंद होता. ‘फेस रीडर’ म्हणूनही त्यांच्यावर राजकारण्यांचा विश्‍वास होता. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेते त्यांचा राजकीय सल्ला घेत असत. राजकीय पुढार्‍यांप्रमाणेच लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, मिलिंद गुणाजी आदी अनेक कलावंत-गायक तसेच उद्योगपती आदी विविध घटकांतील मान्यवर भय्यू महाराजांच्या आश्रमात येऊन त्यांचा सल्ला घेत होते. समाजाला दिशा दाखविणारा संत अशी त्यांची ओळख होती. धार्मिक, सांप्रदायिक, कृषी, शिक्षण आदी विविध क्षेत्रांमध्ये त्यांचे कार्य होते. त्यांनी आपला कामाचा व्याप इतका वाढविला होता की तो सांभाळण्याच्या पलीकडे गेला होता, असे त्यांच्या निकवर्तीयांनी सांगितले. आरोग्याबाबत कुरबूर सुरू झाली असता कौटुंबिक समस्याचाही त्यांना त्रास होत होता, असेही सांगण्यात येत आहे. दोन वर्षांपूर्वी पहिल्या पत्नीने निधन झाल्यानंतर इच्छा नसतानाही घरच्या सदस्यांच्या आग्रहखातर त्यांनी गेल्या वर्षीच दुसरा विवाह केला होता. पहिल्या पत्नीपासून झालेली त्यांना मुलगी कुहू आहे. ती सध्या पुण्यात शिकत असल्याची माहिती आहे. त्यांच्या दुसर्‍या पत्नीचे नाव डॉक्टर आयुषी आहे.
मान्यवरांची श्रद्धांजली
भय्यूजी महाराज यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या भक्तांसह चाहत्यांमध्ये व राजकीय नेत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. अन्य मान्यवरांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे व शोक प्रकट केला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस
भय्यूजी महाराज यांच्या आध्यात्मिक विचारधारेचे अधिष्ठान लोकसेवा हेच होते. त्यांनी सूर्योदय परिवाराच्या माध्यमातून समाजहितासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांचा वंचित आणि उपेक्षित समाजघटकांना मोठा लाभ झाला आहे. विशेषतः जलसंधारण, भूमी सुधारणा, शिक्षण क्षेत्रासह सामूहिक विवाह चळवळीतही त्यांनी लक्षणीय काम केले होते. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशमध्ये त्यांनी केलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे हजारो हेक्टर जमिनीला पाणी मिळाले आहे. त्यांच्या निधनाने समाजाला विधायकतेसाठी उद्युक्त करणारा प्रेरणास्रोत हरपला आहे, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
नितीन गडकरी
आध्यात्मिक गुरू श्री भय्यूजी महाराज यांच्या निधनाची दु:खद बातमी कळली. त्यांच्याशी माझे व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांचा हा अकाली मृत्यू मनाला चटका लावणारा आहे. माझी त्यांना विनम्र श्रद्धांजली, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आदरांजली अर्पण केली आहे.
शिवराजसिंह चौहान
संत भय्यूजी महाराज यांना विनम्र श्रद्धांजली. देशाने संस्कृती, ज्ञान व सेवा अशा त्रिवेणी व्यक्तिमत्त्वाला गमावले आहे. आपले विचार चिरंतर काळापर्यंत समाजाला मानवतेची सेवा करण्याच्या मार्गावर चालण्यासाठी सतत प्रेरित करीत राहतील, अशा शब्दात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी श्रद्धांजपली अर्पण केली आहे.
शेवटच्या ट्विटमध्ये महाशिवरात्रीच्या शुभेच्छा
भय्यूजी महाराज यांनी आत्महत्या करण्याच्या अर्धा तास आधी ट्विट करून आपल्या भक्तांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या अर्धा तासाच्या काळात नेमके काय झाले की त्यांना एवढे मोठे टोकाचे पाऊल उचलवावे लागले, असा सवाल नेटकर्‍यांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
भय्यूजी महाराज यांनी आज दुपारी अडीचच्या सुमारास गोळी झाडून आत्महत्या केली, अशी बातमी पसरली. त्याआधी त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दुपारी १ वाजून ५७ मिनिटांनी शेवटचे ट्विट केले होते. ट्विट केल्यानंतर त्यांनी अवघ्या अर्धा तासानंतर आत्महत्या केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ट्विट करताना त्यांनी मासिक शिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. ‘मासिक शिवरात्रि’ को ‘महाशिवरात्रि’ कहते हैं। दोनों पंचांगों में यह चन्द्र मास की नामाकरण प्रथा है, जो इसे अलग-अलग करती है। मै सभी भक्तगणों को इस पावन दिवस की बधाई एवं शुभकामनाये देता हूँ।,’ असे ट्विट महाराजांनी केले होते. यासोबतच त्यांनी महादेवाच्या फोटोसह स्वत:चा फोटा लावून त्यात ‘मृत्युंजय महादेव त्राहिमां शरणागतम्। जन्ममृत्युजराव्याधि पीडति: कर्मबन्धन:॥’ हा मंत्रही टाकला होता.
दरम्यान, मध्यप्रदेश काँग्रेस समितीच्या मीडिया विभागाचे प्रमुख मानक अग्रवाल यांनी भय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

Posted by : | on : 13 Jun 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (661 of 1632 articles)

Atal Bihari Vajpayee After Stroke
वृत्तसेवा नवी दिल्ली, १२ जून - माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती स्थिर असल्याचे अ. भा. आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) ...

×